Wednesday, 11 May 2016

"वाळीत" कथा

त्यावेळेस मी नुकताच सहावीला गेलो होतो. नवोदयला प्रवेश मिळाला होता. माझा जर जातीच्या दाखल्याचा प्रोब्लेम झाला होता. त्यामुळे मी जर उशिरा आलो होतो शाळेत. बाकीची सहावीची  नवीन मुले सेट होत आलेली. मी त्यांच्यात पण नवा. मला खूप  व्हायचे. मी शिवालिक ला आलो होतो तिकडे माझे  मित्र प्रव्या ( प्रवीण) होताच अनिकेत आणि म्हैश्या ( महेश ) हि मंडळी होती.   माझा स्वभाव  मुळातच "प्रस्थापित" व्यवस्थे विरुद्ध रिबेल करणारा असल्या मुळे माझी   कुणाबर पण लगेच भांडण व्हायचा आणि महेश तर अजूनच होता नावाप्रमाणे त्याने एकदा सागर भोसलेला दम दिला
"तुला भस्मच करीन "  असो मूळ  गोष्टीवर येतो परत.

नवोदयला दिवाळीनंतर आम्ही रुळलो  मग एक एक किस्से कळायला लागले कि इकडे काय सिस्टम आहे. कोण कसे आहे असा बराच काही  काही पण एक  गोष्ट मात्र मला खटकली होती ती  म्हणजे  "  एखाद्या  पोराला वाळीत टाकणे"
मग सिनिअर मुलांकडून समजायला लागले कि इकडे कोण नीट नाही राहिला तर त्याला वाळीत टाकतात बेसिकली त्याच्याबर कोणी बोलत नाही त्याला कोण घरून अनेलेल खायला देत नाही. मी अजून पर्यंत शाळेत असा कोणता उदाहरण पहिला नव्हता. फक्त कुण्या सिनिअर कडून ऐकला होता कि निलेश भैय्याला का गुलाब भैय्याला वाळीत टाकले होते ( निलेश भैय्या आणि गुलाब भैय्या  जर माहिती  खोटी  असल्यास माफ करावे लगेच हा भाग वगळून टाकतो)

पण आम्हाला खरा अनुभव आला तो आम्ही सातवीत गेल्यावर  आमच्या हाउस मध्ये क्रिकेट चा खूप वेड होता आणि आम्ही दर रविवारी सकाळी ५ ला उठून जायचो खेळायला एक टीम असायची भारत कदमची आणि एक टीम सुनीत पानस्करची  आम्ही बाकीचे त्यात वेगळे वेगळे व्ह्याचो त्या क्रिकेट पायी इतकी भांडण झाली एकदा पूर्ण विंग मधील सगळ्या पोरांनी भारत भैय्या , मी प्रव्या  मंदार भैय्या आणि एक दोघांना वाळीत टाकले, पूर्ण खुन्नस चालायची मंदार भैय्या जर बॉडीने आडदांड होता त्याला सगळी विरोधी पार्टी टरकून असायची . तो एकच आवाज द्यायचा

"ए जग्या गप बस का तिथे येउन सांगू"
बस सगलि विंग शांत ! मग आम्हाला मनातून खूप आनंद व्हायचा. हे असे पंधरा वीस दिवस चालले मग एका प्यारेटस डे ला भारत भैय्याचा  प्यारेटस  किस्सा समजल्यावर त्यांनी सगळ्यांना बोलावून आमचा "मनमिलाप"  केला.

