Wednesday, 18 October 2017
Wednesday, 30 August 2017
जानाई मळाई आणि बाय
सज्जनगडच्या थोडस अलीकडे आंबवडे म्हणून गाव आहे दोन आंबवडे आहेत त्या रोडवर एक थोरलं आणि एक धाकट, माझी आत्या धाकट्या आंबवड्यात राहते, माझे वडील, त्याचा लहान भाऊ आणि हि आत्या एकदम क्लोज होते त्यांच्या लहानपणापासून, माझे वडिलांना ४ भाऊ आणि ४ बहिणी होते. माझे वडिलांचा ४०७ टेम्पो होता आणि ज्या ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते माझ्या आत्याला भेटायला जायचे. त्या आत्याला घरात सगळे “बाय” म्हणत माझे वडील सुद्धा बायच म्हणायचे आणि आम्ही सुद्धा बायच म्हणतो. असो
१९९५ च्या ला माझे वडील वारले, वडिलांना त्यांच्या मरणाची कुणकुण लागली होती आधीच
त्यावेळेस बाय आंबवड्यावरून माझ्या वडिलांना भेटायला यायची ती पैशाने काही श्रीमंत नाही पण जीव लावते सगळ्यांवर. ती आली कि माझे वडील तिला म्हणायचे बाय आत्ता माझं काय खर नाही मी कधीपण मरेन, माझ्या तीन पोरांची कोण नाही तू सांभाळ बाकीच्या बहिणी नाहीत बघणार त्यांच्याकडे पण तू तरी बघ
तर बाय म्हणायची “आर दिलीप आस का बोलतोय व्हशील बरा तू”
आप्पा म्हणायचा अशोक गेला सोडून तिकडून तो मला बोलावतोय ( अशोकनाना हे माझे सर्वात लहान चुलते, माझ्या वडिलांचे लहान भाऊ)
बाय लई खंबीर आहे मनाने ती म्हणायची
एकतर तू काही जात नाही आणि गेलास तरी तुझ्या पोरांना मी आहे
वडील वारले आणि आम्ही आमच्या शाहूपुरीच्या घरातून बाहेर पडलो,
आणि कोडोली जवळ राहायला आलो कारण तिकडे एमआयडीसी होती आयमीन अजून आहे
काहीतरी काम भेटेल ह्या आशेने आम्ही तिकडे स्थलांतर केले. कोडोलीच्या जवळचा जानाईमळाई देवीचा डोंगर आहे, तिकडे दर शुक्रवारी आणि मंगळवारी लोक जातात, देवीच्या भक्त लोक लोकात जास्त बायका असतात. “ज्या बायकांचे नवरे वारलेले असतात, ज्या बायकांना नवऱ्याने सोडून दिलेले असते, किंवा ज्या बायका बिनालग्नाचा असतात त्यांना मांढरदेवी काळूबाई, जानाईमळाई, नाशिकची रेणुकामाता, अश्या देवता जास्त जवळच्या वाटत असतात त्याचे कारण अस आहे कि समाज अश्या महिलांकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि अश्यावेळेस त्या बायकांना ह्या देवीचा मानसिक आधार वाटत असतो. ( हे फक्त माझे निरीक्षण आहे). ब्याक तो स्टोरी
तर ह्या जानाईमळायच्या डोंगारावर आम्ही जायचो कायम, मी आठवीला असताना बायकडे गेले होतो बहुतेक उन्हाळ्याची सुट्टी होती बायने मला मी ४ वर्ष्याचा असताना बघितलं होत आणि आता मोठा झालो होतो मी तिच्या घरी गेल्यावर तिने ओळखलच नाही मला पहिल्यांदा मी सांगितले “मी दिलीपचा मुलगा”
आप्पाच नाव ऐकल आणि मला जवळ वडल पटपटा मुके घेतले आणि म्हणाली एवढा मोठा झाला व्हय तू आणि रडायला लागली आता मला समजेना बाय रडतेय, थोड्या वेळाने ती शांत झाली, मला जेवायला दिल आणि विचारलं तू आणि नितीन कधी जानाईमळाई च्या डोंगरावर गेला होता का ?
