Monday, 5 December 2016

डिवोसॉफ्ट



काल रविवार होता म्हणून ट्रेन मधे गर्दी कमी होती समोर एक पोरग बसलं होत. बराच वेळ होतता समोर  हसून जरा स्माईल दिली.  मग लगेच त्याने विचारले काय करता तुम्ही ? मी सहसा मी कुठे काम करतो हे सांगत नाही अनोळखी लोकांना आणि माझ्या वेषभूषेवरून तर लोकांना खरंच वाटत नाही मी नक्की कुठे काम करत असेल ते.
मी त्याला असच सांगितले मी एका कॉल सेंटर ला आहे. लगेच त्याने सॅलरी विचारली मी म्हणालो १५  हजार. ते ऐकताच त्याचा चेहरा खुलला मला म्हणाला जरा वेळ आहे का येणाऱ्या "१५ मिनिटात तुमची जिंदगी बदलून जाईल"  मला अंदाज आला आता हा काय सांगणार त्याचा मी त्याला म्हणालो कि नको मला हीच जिंदगी हवीय नकोय बदल. बिचारा हिरमुसला. तरी एक कार्ड दिले आणि म्हणाला कि ज्यावेळेस आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल त्यावेळेस कॉल कर. मग मी त्याला माझं कार्ड दिल म्हणालो हि तुझी  जिंदगी  बदलविण्याची कंपनी बंद पडली तर कॉल कर मला. तर तो म्हणाला ३ वर्षांपासून आहे सुरु नाही पडत बंद. मी म्हणालो ठीक आहे.
मग जरा आठवला बारावी झाल्यावर आमच्या इथल्या एका पोराने मला इचलकरंजीला नेले होते "डिवोसॉफ्ट" च्या एका शोला त्यात ज्यांनी ज्यांनी जास्त मेंबर जॉईन केले त्यांना डायमंड , सिल्वर गोल्ड असं काय काय देऊन भारी फिलिंग देत होते.
त्यातले  ते  डायमंड वाले पोर सांगायचे मी अगोदर बीएसी करत होतो पण जॉब बरोबर हे पण केले आज बीएसीवाल्या पोरांपेक्षा मी जास्त कमावले आहेत. दुसरं म्हणायचा मी इंजिनीरिंग सोडून हेच केले आज माझ्या हाताखाली सातारा , कोल्हापूर आहेत राईट साईड ला १०० लेफ्ट साईड ला १०० आहेत. मला पण वाटलं बस आता आपण हेच करायचे आणि एक ढासू स्पीच द्यायचे. पण फि ऐकली ७००० रुपये तर सगळी स्वप्न तिकडेच गायब.

पण ह्या डिवोसॉफ्टच्या पोरांनी २०१० ते २०१३ पर्यंत  इतकं बोर केले होते बाकीच्या पोरांना कि त्या डिवोसॉफ्टची पोर बघितली कि बाकीची पोर पळून जायची मोबाईल स्विच ऑफ करायची. अश्याच डिवोसॉफ्टचे काही किस्से.

ग्रुप मधलं एक पोरग  नादी लागले होते दिसेल तिकडे दिसेल त्याला तेच सांगायचं जॉईन कर लाईफ बदलून जाईल. शेवटी ग्रुपमधली काही पोर म्हणाली बार सांग काय आहे बिसिनेस प्लॅन तर तो म्हणाला आता नाही संध्याकाळी आमचे एक सर येतील ते सांगणार. पोर म्हणाली हो. झालं संध्याकाळी सगळी पोर जमली हॉस्टेल वर त्यांचा सर आला होता ( सर कुठला शेंबडं पोरग होता कॉलेज सोडून हे धंदे करणारे)  संध्याकाळ होती तरी हा "सर" सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणाला मग हि बाकीची पोर लगेच हसली आणि "गुड इव्हनिंग" म्हणाली. तर त्याने अजून स्माईल देऊन म्हणाला  " आय क्नो आता संध्याकाळ पण डिवोसॉफ्ट मधे प्रत्येक वेळ हि गुड मॉर्निंग असते म्हणजे प्रत्येक वेळी कामासाठी नवी सुरुवात.  आणि त्याने कंपनीची माहिती द्यायला सुरुवात केली तेवढ्यात
  या मित्राने वडापाव आणि स्प्राईट आणून ठेवले होते ते प्रत्येका समोर ठेवले जस समोर आलं तसं तुटून पडली त्याच्यावर वडापाव   तो "सर" बिचारा पचका झाल्यामुळे गप राहिला आणि या मित्राकडे कटाक्ष टाकला ( बहुतेक म्हणला असेल कसली क्लायंट शोधले आहेत) मग ह्यातल्या एका पोरगा  वडापाव आणि स्प्राईट खात पित म्हणाला
आर ती "स्नेहलच"  काय झाला रे आज दिसली होतो बसस्टॉप वर उभी होती.
लगेच दुसरा म्हणाला "आर आता लय राडा दिसती राव" पहिल्यांदा   एवढी नव्हती खास.
हे ह्यांचं चालू होत आणि तो डेवोसॉफ्ट वाला मित्र आणि त्याचा सर गप उभे होते. डेवोसॉफ्ट वाल्या मित्राला वाटलं थांबेल ह्यांचं आता पण ह्यांचं थांबत नव्हतं म्हणून त्याने मधेच म्हटलं "सर बघा काय सांगत आहेत"
त्या सर ला  पण बरे वाटले मग त्याने स्टार्ट केले
येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघत आहेत.  प्रत्येकाला प्रश्न विचारला
पहिला पोरगा- मी कुठेच नाही बघत "होईल ते जाईल" मी नाय लय टेन्शन घेत.
दुसरा पोरगा- मी मला पुण्यात बघतो
तो सर म्हणाला पुण्यात बघतो म्हणजे
दुसरा पोरगा आता सातारला तर काय जॉब लागणार मग पुण्यातच जायला लागणार ना.  सर शॉक  दुसरं पोरग रॉक्स

तिसरं पोरगा (हे जरा सिरीयस होत )- मी स्वतःला "आयएएस" म्हणून बघतो.

त्या सरने लगेच आवरते घेत सांगायला सुरवात केली
मी पण अगादर असाच होतो मला पण चांगला जॉब करायचा होता पण मधेच " डिवोसॉफ्ट " आले आणि माझी लाईफ बदलली.  त्याने त्याची  स्टोरी सांगितली  डिग्रीच्या पाहिल्यावर्षी मी खूप "नेबळा" होतो भ्यायचो सगळ्याला काही कमवत नव्हतो. पण एकदा मी डिवोसॉफ्ट जॉईन केले आणि आज मी इथे आहे. मी कॉलेजला जातच नाही  फुल टाइम हेच करतो.
डिवोसॉफ्ट वाला दुसरा मित्र अर्धी लढाई जिंकल्यागत उभा राहिला छाती एकदम फुगली. सगळी पोर पण म्हणाली "भारी भारी"
सर ला पण समजले पोर इम्प्रेस झालेत मग त्याने अजून एक डाव टाकला
तुम्हाला जर आता  १ कोटी भेटले तर काय करणार
पहिला पोरगा-  आईघातली एवढे भेटले तर मी आधी खूप वडापाव खाणार आता वडापाव खाऊन तोंडाला लय चव सुटलीय राव हाय ना ?  सगळी पोर लै जोरात हसली परत सरचा जोरात "वडा" झाला होता बिच्यार्याची मान खाली गेली. तरी पण न हारता दुसऱ्याला विचारले
दुसरा पोरगा- मी काय नाय ते पैशे ठेवायला बॅग आणायला स्टॅन्ड वर जाईन  त्या  सरची मान अजून खाली गेली तोंडात मारल्यागत तिसऱ्या पोराला विचारले