पण हा मनमिलाप  जास्त काळ टिकला नाही कारण त्यावेळेस आमच्या शाळेत निलेश भैय्या आणि प्रसाद गुरव हे "भक्तघोषित " हिरो होते. म्हणजे ते होते तसे कर्तबगार. त्यावेळेस निलेश भैय्या सारखा आमच्या हाउस ला यायचा ( खर सांगतो खूप राग यायचा आम्हाला )  ती सगळी मिळून खो खो खेळायची  मग इकडे प्रसाद गुरव ची कब्बडीची दुसरी ग्यांग तयार झाली आणि आम्ही जे  व्योलीबोल , फुटबॉल असले खेळ खेळायचो त्यांची पंचाईत झाली . "
अलिप्त" राहायला आम्ही काय नेहरूंची पुस्तके वाचली नव्हती.  मग काय तर घुसा जिकडे मोका मिळेल तिथे.
झाले शाळेत अजून एक प्रियंका नावाचे वेगळेच प्रकरण ट्रेंड वर होते. आमचा कायच संबंध नाही तर आम्ही चवीने सगळे किस्से ऐकायचो आणि दुसर्याला अजून मसाला लावून सांगायचो. असो   या मुळे  आमच्या मनमिलापा मध्ये फुट पडून परत तेच सुरु झाला आता फक्त भारत भैय्या तिकडे गेला होता मी मंदार भैय्या गुरुदत्त तांबे, प्रव्या , आणि अनिकेत आम्ही सगळे वाळीत पडलो होतो त्यांच्यामताप्रमाणे पण आम्हाला घंटा फरक पडला नव्हता आम्ही ते एन्जॉय करत होतो. परत निलेश भैय्याची दहावी झाली कि तो घरी गेला परत आमचा गाडा सूर झाला नीट.
आम्ही त्यावेळेस आठवीत जाणार होतो मला चांगले आठवते एकदा मी प्रव्या प्रशांत घोडके अनिकेत आणि बाकीच्या पोरांनी मधल्या  प्यासेज  मधे जाऊन ठरवला होता कि आपल्या काळात असा होऊन  दयायचा नाही आणि खरच ते झाला नाही. मग परत वाळीत टाकणे हा प्रकार काही घडला नाही किंवा घडल असेल तर माझ्या कानावर नाही आला. आम्ही अकरावीला आलो त्यावेळेस शाळेत नववीला नवीन पोरे आली होती
गावाकडची काही खेडवळ तर काही इंग्लिश मिडीयम ची नुसती इंग्रजीतच हुशार पोरे होती त्यात उत्कर्ष  नावाचा  मुलगा होता नवोदय मधे मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रकार होता.  तो जरा नवीन होता त्याचाकडून एकदा कायतरी चूक झाली त्याने घरी सांगितला आणि खोबरगडे सरांनी म्याटर खूप मोठा करत प्रिन्सिपल सरांकडे नेला मग सगळी मुले चिडली याला वाळीत टाकला. मग याच्या नरक यातना सुरु झाल्या  त्याच्या बेडवर रात्री लाईट बंद करून बूट मारणे , मेस मधे सगळे त्याच्या पुढे जाने. एकदा तर कहरच केला त्याची सोशल साइन्स ची वहीच फाडून टाकली त्याने खूप मेहनतीने रात्रभर जागून लिहिली होती तीच फाडून टाकली होती मग उद्या राउत सरांनी त्याला खूप मारला आणि मी त्याला मारताना पहिल्या मुले मी माहिती काढली कि बाबा इतका का रेटला मग मला सगळा किस्सा समजला  मला धक्काच बसला मी मग रात्री जाऊन राउत सरांशी या विषयावर बोललो मग सरांनी त्याला जर सूट  दिली. त्याला त्रास देणारे माझेपण मित्र होते मला काहीच करता येत नव्हते पण त्यांनी पण हळू हळू त्याचा शारिरीक त्रास कमी केला पण त्याला वाळीतून बाहेर नाही काढला ते वर्ष गेले आणि आम्ही मग बारावीत आलो होतो. पूर्ण वर्ष निवांत गेले आमच्यातील "पश्या " हा हिरो झाला होता सगळे जुनिअर  फिदा होते, एक श्रीकांत म्हणू मुलगा होता तो त्याची खूप कॉपी मारायचा . जानेवारीचा महिना होता मला माझ्या एका जुनिअर च्या मित्राने सांगितले कि
मिलिंद भैय्या  प्रथमेश भैय्याला आठवीच्या पोरांनी वाळीत टाकले आहे कारण  आणि श्रीकांत भांडण झाले आणि मग   "जात"    काढून
 त्याला वाळीत टाकला शाळेत असताना मला बसलेला तो सर्वात मोठा धक्का होता आम्ही अजून जात बघत नाही आणि हि शेंबडी पोरे आताच असा  करायला  लागली माझ्याबर महेश पण होता , अनिकेत पण होता प्रव्या पण होता आणि पश्या पण होता आम्ही ठरवला यांना राउंड मध्ये घ्यायला पाहिजे ती रात्र जाऊन दिली रविवार होता दुपारचा मस्त चिकन खाऊन  झाले होते .  आम्ही शिवालिक च्या बारावीवाल्यांनी  ठरवला होता  आज  करायची गेम मग मी एका पोराला त्याच्या हाउस मध्ये पाठवला आणि श्रीकांत ला आमच्या हाउस ला बोलावले तर त्याने उलट मलाच निरोप पाठवला कि
 "मिलिंद भैय्याला सांग तूच ये म्हणून"
परत त्याला दुसरा निरोप जो गेला ते ऐकून तो दुसऱ्या मिनिटाला शिवालिक सिनिअर त्याचा ग्यांग सोबत हजर !

आम्ही हाउसच्या मागचा दर खोललं आणि त्यांना भिंतीला चिटकवून उभा केला तर अजून एक भारी माहिती भेटली याचे राईट आणि लेफ्ट हयांड होते मग त्यांना पण तसाच त्याचा बाजूला उभा केला आणि ज्या दिल्या सटासट गालावर पोरांनी.  ३ पासून ४:३० पर्यंत हा शो सुरु होता. सगळा झाला कि त्यांना समजावला कि वाळीत टाकणे का चुकीचे आहे, आपल्या शाळेत आपण जात कधीच बघत नाही आपली परंपरा आहे ती. दुनियेत काय जरी झाला तरी चालेल आपण कायमच  एकत्र  राहायचा. श्रीकांत ला पण समजला त्यांनी पण हि परंपरा पुढे कायम केली !

म्हणून मला खूप  अभिमान आहे  नवोदयचा