मी म्हणालो हो लयदा गेलो पार पयलीपासून जातोय आम्ही कोडलीजवळ राहतो ना ( शाहूपुरी सोडल्यानंतर कुणालाच माहित नव्हते आम्ही कुठे राहतो ते)
तिनेते ऐकल आणि परत रडायला लागली आणि म्हणायला लागली
“ दिलीप तू खर बोलत होतास, मला माफ कर”
बाय खूप रडत होती आणि मी ब्लांक झालो होत काय चाललय समोर काही कळत नव्हते. जेवायला वाढलेले ताट तसच होत
शेवटी ती रडायची थांबली आणि सांगायला सुरुवात केली
म्हणाली
साल १९९७ का ९८ ला मी जानाईमळायला आलेले दर्शन घेतले आणि प्रसाद घेतला आणि आंबवड्याला परत आली, घरात आणि आजूबाजूला प्रसाद वाटला रात्रीचा स्वयपाक बनवला आणि रात्री जेवली आणि झोपली.
रात्री मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात दिलीप आला होता
आणि म्हणाला काग बाय माझ्या दोन पोरांच्या जवळून गेलीस तर त्यांना ओळ्खल नाहीस
बाय म्हणाली कधी आणि कुठ ?
माझे वडील म्हणाले तू आज जानाईमळायला गेलीतीस्ना, तिकडच होती मिलिन आणि माझ पिटुकल ( माझ्या छोट्या भावाला घरात त्यावेळेस पिटुकल म्हणायचे) आणि “तू शेजारण गेलीस दोघांच्या पण वळांखल नाय तू बाय”
बाय म्हणाली आर तुझी पोरांना कस विसरीन मी, ती नव्हतीच पण डोंगरावर
आणि स्वप्न संपल
पण अशी स्वप्न मला अजून पडतात दिलीप तेच म्हणतो अजून आणि मी तेच उत्तर देत होते ,पण आता मला वाटतंय दिलीपच बरोबर होता मी बघितलेली तिकड पोर पण मनात म्हटले दिलीपची पोर इकडे कश्याला येतील, दिलीप खरच बोलत होता.
आज परत दिलीप स्वप्नात आला तर माफी मागेन त्याची.
बायने सांगितलेली स्वप्नाची कथा किती खरी आहे हे मला नाही माहित पण एक समजल कि बाय आणि माझे वडिलांचा बॉंड माझे वडील गेल्यानंतरपण तसच आहे.

Tuesday, 8 August 2017
लहानपणीची गोष्ट
मी दुसरी का तिसरीत होतो त्यावेळेस साताराजवळच्या कोडोली गावात राहायचो म्हणजे अजून सुद्धा तिकडेच राहतो. आम्ही कॉलोनी मध्ये राहायचो हि कॉलोनी बनलेली बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या माणसांनी. पार बेळगाव, बिहार,यूपी ते अगदी जवळच्या चिंचणेर पासून लोक कॉलोनीत राहतात. मध्यमवर्गीय कष्टकरी गरीब असला कि जात धर्म ह्या फालतू गोष्टीना घेऊन जास्त उड्या मारत नाही, कॉलोनीत सगळे लोक शेजारी असणाऱ्या जुन्या आणि नव्या एमआयडीसी मधल्या कंपनीत कामाला जायचे सकाळी आठला बाहेर कि रात्री आठला ला घरी. त्यामुळे कॉलोनीतली पोर सगळी दिवसभर भर इकडे तिकडे करत असायची.
कॉलोनीला लागून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होती आणि शाळेचे खूप मोठं मैदान होत त्याला आम्ही "माळ" म्हणायचो. खालच्या साईडला मातंग वस्ती मधल्या कुणीतरी खूप अगोदर ती जमीन शाळेसाठी दिली होती. बरेच मोठे मैदान होते.
तिकडे आम्ही बॅटबॉल खेळायचो आणि तिकडे खेळायला बऱ्याच लांबून यायची पोर कोडोली गावातून दोन तीन ग्रुप यायचे, आमच्या कॉलोनीतले दोन,तीन, मातंग वस्तीतला एक ग्रुप कधीतरी धनगरवाडी चे पोर यायची सगळी नीट खेळायची.