तिसरा पोरगा- मी ते पैशे बँकेत ठेवीन

ह्या उत्तराने त्याले जरा बरा वाटले मग त्याने विचारले आता हा विचार करा कि इतके पैसे कुठून भेटणार ? कोण फ्री मधे तर देणार नाही.
मग त्याने प्लॅन सांगितलं ७००० हजार रुपये भरायचे आणि मेंबर जॉईन करायचे ५ मेम्बर झाले कि २५०० भेटणार मग जितके जास्त सायकल्स तितके पैसे. आणि एक कॅलक्यूलेशन सांगितले रोज फक्त तीन तास द्या आणि दोनवर्षात करोडपती व्हा  प्लस  ६५ कॉम्पुटर कोर्स आणि इंटरनेटवर ६० एमबी जागा  जगात कुठेच अशी ऑफर नाही भेटत.  अजून बरेच काय काय बोलबच्चन दिले होते.
पोर जरा इम्प्रेस झाली. आणि म्हणाली बघू होवुया जॉईन.
मग त्याने लगेच विचारले मग पैसे कॅश ने देणार का चेक ने
पैश्याच नाव ऐकताच सगळे जमिनीवर आले

पहिले पोरग- सर  तुमचे किती मेम्बर आहेत
लगेच तो म्हणाला ५९
मग सर असं करा माझे पैशे तुम्हीच भरा मी माझे पैशे आलेकी तुम्हाला देईन रिटर्न

सर गडबडला त्याला काय बोलावे आणि काय नाही बोलावे हे समजेच नाही तरी वेळ मारत म्हणाला करू आपण कायतरी मॅनेज
हे ऐकताच बाकीची पोर पण तेच म्हणाली सर आमचेपण पण तुम्हीच भरा.
आतातर त्याची खूप  अवस्था खराब झाली होती बिचारा शांत उभा राहिला दुसरा डिवोसॉफ्ट वाला मित्राला पण वाईट वाटले त्याचा सर चा अपमान झाला म्हणून. पण तो तरी काय करणार.  तरीपण तो सर हिम्मत हरला नव्हता म्हणाला परत भेटू आपण. "गुड मॉर्निंग" आणि तो सर गेला. मग बाकीच्या पोरांनी रात्रभर डिवोसॉफ्ट वाल्या मित्राची लै काढली.
त्यानंतर पण तो सर सारखे कॉल करायचा, मग पोर हालय हळू हा सर दिसला कि पळून जायची पुढे  हळू हळू या डिवोसॉफ्ट वाल्या मित्राने पण नाद सोडला (घरून त्याला जोरात भेटले शॉट)

थोड्या वर्षांनी डिवोसॉफ्ट बंद पडली. मग त्या सर ने   कशीबशी परत डिग्री केली पूर्ण , घरून सांगितले फक्त अभ्यास करायचा बाकी धंदे बंद. त्याने गाडीवर डिवोसॉफ्टचे स्टिकर लावले होते ते पण काढले ( गाडीचा शो गेला डेवोसॉफ्टचा डाग दिसायचा)
 तो सर पण पुण्यात आला जॉब साठी  लै फिरला कॉलसेंटर , बॅकऑफिस ,  मग शेवटी विमाननगर मध्ये एका कॉलसेंटर ला जॉब भेटला.

तर सांगायचं तात्पर्य एकाच कि असल्या भंगार चैन मार्केटिंग कंपनीच्या मागे लागून आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे वाया घालवू नका ( देयर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस )

 





Monday, 21 November 2016

लायकीची "प्रेमकथा" पार्ट १


नुकतीच समजलेली ताजी गोष्ट ! नेहमीप्रमाणे ती माझी मैत्रीण आहे तिचा खर नाव नाही सांगत आपण तिला  "अंकिता" म्हणूया सोपं जावे म्हणून. माझ्यापेक्षा तीनचार वर्षे जुनियर आहे माझ्याच शाळेतली आहे.  दिसायला एकदम साधी, सावळा रंग( सावळा रंग मुद्दाम वापरला आहे), केस एकदम घनदाट थोडक्यात गरिबांची " स्मिता पाटील"
हि १२ वि झाली कि मुंबईला आली इंजिनीरिंग करायला कॉलेजला रोज जायला लागली त्यावेळेस नव्या वर्गात नवे मित्र झाले. शिवाय शाळेतले जुने मित्रमैत्रणी होत्याच( खरं म्हणजे मित्र नव्हतेच मैत्रिणीचं होत्या. ग्रुप मध्ये दोन अजून मुली होत्या आणि तीन मुले त्यातला दोन मुलांनी त्या दोन मुलींशी प्रेम केले आणि इंजिंनिरिंगसाठी सोया केली होती. हि जरा रंगाने सावली होती आता सावली नाही म्हणत काळी म्हणतो. कारण हा "काळेपणा"च आहे या कथेचा जीव.
 हीच वय होत १९ २० च त्यामुळे हिची खूप खूप इच्छा होती कि कुणीतरी हिच्यावर जीवापाड प्रेम करावे जस बाकीच्या मुलींना गिफ्ट्स मिळतात स्पेशल ट्रीटमेंट मिळते वेगवेगळ्या डेजला तशी हिलापण मिळावी. पण ते काही होत नव्हतं. शाळेतल्या जुन्या मैत्रीणींबर रात्री कधीमधी फोनवर बोलायची त्यावेळेस तिला बाकीच्या मैत्रिणी सांगायच्या कि माझ्या "बीएफ"ने माझ्यासाठी हे केले  ते केले. आम्ही बाईकवर लोणावळा, सिंहगड  फिरायला  गेलो अजून बरच काई काय. आजूबाजूला इतके सगळं घडत असताना हिच कोवळे मन एकदम आसुसलेले होते कि "माझ्यावर कुणीतरी प्रेम करावे"  बाकीचे   बीएफ सारखा कॉल करतात  "कुठे आहेस जानू" पिल्ला आय मिस यु"  अस बोलतात तसाच आपल्याला कुणीतरी बोलावं अशी तिची इच्छा होती. काही मुलींचे बीएफ भेटले मोबाईल चेक करतात असं तिला बराच मुलींनी सांगितले होते आणि त्या मुलींना बीएफने मोबाईल चेक करणे म्हणजे आपला  बीएफ आपल्यावर खूप प्रेम करतो असं वाटायचे. मग हिला पण वाटायचं आपला मोबाईल कधी चेक करणार असं
झालं फर्स्ट इयर संपले , सेकंड  इयर आणि थर्ड इयर पण संपले पण अंकिताला अजून प्रेम काही भेटले नव्हते. आणि तिची असच कुणाच्यापण  मागे लागून  कुणालापण बीएफ बनवायची इच्छा पण नव्हती. म्हणून तिचा फेसबुक स्टेट्स "सिंगल" होता.  चौथ्या वर्षात असताना  ती इंटर्नशिप साठी एका आयटी कंपनीत पुण्याला आली. तिकडे तिच्यासारखच अजून दोन जण होते तिकडे   टीएलने  (टिम लिडर) त्यातल्या एका मुलाला अंकिता बर सोबत ठेवले दोघे एका प्रोजेक्टवर काम करत होते. त्याच्याकडे एक स्कुटी होती. सेनापती बापट रोडवरून कोथरूडला यायला बस नव्हत्या जास्त खूप वेळ लागतो. मग हा तिला सोडायला लागला एसएनडीटी पर्यंत मग तो  कर्वेनगर ला मित्राच्या फ्लॅट वर जायचा आणि ती कोथरूडला मग हळू हळू पिक करायला लागला. कधी कधी अंकिताला लेट व्हायचे तर तो वाट बघायचा आणि हि कितीपण लेट आली तर चिडायचा नाही. अंकितासाठी हे सगळे नवीन होत तिने हे सगळे दुसऱ्यासाठी होताना पहिले होते तिच्यासाठी पहिल्यांदाच हे सगळं घडत होत. मुलगा दिसायला खूप चांगला होता बोलायला पण खूप मस्त  थोडासा जोक करायचा कधी कधी.  मग संध्याकाळी ऑफिस सुटले कि हे कोथरूडला २०  रुपये वाली    "कोल्डकॉफी"  प्यायला जायचे. अस करत करत त्याची चांगली मैत्री झाली.  मग रात्र झाली कि त्याने कॉल करायला सुरुवात केली. सुरुवातिला हिला काई समजतच नव्हतं अस रात्रीच काय बोलायचं फोनवर. पण जैसेतैसें अंकिता खुश राहायला लागली.  इंटर्नशिप संपत आली होती  आणि अंकिताला वाटत होते कि आज प्रोपोज  करेल उद्या प्रोपोस करेल पण हा काई प्रोपोज करत नव्हता. इंस्टर्नशिप संपली  अंकिताला परत मुंबईला जायचं होत तिची ट्रेन होती दुपारी ३ ला होती  त्यादिवशी सकाळपासून दोघे एकत्र होते अंकिताला वाटत होत कि पुणे मुंबई पुणे प्रमाणे "स्टेशन" ला  करेल  हा प्रोपोज पण ह्याचा चेहऱ्यावर काहीच दिसत नव्हतं. पोराचं नावचं नाही सांगितलं अजून मी पोराचं नाव होते "प्रशांत" .
"प्रशांत ने तिला पुणे स्टेशनला आणून सोडले तिची सीट शोधून दिली सामान ठेवले अंकिताचे कंट्रोल सुटत चालले होते. प्रशांत डब्यातून खाली उतरला
खिडकीपाशी आला आणि काळजी घे कॉल करत राहा असले ट्रेडीशन बोलत होता त्यांचं तेवढ बोलून झालं आणि अंकिता म्हणाली
प्रशांत "आय लव यु"
तो जरा शांत झाला आणि ट्रेन सुरु झाली आणि दोघांच्या डोळ्यात पाणी आले, "प्रेमाच्या भावानेआधी मैत्रीची भावना असते" जी प्रत्येक माणसाला भावनिक बनवते.  ट्रेन निघाली  अंकिताच्या मनात रुख रुख लागून राहिली होती कि प्रशांत हो म्हणेल कि नाही  आणि अचानक तिच्या मोबाइलवर मॅसेज आला
"अंकिता आय लव  यु टू"
मॅसेज वाचला आणि तेवढ्यात प्रशांतचा कॉल आला "बच्चा काळजी घे" हे बोलला अंकिताला एकदम भारी वाटले एकदम लव्हवाली फिलिंग आली. चेहऱयावर तेज आले. डोळे अजून पाणीदार झाले. लगेच बॅग मधून हेडफोन बाहेर काढला आणि मोबाईल ला लावून जस बाकीच्या मुली बोलायचा तशी बोलू लागली
शिवाजी नगर मागे गेले आणि ट्रेन मधली मोबाईलची रेंज गेली. आणि कॉल तुटला.  पण हिचे मन मात्र जुडले होते.

