नुकतीच समजलेली ताजी गोष्ट ! नेहमीप्रमाणे ती माझी मैत्रीण आहे तिचा खर नाव नाही सांगत आपण तिला "अंकिता" म्हणूया सोपं जावे म्हणून. माझ्यापेक्षा तीनचार वर्षे जुनियर आहे माझ्याच शाळेतली आहे. दिसायला एकदम साधी, सावळा रंग( सावळा रंग मुद्दाम वापरला आहे), केस एकदम घनदाट थोडक्यात गरिबांची " स्मिता पाटील"
हि १२ वि झाली कि मुंबईला आली इंजिनीरिंग करायला कॉलेजला रोज जायला लागली त्यावेळेस नव्या वर्गात नवे मित्र झाले. शिवाय शाळेतले जुने मित्रमैत्रणी होत्याच( खरं म्हणजे मित्र नव्हतेच मैत्रिणीचं होत्या. ग्रुप मध्ये दोन अजून मुली होत्या आणि तीन मुले त्यातला दोन मुलांनी त्या दोन मुलींशी प्रेम केले आणि इंजिंनिरिंगसाठी सोया केली होती. हि जरा रंगाने सावली होती आता सावली नाही म्हणत काळी म्हणतो. कारण हा "काळेपणा"च आहे या कथेचा जीव.
हीच वय होत १९ २० च त्यामुळे हिची खूप खूप इच्छा होती कि कुणीतरी हिच्यावर जीवापाड प्रेम करावे जस बाकीच्या मुलींना गिफ्ट्स मिळतात स्पेशल ट्रीटमेंट मिळते वेगवेगळ्या डेजला तशी हिलापण मिळावी. पण ते काही होत नव्हतं. शाळेतल्या जुन्या मैत्रीणींबर रात्री कधीमधी फोनवर बोलायची त्यावेळेस तिला बाकीच्या मैत्रिणी सांगायच्या कि माझ्या "बीएफ"ने माझ्यासाठी हे केले ते केले. आम्ही बाईकवर लोणावळा, सिंहगड फिरायला गेलो अजून बरच काई काय. आजूबाजूला इतके सगळं घडत असताना हिच कोवळे मन एकदम आसुसलेले होते कि "माझ्यावर कुणीतरी प्रेम करावे" बाकीचे बीएफ सारखा कॉल करतात "कुठे आहेस जानू" पिल्ला आय मिस यु" अस बोलतात तसाच आपल्याला कुणीतरी बोलावं अशी तिची इच्छा होती. काही मुलींचे बीएफ भेटले मोबाईल चेक करतात असं तिला बराच मुलींनी सांगितले होते आणि त्या मुलींना बीएफने मोबाईल चेक करणे म्हणजे आपला बीएफ आपल्यावर खूप प्रेम करतो असं वाटायचे. मग हिला पण वाटायचं आपला मोबाईल कधी चेक करणार असं
झालं फर्स्ट इयर संपले , सेकंड इयर आणि थर्ड इयर पण संपले पण अंकिताला अजून प्रेम काही भेटले नव्हते. आणि तिची असच कुणाच्यापण मागे लागून कुणालापण बीएफ बनवायची इच्छा पण नव्हती. म्हणून तिचा फेसबुक स्टेट्स "सिंगल" होता. चौथ्या वर्षात असताना ती इंटर्नशिप साठी एका आयटी कंपनीत पुण्याला आली. तिकडे तिच्यासारखच अजून दोन जण होते तिकडे टीएलने (टिम लिडर) त्यातल्या एका मुलाला अंकिता बर सोबत ठेवले दोघे एका प्रोजेक्टवर काम करत होते. त्याच्याकडे एक स्कुटी होती. सेनापती बापट रोडवरून कोथरूडला यायला बस नव्हत्या जास्त खूप वेळ लागतो. मग हा तिला सोडायला लागला एसएनडीटी पर्यंत मग तो कर्वेनगर ला मित्राच्या फ्लॅट वर जायचा आणि ती कोथरूडला मग हळू हळू पिक करायला लागला. कधी कधी अंकिताला लेट व्हायचे तर तो वाट बघायचा आणि हि कितीपण लेट आली तर चिडायचा नाही. अंकितासाठी हे सगळे नवीन होत तिने हे सगळे दुसऱ्यासाठी होताना पहिले होते तिच्यासाठी पहिल्यांदाच हे सगळं घडत होत. मुलगा दिसायला खूप चांगला होता बोलायला पण खूप मस्त थोडासा जोक करायचा कधी कधी. मग संध्याकाळी ऑफिस सुटले कि हे कोथरूडला २० रुपये वाली "कोल्डकॉफी" प्यायला जायचे. अस करत करत त्याची चांगली मैत्री झाली. मग रात्र झाली कि त्याने कॉल करायला सुरुवात केली. सुरुवातिला हिला काई समजतच नव्हतं अस रात्रीच काय बोलायचं फोनवर. पण जैसेतैसें अंकिता खुश राहायला लागली. इंटर्नशिप संपत आली होती आणि अंकिताला वाटत होते कि आज प्रोपोज करेल उद्या प्रोपोस करेल पण हा काई प्रोपोज करत नव्हता. इंस्टर्नशिप संपली अंकिताला परत मुंबईला जायचं होत तिची ट्रेन होती दुपारी ३ ला होती त्यादिवशी सकाळपासून दोघे एकत्र होते अंकिताला वाटत होत कि पुणे मुंबई पुणे प्रमाणे "स्टेशन" ला करेल हा प्रोपोज पण ह्याचा चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं. पोराचं नावचं नाही सांगितलं अजून मी पोराचं नाव होते "प्रशांत" .
"प्रशांत ने तिला पुणे स्टेशनला आणून सोडले तिची सीट शोधून दिली सामान ठेवले अंकिताचे कंट्रोल सुटत चालले होते. प्रशांत डब्यातून खाली उतरला
खिडकीपाशी आला आणि काळजी घे कॉल करत राहा असले ट्रेडीशन बोलत होता त्यांचं तेवढ बोलून झालं आणि अंकिता म्हणाली
प्रशांत "आय लव यु"
तो जरा शांत झाला आणि ट्रेन सुरु झाली आणि दोघांच्या डोळ्यात पाणी आले, "प्रेमाच्या भावानेआधी मैत्रीची भावना असते" जी प्रत्येक माणसाला भावनिक बनवते. ट्रेन निघाली अंकिताच्या मनात रुख रुख लागून राहिली होती कि प्रशांत हो म्हणेल कि नाही आणि अचानक तिच्या मोबाइलवर मॅसेज आला
"अंकिता आय लव यु टू"
मॅसेज वाचला आणि तेवढ्यात प्रशांतचा कॉल आला "बच्चा काळजी घे" हे बोलला अंकिताला एकदम भारी वाटले एकदम लव्हवाली फिलिंग आली. चेहऱयावर तेज आले. डोळे अजून पाणीदार झाले. लगेच बॅग मधून हेडफोन बाहेर काढला आणि मोबाईल ला लावून जस बाकीच्या मुली बोलायचा तशी बोलू लागली
शिवाजी नगर मागे गेले आणि ट्रेन मधली मोबाईलची रेंज गेली. आणि कॉल तुटला. पण हिचे मन मात्र जुडले होते.