एकदा असाच रविवार होता
आम्ही श्रीकृष्णा संपून बॅटबॉल खेळायला आलो होतो, बाराला शक्तिमान लागणार म्हणून आम्ही लौकर लौकर आवरत होतो आम्ही म्हणजे आमच्या टीम चे नाहीतरी लहानपणी बारक्याना फिल्डिंग साठी वापरतात आणि ट्रायबॉल खेळायला देतात. लहान मुले पण मोठे होऊन बॅटिंग करायची स्वप्नं बघत राहतात.
त्यादिवशी बौद्धवस्तीतली पोर आणि मातंग वस्तीतली पोर यांची मॅच लावली होती दोन्ही तिथले स्थानिक म्हणून पूर्ण जीव लावून खेळत होती.
आणि अचानक भांडण सुरु झाले सगळे मारायला लागले एकमेकांना बॅट फेकून मारामारी सुरु झाली. बौद्धवस्तीलया पोरांनी अजून पोर बोलावली आणि आणि मातंग वस्तीतल्या पोरांनी पण तेच केले.
मी, राहुल, आणि चंद्या असे तिघेजन भांडण बघत होतो. शक्तिमान सुरु व्हायला वेळ होता, म्हणून आम्ही तिघेजण भिलो होतो तरीपण भांडण बघत होतो तेवढ्यात कोणतरी म्हणल
ह्या मांगांना लै मस्ती आलीय
मग तिकडून पण रिप्लाय आला
आणि महारांनी काय उपटला बौद्ध होऊन ?
आता मी चंद्या आणि राहुल नेमका त्याच जातीतल होतो तिघांना पण पहिल्यांदाच असं कायतरी ऐकायला भेटलं होत. आमची चलबिचल सुरु झाली इतकावेळ एकत्र राहून आम्ही मज्जा घेत होतो ती मज्जा जाऊन आम्ही त्या भांडणातील भांडणाऱ्याची बाजू घ्यायला लागलो, म्हणजे एकदम कट्टर होऊन नव्हतो भांडत पण सुरु झाला आमचा छोटासा वाद
इकडे बारा वाजायला दहा मिनिट बाकी असतील आणि आमच्यात त्या भांडणात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यावर वाद सुरु होता.
तेवढ्यात राहुल म्हटलं आर जाऊदे लगा त्यांची भांडण त्यांचा भांडण दुसऱ्या कारणावरून सुरु आहे
आपण एक काम करू आत्ता घरी जाऊ शक्तिमान बघू नंतर बघू काय करायचे
मला आणि चंद्याला पटलं
मग मी अजून डोकं चालवलं आणि म्हणलं
आज जानाई मळाइ हॉल ला लग्न आहे ( आमच्या कॉलोनीच्या जवळ जनाई मळाइ मंगल कार्यालय होते तिकडे आम्ही जेवायला जायचो न बोलवतात कितीतरी लग्नात असच जेवून यायचो आणि कधी कधी खिश्यात लाडू घेऊन यायचो)
आपण शक्तिमान बघू हॉलवर जेवून येऊ मग बघू काय करायचे ते
चंद्या म्हणाला कॅनल ला पाणी आलय परवाच जाऊ तिकडे मग
तर असा आमचा प्लॅन झाला
आम्ही शक्तीमन बघितलं हॉल जाऊन जेवलो चांगले खिश्यात दोन दोन बुंदीचे लाडू आणले आणि कॅनल ला पोहायला गेलो तिकडून तसच पुढे जाऊन चिंचाला गेलो.
अश्याप्रकारे इतक्या लहान वयात आम्ही जातप्रश्न आणि त्याच्यावरून होणाऱ्या भांडणाला कल्टी मारून तो दिवस घालवला एकदम मस्त. रात्री चिंचा खायला बसल्यावर आम्ही एकमेकांना म्हणालो बरं झाली सकाळी भांडण नाही केली. भांडण करणारी शेवटी गाववाले होते आपण शेवटी भाडेकरी इथले.
टीप : ह्या गोष्टीतला शब्द न शब्द खरा आहे, आजकाल जात जास्तच अधोरिखेंत व्हायला लागली म्हणून हि गोष्ट लिहली.
Subscribe to:
Posts (Atom)