Friday, 21 October 2016

माझ्या शाकाहाराची गोष्ट


लहानपासून आमच्या घरी  मटण मासे मुबलक असायचे माझे वडील हे रसिक मांसाहारी होते म्हणून आमच्या घरात सुकत बोंबीलचुणक्या ( वाळवलेले मटण) कायम असायचे. आठवड्यातून कधीतरी मी आणि  माझे वडील ज्यांना मी "आप्पा" बोलायचो ते कधीतरी शाकाहारी जेवण करायचो.  त्यावेळेस आमच्या घरी ४०७ टेम्पो होता. अप्पा तो टेम्पो पोवई नाका किंवा मोळाचा ओढा इकडे लावायचे त्यामुळे सगळी ड्राइवर गॅंग त्यांची दोस्त होती. त्यांचे वडारी दोस्त खास होते ते कायम आमच्या घरी यायचे मटण घेऊन आता मला आठवत नाही ते डुकराचे असायचे का बकऱ्याचे पण मी मात्र खायचो . माझा मोठा भाऊ ,आई आणि छोटा भाऊ अजिबात खायचे नाही नॉनव्हेज पण मी आणि अप्पा रोज खायचो. 
    १९९५ साली आप्पा वारले आणि ९६-९७ ला आमच्या घरातून त्रासामुळे आम्ही बाहेर पडलो किंवा आम्हाला चुलत्यांनी घराबाहेर काढले. मग माझी आई धुनीभांडी हॉटेल मधे काम करायला लागली. भाड्याचे घर एक्दम कमी पगार म्हणून माझा नॉनव्हेज बंद झाले. कधीतरी आम्ही अंडी खायचो बस. हळू हळू माझे नोंव्हेज प्रेम कमी होते गेले. नाही म्हणायला अधून मधून माझी आई जिला मी अक्का बोलतो ती हॉटेल मधून राहिलेले वडा-भजी पुऱ्या  आणायची कधीतरी( त्याकाळात रोज रोज वडा पुऱ्या भाजी खाणे हे मला श्रीमंतीचे प्रतीक वाटत असायचे कारण माझे बाकीचे मित्रांना ते खूप आवडायचे पण त्यांना रोज मिळत नव्हते ).  आणि कधी मधी  नॉनव्हेज ते फक्त  मी खायचो  बाकी कुणी खायला नव्हते.  
पुढे नवोदयला गेल्यानंतर महिन्यातून एकदा चिकन मिळायचो तेच खाऊन आम्ही मस्त राहायचो तिकडे सात वर्ष  होतो मज्जा यायची चिकन खायला त्यावेळेस चा छोटा किस्सा आहे माझा दुसऱ्या मित्र महेश (जो आता लेफ्टनंट आहे) तो आणि मी एकाच मुलीवर लाईन मारायचो  ती पण खात नव्हती नॉनव्हेज आणि  हा माही पण नाही खायचा शाळेत,  आणि   शाळेत अशी सिस्टिम होती कि सिनियर मुले आणि मुली जे  व्हेज खातात त्यांना आणि जुनियर लोकांना एकतर जावे लागायचे लंच साठी मग  माही त्यांच्यबर जायचा जेवायला मग मला उगाच भीती वाटायची ह्याला पटेल कि काय ती पोरगी म्हणून अकरावीत असताना मी एका रविवारी चिकन खाल्ले नाही  व्हेज खाऊन आलो तर वर्गातील सगळे पोरे अशी बघायला लागली जणू मी  कायतरी मोठा मॅटर केलाय मनात ठरवलं पोरगी पेक्षा चिकन आणि मित्र महत्वाचे मी परत चिकन पाहायला सुरु झालो. (ती सुंदर गोड मुलगी मला पण नाही पटली आणि माहीला पन
पुढे मी पुण्यात आलो मग इकडे नॉनव्हेज म्हणजे फक्त "अंडे" हे  मनावर बिबवून घेतले. कारण डब्यात फक्त तेच मिळायचे आणि हॉटेल मधे जाऊन खाण्याची इच्छा नव्हती.  आणि कोण जात असेल तर उगाच सांगायचे हॉटेल मधे डुकराचे गायीचे मटन घालतात म्हणजे दुसरा पण नाही जाणार. हां पण एकदा टोया आणि त्याच्या गँगने "ओडिसी" (आऊट डोर केटरिंग) ला जाऊन राहिलेले सगळे नॉनव्हेज आणले आणि आम्ही खूप खूप खाल्ले. लक्षात राहणेजोगे खाल्लेले हेच ते नॉन व्हेज.
 खरी स्टोरी आता आहे
 मी पोस्ट ग्रॅज्युशन साठी हैद्राबादच्या टाटा इन्स्टिटयूट ला गेलो आणि तिकडे इतका फ्रीडम आणि सुविधा होता कि मजा यायला लागली. तिकडे गेल्यावर देशभरातील नवोदयची पोरे पण भेटली "नवोदय" या फॅक्टर वर दोस्ती लगेच झाली.  तेलंगणा मधल्या  नालगोंडा  नवोदयचा अनिल आसाम च्या दुलन राजस्थानचा मीना गुजरातचा जितेंद्र अशी बरीच मंडळी होती. हैदराबाद ला आठवड्यातून दोनदा नॉनव्हेज मिळायचे तिकडे राईस खायला पण मज्जा यायची.  आम्ही सगळे एका टेबल वर बसून खूप खूप वडायचो चिकन कधी कधी  कधी कधी त्याच्यावर बीफ पॉवडर टाकायचो भारी लागायची आणि कधी माश्याचे लोणचे. हैद्राबादला गेल्यावर मी खुललो होतो. पहिले वर्ष गेले दुसऱ्या वर्षात असताना  बीफ बॅन चा विषय आला  आणि आमच्या कॅम्पस मधे रोज चर्चा झडू  लागल्या आधी आम्ही सगळी पोरे जागा भेटेल तिकडे बसून जेवायायची आता काही मनातून कट्टर असणारे,मनातून ब्राह्मण्यवाद" मानणारे पोरे वेगळी बीफ पावडर खाणाऱ्यांपासून  बसायला लागली त्यावेळेस माझ्या आणि बाकीच्या पोरांच्या लक्षात नाही आले.  मजेची गोष्ट अशी कि एक दोन उच्चवर्णीय मुली होत्या ज्या सगळं मटन खायचा बीफबफ,ससापोर्क इत्यादी  त्यांना मात्र "लिबरल" जातीभेद न मानणारे असली विशेषण लावून मोकळी झाली. बाकी जी राहिलेली ग्यांग होती ती आपली तशीच राहिली. असो
आमच्या  मटन खाणे ना थांबले ना बीफ पावडर ना माश्याचे लोणचे. आमच्या ग्रुप मधे जो जितेंद्र होता तो बिचारा  व्हेज खायचा पण कायम आमच्यात बसायचा आय मिन मित्रच होता तो त्यामुळे आमच्यातच बसणारे ( एखाद्याच्या खाण्यावरून दोस्ती ठरवणारे माणूस म्हणायच्या लायकीचे नसतात).
एक दिवशी सहज त्याला विचारले
जितेन तू व्हेजिटेरियन  बचपण से है या बाद मे बना ?
त्याने उत्तर दिले
भाई बचपण से हू लेकिन मैने कूच देखा जिसे देखकर मेरा और मन नही होता.
मी म्हणालो
हां चल ठीक है !
 रात्री त्याने मला फेसबुकवर एक विडिओ पाठवला ज्यात कोंबडीगाय पोर्क यांना कसे मारले जाते हे दाखवले होते आणि शेवटी मॅसेज होता " बी व्हेजिटेरियन"
त्या रात्री तो विडिओ पाहून मला झोपच नाही आली रात्रभर त्या कोंबड्या आणि डुकरे माझ्या कानात ओरडत आहेत असा वाटत होते ( माणसाने का जास्त इमोशनल असू नये हे मला नंतर समजले)
 सकाळी कॉलेजला गेली दोन दिवस मला सतत बैचेन होत होते शेवटी फॉर्म मधे येऊन मी फेसबुक वर घोषणा केली कि "मी आज पासून शाकाहारी बनत आहेत" माझे ग्रुप मधले शॉक झाले. फेसबुक पोस्ट वर  वेगवेगळ्या कमेंट यायला सुरुवात झाली  "अभिनंदन ,खरा  अहिंसावादी"  असलं बराच काय काय
मला पण मी कायतरी हिरो काम केलय अस वाटायला लागल.
तरी ग्रुप ला वाटत होत कि हा कायतरी स्टंट आहे म्हणून ते पण निवांत होते पण चिकन च्या दिवशी मात्र मी खरंच नाही घेतले व्हेज घेतले आणि बसलो  त्यादिवशी जे जे लोक चिकन खात होते ते मला क्रुएल वाटत होते. मनातून वाटत होते ह्यांना प्राणिमात्रांबद्दल काही कणव आहे का नाही.
झाले दोन आठवडे गेले असेच  मला मात्र वेगळ्या जगात असल्या सारखे वाटायला लागले.
मग एक दिवशी  ग्रुप मधल्या दुलन ने मला असच विचारले
 क्या हुवा मिलिंद क्यो खा नही रहा हैं मी त्याला त्या विडिओ बद्दल सांगितलेत्याने तो विडिओ पहिला थोडा आणि सोडून दिला.
संध्याकाळी  खेळून झाल्यानंतर त्याने मला बोलावले आणि विचारले
प्लांट्स मे लाईफ होती हैं क्या ?
मी बोललो हां होती हैं !
तो बस जानवर चिख   पाते है  और प्लांट्स नही !   प्लांट्स को भी जान हैं  बेचारे बोल नही  पाते या हम उनकी आवाज सून नही पाते.
 परत मी हँग झालो शुक्रवारी त्याने मला सांगितले हे सगळं परत रात्री मला प्लांट्स तोडताना जो आवाज येत नाही तो आवाज मला ऐकू येऊ लागला मी झोपूच शकलो नाही. शनिवारी सकाळी मेस मधून नाश्ता करायला गेलो "लेमन राईस"  होता   नाष्ट्याला  मला ते बघून भात तोडणी आठवली आणि माझी खायची इच्छाच मेली तसाच बाहेर मेस मधून दिवसभर एक कण नाहीं खाल्ला मी फक्त पाणी पिले. शनिवार गेला रविवार गेला दोन दिवस बिना अन्नाचा होतो मी. मग आमच्या ग्रुप मधे समजला मी ग्रुप मधल्या अनिल ला सगळी स्टोरी सांगितली  त्याने ऐकली आणि म्हणला
आर यु फूल? “
मग तिकडून त्याने मला  "अलसभा" हॉटेल ला नेले आणि चिकन बिर्याणी ऑर्डर केली आणि मला फूड चैन समजावली आणि बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या. ज्या माझ्या तर्कबुद्धीला पटल्या सुद्धा. मग मी ठरवलं खाण्यापिण्यात फालतू गोष्टी मधे आणायच्या नाहीत.
आणि ती हैद्राबादी  बिर्याणी आम्ही खाल्ली !  त्यानंतर दोनवर्ष आठवड्यातून दोन ते तिनदा आम्ही जायचो कधी बावर्ची कधी पॅराडाईज कधी शोऊगोस जायचो  बिर्याणी ,खिमापाव पायाकबाब अजून बरेच आहेत असा खाल्ला.
 अश्याप्रकारे परत मी अन्न खाणारा माणूस झालो !

Saturday, 3 September 2016

"वाळीत" कथा

त्यावेळेस मी नुकताच सहावीला गेलो होतो. नवोदयला प्रवेश मिळाला होता. माझा थोडा  जातीच्या दाखल्याचा प्रोब्लेम झाला होता. त्यामुळे मी जरा  उशिरा आलो होतो शाळेत. बाकीची सहावीची  नवीन मुले सेट होत आलेली. मी त्यांच्यात पण नवा. मला खूप  बोर व्हायचे. मी शिवालिक ला आलो होतो तिकडे माझे  मित्र प्रव्या
 ( प्रवीण) होताच अनिकेत आणि म्हैश्या ( महेश ) हि मंडळी होती.   माझा स्वभाव  मुळातच "प्रस्थापित" व्यवस्थे विरुद्ध रिबेल करणारा असल्या मुळे माझी   कुणाबर पण लगेच भांडण व्हायचा आणि महेश तर शीघ्रकोपी  होता  त्याने एकदा सागर भोसलेला दम दिला  होता त्याने
"तुला भस्मच करीन " (स्वतःला शंकर समजत होता का काई माहित)  असो मूळ  गोष्टीवर येतो परत.

नवोदयला दिवाळीनंतर आम्ही रुळलो  मग एक एक किस्से कळायला लागले कि इकडे काय सिस्टम आहे. कोण कसे आहे असा बराच काही  काही पण एक  गोष्ट मात्र मला खटकली होती ती  म्हणजे  "  एखाद्या  पोराला वाळीत टाकणे"
मग सिनिअर मुलांकडून समजायला लागले कि इकडे कोण नीट नाही राहिला तर त्याला वाळीत टाकतात बेसिकली त्याच्याबर कोणी बोलत नाही त्याला कोण घरून अनेलेल खायला देत नाही. मी अजून पर्यंत शाळेत असा कोणता उदाहरण पहिला नव्हता. फक्त कुण्या सिनिअर कडून ऐकला होता कि निलेश भैय्याला का गुलाब भैय्याला वाळीत टाकले होते ( निलेश भैय्या आणि गुलाब भैय्या  जर माहिती  खोटी  असल्यास माफ करावे लगेच हा भाग वगळून टाकतो)

पण आम्हाला खरा अनुभव आला तो आम्ही सातवीत गेल्यावर  आमच्या हाउस मध्ये क्रिकेटचे  खूप वेड होता आणि आम्ही दर रविवारी सकाळी ५ ला उठून जायचो खेळायला एक टीम असायची भारत कदमची आणि एक टीम सुनीत पानस्करची  आम्ही बाकीचे त्यात वेगळे वेगळे व्ह्याचो त्या क्रिकेट पायी इतकी भांडण झाली एकदा पूर्ण विंग मधील सगळ्या पोरांनी भारत भैय्या , मी प्रव्या  मंदार भैय्या आणि एक दोघांना वाळीत टाकले, पूर्ण खुन्नस चालायची मंदार भैय्या जर बॉडीने आडदांड होता त्याला सगळी विरोधी पार्टी टरकून असायची . तो एकच आवाज द्यायचा
"ए जग्या गप बस का तिथे येउन सांगू"  बस सगलि विंग शांत !
मग आम्हाला मनातून खूप आनंद व्हायचा. हे असे पंधरा वीस दिवस चालले मग एका प्यारेटस डे ला भारत भैय्याचा  प्यारेन्टसला   किस्सा समजल्यावर त्यांनी सगळ्यांना बोलावून आमचा "मनमिलाप"  केला.

पण हा मनमिलाप  जास्त काळ टिकला नाही कारण त्यावेळेस आमच्या शाळेत निलेश भैय्या आणि प्रसाद गुरव हे "भक्तघोषित " हिरो होते. म्हणजे ते होते तसे कर्तबगार. त्यावेळेस निलेश भैय्या सारखा आमच्या हाउस ला यायचा ( खर सांगतो खूप राग यायचा आम्हाला )  ती सगळी मिळून खो खो खेळायची  मग इकडे प्रसाद गुरव ची कब्बडीची दुसरी ग्यांग तयार झाली आणि आम्ही जे  व्योलीबोल , फुटबॉल असले खेळ खेळायचो त्यांची पंचाईत झाली . "
अलिप्त" राहायला आम्ही काय नेहरूंची पुस्तके वाचली नव्हती.  मग काय तर घुसा जिकडे मोका मिळेल तिथे.
त्यावेळेस  शाळेत " प्रियंका" नावाचे वेगळेच प्रकरण ट्रेंड वर होते. आमचा कायच संबंध नाही तर आम्ही चवीने सगळे किस्से ऐकायचो आणि दुसर्याला अजून मसाला लावून सांगायचो. असो   या मुळे  आमच्या मनमिलापा मध्ये फुट पडून परत तेच सुरु झाला आता फक्त भारत भैय्या तिकडे गेला होता मी मंदार भैय्या गुरुदत्त तांबे, प्रव्या , आणि अनिकेत आम्ही सगळे वाळीत पडलो होतो त्यांच्यामताप्रमाणे पण आम्हाला काहीच  फरक पडला नव्हता आम्ही ते एन्जॉय करत होतो. परत निलेश भैय्याची दहावी झाली कि तो घरी गेला परत आमचा गाडा सूर झाला नीट.
आम्ही त्यावेळेस आठवीत जाणार होतो मला चांगले आठवते एकदा मी प्रव्या प्रशांत घोडके अनिकेत आणि बाकीच्या पोरांनी मधल्या  प्यासेज  मधे जाऊन ठरवला होता कि आपल्या काळात असा होऊन  दयायचा नाही आणि खरच ते झाला नाही. मग परत वाळीत टाकणे हा प्रकार काही घडला नाही किंवा घडल असेल तर माझ्या कानावर नाही आला. आम्ही अकरावीला आलो त्यावेळेस शाळेत नववीला नवीन पोरे आली होती
गावाकडची काही खेडवळ तर काही इंग्लिश मिडीयम ची नुसती इंग्रजीतच हुशार पोरे होती त्यात उत्कर्ष  नावाचा  मुलगा होता नवोदय मधे मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रकार होता.  तो जरा नवीन होता त्याचाकडून एकदा कायतरी चूक झाली त्याने घरी सांगितला आणि खोब्रागडे सरांनी म्याटर खूप मोठा करत प्रिन्सिपल सरांकडे नेला मग सगळी मुले चिडली याला वाळीत टाकला. मग याच्या "नवोदययातना" सुरु झाल्या  त्याच्या बेडवर रात्री लाईट बंद करून बूट मारणे , मेस मधे सगळे त्याच्या पुढे जाने. एकदा तर कहरच केला त्याची सोशल साइन्स ची वहीच फाडून टाकली त्याने खूप मेहनतीने रात्रभर जागून लिहिली होती तीच फाडून टाकली होती, मग उद्या राउत सरांनी त्याला  वर्गात  खूप मारला आणि मी त्याला मारताना पहिल्या मुले मी माहिती काढली कि इतका का रेटला  ?
मग मला सगळा किस्सा समजला  मला धक्काच बसला मी मग रात्री जाऊन राउत सरांशी या विषयावर बोललो मग सरांनी त्याला जर सूट  दिली. त्याला त्रास देणारे माझेपण मित्र होते मला काहीच करता येत नव्हते पण त्यांनी पण हळू हळू त्याचा शारिरीक त्रास कमी केला पण त्याला वाळीतून बाहेर नाही काढला ते वर्ष गेले आणि आम्ही मग बारावीत आलो होतो. पूर्ण वर्ष निवांत गेले आमच्यातील "पश्या " हा हिरो झाला होता सगळे जुनिअर  फिदा होते, एक श्रीकांत म्हणू मुलगा होता तो त्याची खूप कॉपी मारायचा . जानेवारीचा महिना होता मला माझ्या एका जुनिअर च्या मित्राने सांगितले कि
मिलिंद भैय्या  प्रथमेश भैय्याला आठवीच्या पोरांनी वाळीत टाकले आहे कारण त्याचे आणि श्रीकांत भांडण झाले आणि मग   "जात"    काढून   त्याला वाळीत टाकला शाळेत असताना मला बसलेला तो सर्वात मोठा धक्का होता आम्ही अजून जात बघत नाही आणि हि शेंबडी पोरे आताच असा  करायला  लागली माझ्याबर महेश पण होता , अनिकेत पण होता प्रव्या पण होता आणि पश्या पण होता आम्ही ठरवला यांना राउंड मध्ये घ्यायला पाहिजे ती रात्र जाऊन दिली रविवार होता दुपारचा मस्त चिकन खाऊन  झाले होते .  आम्ही शिवालिक च्या बारावीवाल्यांनी  ठरवला होता  आज  करायची गेम,  मग मी एका पोराला त्याच्या हाउस मध्ये पाठवला आणि श्रीकांत ला आमच्या हाउस ला बोलावले तर त्याने उलट मलाच निरोप पाठवला कि
 "मिलिंद भैय्याला सांग तूच ये म्हणून"
परत त्याला "दुसरा निरोप "जो गेला ते ऐकून तो दुसऱ्या मिनिटाला शिवालिक सिनिअर त्याचा ग्यांग सोबत हजर !

आम्ही हाउसच्या मागचा दर खोललं आणि त्यांना भिंतीला चिटकवून उभा केला तर अजून एक भारी माहिती भेटली याचे राईट आणि लेफ्ट हयांड होते मग त्यांना पण तसाच त्याचा बाजूला उभा केला आणि ज्या दिल्या सटासट गालावर पोरांनी.  ३ पासून ४:३० पर्यंत हा शो सुरु होता. सगळा झाला कि त्यांना समजावला कि वाळीत टाकणे का चुकीचे आहे, आपल्या शाळेत आपण जात कधीच बघत नाही आपली परंपरा आहे ती. दुनियेत काय जरी झाला तरी चालेल आपण कायमच  एकत्र  राहायचा. श्रीकांत ला पण समजला त्यांनी पण हि परंपरा पुढे कायम केली !

म्हणून मला खूप  अभिमान आहे  नवोदयचा

Sunday, 19 June 2016

सुनील गावस्करांचा निम्मिताने


आज झी  वर  अवॉर्ड सोहळा चालू  होता त्यात  सुनील गावस्करांचा "महाराष्ट्राची शान" असा कायतरी पुरस्कार दिला गेला.  त्यांनी त्यांच्या जन्माचा किस्सा सांगितला
तो असा
झाले असे होते की सुनील गावस्करांचा जन्म झाला तो  १९४९  ला.  ते आणि त्यांची आई हॉस्पिटलमधे होते. त्याचवेळी तिथे खुपसाऱ्या बायका पण होत्या बाळंतपण झालेल्या त्यांच्या बाळांबर.
आता मूळ जन्मले की नातेवाईक बघायला येतात . सुनील गावस्करांना बघायला त्यांचे "चुलत काका"  आले बाळाला पाहिले आणि गेले
दोन चार दिवसांनी ते परत आले तेंव्हा म्हणाले हे "बाळ" आमचे नाही  कारण सुनीलच्या  कानाजवळ एक छोटासा बोगदा होता तो नव्हता म्हणजे  बाळ बदलले गेले होते. झाले शोधाशोध सुरू झाली मग शेवटी ते बाळ एका कोळीण जवळ सापडले.
हा किस्सा सांगून झाला आणि सुनील गावस्कर म्हणाले  मी झालो असतो कोळी जर सापडलो नसतो तर.
इथे ते एक गोष्ट नकळत सांगून गेले " व्यवस्थाच  अशी कोळ्याचा घरी जन्माला तर "मासेमारीच" करायची , चांभाराच्या घरी जन्माला तर चपलांचे काम करायचे.   न्हाव्याच्या घरी   केसच कापायचे.  म्हणजे ही एक अशी इमारत होती ज्याच्यावर खूप मजले  होते आणि प्रत्येक मजल्या वरच्याला  आपल्या खाली एक मजला आहे म्हणून  वाटत नव्हता.   आणि मुळात भारत हा असा देश    जिथे  कामाला अजिबात डिग्निटी नाहीये.   काही वर्षांपूर्वी मी कॅफे कॉफी डे ला होतो कामाला मला खूप लाज वाटायची बाहेर  सांगायला की  मी तिकडे काम करतो म्हणून मग कॉलेजला गेलो की उगाच सांगायचा "कॅलसेंटर" आहे  कारण वेटर म्हणून सांगितला तर ईज्ज्जत कमी होईल असे इथल्या व्यवस्थेने अगदी शाळेच्या पहिल्यादिवसापासून ठासवले आहे. असो
आज   सगळी कडे आरक्षण विरोधी बोंब उठवली जात आहे. खासकरून "दलितांविरुद्ध" अपमानकारक जोक्स  फिरवले जातात. त्याचे मूळ  कोण लक्षात घेत नाही.

मी माझ्या शाळेत  अशी कितीतरी पोरे बघितली आहेत की त्यांच्यात इतकी क्षमता होती की त्यांना जर योग्य दिशा आणि मार्गदर्शन भेटला असता तर तर ती पोरे आज त्या क्षेत्रातील बंदी हस्ती झाली असती.
मग आशिष खटाव तालुक्यातील राजापूरच्या आशिष घनवट असू किंवा रेठऱ्याचा प्रशांत घोडके असू दे. गावाकडची गुणवत्ता कायमच दुर्लक्षित राहिलेली आहे.
माझ्या शाळेत अजून एक मुलगा होता  "भूषण"  म्हणून  तो जरा स्लो होता. पण संगीतात त्याचा इंटरेस्ट होता. त्याला त्याचा पुढे काय झाला हे अजून समजला नाही.
गावाकडची मुले एक शॉट मध्ये  बॉल फोडतात आणि एका बॉल मध्ये स्टंप, कुठलीही साधना ट्रैनिंग न घेता  अस्सल सुरेल आवाजात गातात. माझा जिवलग मित्र  हिंगे तो शाळेत असताना असा गायचाना की बस्स ऐकतच राहावे.
ईथली व्यवस्था इतकी हुशार आणि कपटी आहे की ज्यावेळेस खालचा मजल्यावरची वर यायला लागली  त्यांनी प्रत्येक मजल्यावरच्या विकल्याजाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विकले आणि परत एक ठराविक समूहाला पुढे ढकलले. आधी शिकायचं अधिकार   नव्हता तर जे जातीतील काम आहे तेच करावे लागायचे ज्यां कामाला मुळीच डिग्निटी नव्हती. मग शिकायचं हक्क भेटला की  सगळे जण शिकून मोठे होण्यासाठी धडपडू  लागले आणि रेस सुरू झाली. तोपर्यन्त सगळ्या पोटेन्शियल क्षेत्रात एक समूह पुढे  आला. आणि   आपले पाटी पुस्तक करत राहिलो.

 ही जी व्यवस्था आहे ना हि "दलबदलू" आहे.
कधी अचानक ही फुकटच्या भेटलेल्या  "शहरी"  ट्याग वर ग्रामीण ला स्पर्धेतून अनट्याग करते. तर कधी अचानक  धर्माच्या नावाखाली दुसऱ्या धर्माला खाली दाबते. कधी  "तो" च्या बळावर "ती"  ला  घरात दाबून ठेवते तर कधी "गोऱ्याच्या " खोट्या प्रकाशात काळ्याला अंधारात मिटवून टाकते. आणि कधी  फुकटच्या जातीच्या  जोरावर एखादा जोशी , कुलकर्णी किंवा कुठलातरी " कर" अवघडे, वर  "कांबळे" टाकून आवाज दाबतो.

आज जास्त काही बोलायचं मला "आरक्षणासाठी" खूप काही लिहायचा आहे माझ्या  प्रत्येक  पोस्टवर किमान एकतरी मला भेटतोच जो मला कायम " आरक्षणाच्या भिंगातून बघतो आणि तेच प्रश्न विचारतो.  त्यासाठी मला एक बेस तयार करायचं आहे तो करत आहे. 

Wednesday, 11 May 2016

"वाळीत" कथा

त्यावेळेस मी नुकताच सहावीला गेलो होतो. नवोदयला प्रवेश मिळाला होता. माझा जर जातीच्या दाखल्याचा प्रोब्लेम झाला होता. त्यामुळे मी जर उशिरा आलो होतो शाळेत. बाकीची सहावीची  नवीन मुले सेट होत आलेली. मी त्यांच्यात पण नवा. मला खूप  व्हायचे. मी शिवालिक ला आलो होतो तिकडे माझे  मित्र प्रव्या ( प्रवीण) होताच अनिकेत आणि म्हैश्या ( महेश ) हि मंडळी होती.   माझा स्वभाव  मुळातच "प्रस्थापित" व्यवस्थे विरुद्ध रिबेल करणारा असल्या मुळे माझी   कुणाबर पण लगेच भांडण व्हायचा आणि महेश तर अजूनच होता नावाप्रमाणे त्याने एकदा सागर भोसलेला दम दिला
"तुला भस्मच करीन "  असो मूळ  गोष्टीवर येतो परत.

नवोदयला दिवाळीनंतर आम्ही रुळलो  मग एक एक किस्से कळायला लागले कि इकडे काय सिस्टम आहे. कोण कसे आहे असा बराच काही  काही पण एक  गोष्ट मात्र मला खटकली होती ती  म्हणजे  "  एखाद्या  पोराला वाळीत टाकणे"
मग सिनिअर मुलांकडून समजायला लागले कि इकडे कोण नीट नाही राहिला तर त्याला वाळीत टाकतात बेसिकली त्याच्याबर कोणी बोलत नाही त्याला कोण घरून अनेलेल खायला देत नाही. मी अजून पर्यंत शाळेत असा कोणता उदाहरण पहिला नव्हता. फक्त कुण्या सिनिअर कडून ऐकला होता कि निलेश भैय्याला का गुलाब भैय्याला वाळीत टाकले होते ( निलेश भैय्या आणि गुलाब भैय्या  जर माहिती  खोटी  असल्यास माफ करावे लगेच हा भाग वगळून टाकतो)

पण आम्हाला खरा अनुभव आला तो आम्ही सातवीत गेल्यावर  आमच्या हाउस मध्ये क्रिकेट चा खूप वेड होता आणि आम्ही दर रविवारी सकाळी ५ ला उठून जायचो खेळायला एक टीम असायची भारत कदमची आणि एक टीम सुनीत पानस्करची  आम्ही बाकीचे त्यात वेगळे वेगळे व्ह्याचो त्या क्रिकेट पायी इतकी भांडण झाली एकदा पूर्ण विंग मधील सगळ्या पोरांनी भारत भैय्या , मी प्रव्या  मंदार भैय्या आणि एक दोघांना वाळीत टाकले, पूर्ण खुन्नस चालायची मंदार भैय्या जर बॉडीने आडदांड होता त्याला सगळी विरोधी पार्टी टरकून असायची . तो एकच आवाज द्यायचा

"ए जग्या गप बस का तिथे येउन सांगू"
बस सगलि विंग शांत ! मग आम्हाला मनातून खूप आनंद व्हायचा. हे असे पंधरा वीस दिवस चालले मग एका प्यारेटस डे ला भारत भैय्याचा  प्यारेटस  किस्सा समजल्यावर त्यांनी सगळ्यांना बोलावून आमचा "मनमिलाप"  केला.

पण हा मनमिलाप  जास्त काळ टिकला नाही कारण त्यावेळेस आमच्या शाळेत निलेश भैय्या आणि प्रसाद गुरव हे "भक्तघोषित " हिरो होते. म्हणजे ते होते तसे कर्तबगार. त्यावेळेस निलेश भैय्या सारखा आमच्या हाउस ला यायचा ( खर सांगतो खूप राग यायचा आम्हाला )  ती सगळी मिळून खो खो खेळायची  मग इकडे प्रसाद गुरव ची कब्बडीची दुसरी ग्यांग तयार झाली आणि आम्ही जे  व्योलीबोल , फुटबॉल असले खेळ खेळायचो त्यांची पंचाईत झाली . "
अलिप्त" राहायला आम्ही काय नेहरूंची पुस्तके वाचली नव्हती.  मग काय तर घुसा जिकडे मोका मिळेल तिथे.
झाले शाळेत अजून एक प्रियंका नावाचे वेगळेच प्रकरण ट्रेंड वर होते. आमचा कायच संबंध नाही तर आम्ही चवीने सगळे किस्से ऐकायचो आणि दुसर्याला अजून मसाला लावून सांगायचो. असो   या मुळे  आमच्या मनमिलापा मध्ये फुट पडून परत तेच सुरु झाला आता फक्त भारत भैय्या तिकडे गेला होता मी मंदार भैय्या गुरुदत्त तांबे, प्रव्या , आणि अनिकेत आम्ही सगळे वाळीत पडलो होतो त्यांच्यामताप्रमाणे पण आम्हाला घंटा फरक पडला नव्हता आम्ही ते एन्जॉय करत होतो. परत निलेश भैय्याची दहावी झाली कि तो घरी गेला परत आमचा गाडा सूर झाला नीट.
आम्ही त्यावेळेस आठवीत जाणार होतो मला चांगले आठवते एकदा मी प्रव्या प्रशांत घोडके अनिकेत आणि बाकीच्या पोरांनी मधल्या  प्यासेज  मधे जाऊन ठरवला होता कि आपल्या काळात असा होऊन  दयायचा नाही आणि खरच ते झाला नाही. मग परत वाळीत टाकणे हा प्रकार काही घडला नाही किंवा घडल असेल तर माझ्या कानावर नाही आला. आम्ही अकरावीला आलो त्यावेळेस शाळेत नववीला नवीन पोरे आली होती
गावाकडची काही खेडवळ तर काही इंग्लिश मिडीयम ची नुसती इंग्रजीतच हुशार पोरे होती त्यात उत्कर्ष  नावाचा  मुलगा होता नवोदय मधे मी पाहिलेला सर्वोत्कृष्ट चित्रकार होता.  तो जरा नवीन होता त्याचाकडून एकदा कायतरी चूक झाली त्याने घरी सांगितला आणि खोबरगडे सरांनी म्याटर खूप मोठा करत प्रिन्सिपल सरांकडे नेला मग सगळी मुले चिडली याला वाळीत टाकला. मग याच्या नरक यातना सुरु झाल्या  त्याच्या बेडवर रात्री लाईट बंद करून बूट मारणे , मेस मधे सगळे त्याच्या पुढे जाने. एकदा तर कहरच केला त्याची सोशल साइन्स ची वहीच फाडून टाकली त्याने खूप मेहनतीने रात्रभर जागून लिहिली होती तीच फाडून टाकली होती मग उद्या राउत सरांनी त्याला खूप मारला आणि मी त्याला मारताना पहिल्या मुले मी माहिती काढली कि बाबा इतका का रेटला मग मला सगळा किस्सा समजला  मला धक्काच बसला मी मग रात्री जाऊन राउत सरांशी या विषयावर बोललो मग सरांनी त्याला जर सूट  दिली. त्याला त्रास देणारे माझेपण मित्र होते मला काहीच करता येत नव्हते पण त्यांनी पण हळू हळू त्याचा शारिरीक त्रास कमी केला पण त्याला वाळीतून बाहेर नाही काढला ते वर्ष गेले आणि आम्ही मग बारावीत आलो होतो. पूर्ण वर्ष निवांत गेले आमच्यातील "पश्या " हा हिरो झाला होता सगळे जुनिअर  फिदा होते, एक श्रीकांत म्हणू मुलगा होता तो त्याची खूप कॉपी मारायचा . जानेवारीचा महिना होता मला माझ्या एका जुनिअर च्या मित्राने सांगितले कि
मिलिंद भैय्या  प्रथमेश भैय्याला आठवीच्या पोरांनी वाळीत टाकले आहे कारण  आणि श्रीकांत भांडण झाले आणि मग   "जात"    काढून
 त्याला वाळीत टाकला शाळेत असताना मला बसलेला तो सर्वात मोठा धक्का होता आम्ही अजून जात बघत नाही आणि हि शेंबडी पोरे आताच असा  करायला  लागली माझ्याबर महेश पण होता , अनिकेत पण होता प्रव्या पण होता आणि पश्या पण होता आम्ही ठरवला यांना राउंड मध्ये घ्यायला पाहिजे ती रात्र जाऊन दिली रविवार होता दुपारचा मस्त चिकन खाऊन  झाले होते .  आम्ही शिवालिक च्या बारावीवाल्यांनी  ठरवला होता  आज  करायची गेम मग मी एका पोराला त्याच्या हाउस मध्ये पाठवला आणि श्रीकांत ला आमच्या हाउस ला बोलावले तर त्याने उलट मलाच निरोप पाठवला कि
 "मिलिंद भैय्याला सांग तूच ये म्हणून"
परत त्याला दुसरा निरोप जो गेला ते ऐकून तो दुसऱ्या मिनिटाला शिवालिक सिनिअर त्याचा ग्यांग सोबत हजर !

आम्ही हाउसच्या मागचा दर खोललं आणि त्यांना भिंतीला चिटकवून उभा केला तर अजून एक भारी माहिती भेटली याचे राईट आणि लेफ्ट हयांड होते मग त्यांना पण तसाच त्याचा बाजूला उभा केला आणि ज्या दिल्या सटासट गालावर पोरांनी.  ३ पासून ४:३० पर्यंत हा शो सुरु होता. सगळा झाला कि त्यांना समजावला कि वाळीत टाकणे का चुकीचे आहे, आपल्या शाळेत आपण जात कधीच बघत नाही आपली परंपरा आहे ती. दुनियेत काय जरी झाला तरी चालेल आपण कायमच  एकत्र  राहायचा. श्रीकांत ला पण समजला त्यांनी पण हि परंपरा पुढे कायम केली !

म्हणून मला खूप  अभिमान आहे  नवोदयचा 

Thursday, 31 March 2016

खिश्यातल्या पुऱ्या !


आम्ही  त्यावेळेस तिसरीला होतो , आमच्या कॉलनीच्या जवळच होती आमची  शाळा जिल्हा परिषद प्राथमिक आणि केंद्र शाळा कोडोली हे माझ्या शाळेचे नाव.  घराजवळ शाळा असल्याने मी काय कॉलनीतील , धनगरवाडीतील विद्यार्थी डबा आणायचे नाहीत. २ वाजता जेवायला सुट्टी व्हायची मग सुट्टी झाली आम्ही सरळ घरी जेवायला. जेवायला शाळा सुटली कि एकदम मस्त चित्र दिसे ,  काही काही पोरांना संडासला लागलेली असायची ती जरा जोरात सुटायची घरी, वर्गातील चांगल्या जी चांगल्या घरातील मुले होती ती गुपचूप घरी जायची, माझा एक मित्र होता त्यावेळेस अमोल म्हणून आय मीन अजूनही आहे, अमोल हा आमच्याच कॉलनीत राहायचा. माझ्याच वर्गात होता. मी आणि अमोल मात्र पूर्ण रस्त्यावर मस्ती करत घरी जायचो , अमोल जर जास्तच खोडील होता , पोरीना चिडव हिला काय बोल तिला काय बोल असले धंधे करायचा पण त्याचात अश्लीलता नव्हती , ना कुठल्या मुलीला दुखवायचा विचार होती ती निक्खळ चेष्टा.
माझी आई त्यावेळेस देगाव फाट्यावरच्या हॉटेल मधी होती कामाला , ती रात्री येताना हॉटेल मध्ये शिल्लक राहिलेले पुरी , वडा , कांदा भजी  इत्यादी घेऊन यायची , दुनियेच्या नजरेने आम्ही कितीही गरीब असलो तरी मला कधी आम्ही  गरीब आहे  वाटायचा  नाही, मी कायम खुश असायचो कारण वर्गात दर शनिवारी सगळ्या शिक्षिका बाहेरून भजीपाव , पुरीभाजी मागवून खायच्या त्यावेळेस आमच्या वर्गातील श्रीमंत घरची पोरे त्या वडापाव , भजीपाव कडे लाळ गाळत बघत बसायचे . मला तर हे घरी दररोज भेटायचे म्हणून मी स्वताला कधी गरीब मानतच नव्हतो . असो

गोष्ट अशी आहे कि मी दुपारी जेवण झाला कि शाळेपर्यंत जातोपर्यंत कायतरी टाईमपास म्हणून पुऱ्या, कांदाभजी, वडा इत्यादी घेऊन जायचो आणि रस्त्याने खात जायचो. येताना मी आणि अमोल सोबत असायचो पण जाताना नसायचो तो जरा उशिरा यायचा. मी आपला माझ्याच धुंदीत खिशातून थोडा थोडा बाहेर काढून खात खात शाळेत जायचो. एकदा असाच दुपारचे जेवण  करून मी शाळेत चाललो होतो , चड्डीच्या खिशात चांगल्या ७ पुऱ्या नीट घुसवून भरल्या होत्या.
मला रस्त्यातच अमोल भेटला , मग  आम्ही दोघेजण निघालो डुलत डुलत मी आपला माझ्याच नादात खिश्यातून एकेक पुरी खात खात चाललो होतो, पहिली पुरी काढली , अमोल ला वाटले मी त्यालाच द्यायला काढली पण तेंव्हा कुठे असले ज्ञान मला , त्याने पुरी बघताच बोलायचं थांबला आणि माझ्याकडे बघू लागला , मला काय माहित ह्याला पुरी पाहिजे , मी आपली तशीच आख्खी पुरी तोंडात टाकली , परत दुसरीला पण तसाच झाला असा करत करत मी शेवटच्या पुरीला आलो, आणि शेवटची पुरी  खिश्यातून काढली आणि तोंडात टाकणार तेवढ्यात अमोल मला म्हनला "लका  कांबळे मला दिकी पुरी ,मला पुऱ्या लय आवडत्यात  मघपसन बघातुया एकटाच खातुया व्हय"  मी त्याला ती पुरी देऊन टाकली.  च्यायला मी म्हणलो  लका आधी का नाही सांगितला तीन तरी पुऱ्या दिल्या असत्या , तो म्हनला मला वाटला तूच देशिल स्वताहून "  आता स्वताहून द्यायची अक्कल असती तर दिल्या असत्या किनाई"
त्यानंतर  माझ्या मनावर कायमचा बिंबला गेला  कि आपण काही खात असेल आणि जर सोबत कोण असला तर ते वाटून घ्यायचा , थोडा हिस्सा त्यालापण द्यायचा.   हि चांगली सवय मला लागली पण खिश्यातून पुऱ्या न्हायची सवय काय लौकर नाही सुटली .


भेटू परत पुढच्या वेळी ते पण दुसऱ्या मित्राची कथा " अनिकेत आणि ऑफ पिरिअड"



Wednesday, 30 March 2016

असा माझा महाराष्ट्र

देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून मिरवणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र ! पण गेले काही वर्ष  राज्याची आर्थिक , सामाजिक, स्थिती ढासळत आहे , पण कुणालाच याचे पडलेले नाही सगळेजण फक्त आपले घोडे पुढे दामटवत आहेत , नक्की झालय काय तरी काय असा या महाराष्ट्रात ?  याचा हा आढावा !
महाराष्ट्र हे देशातील एक विकसित राज्य आहे , शैषणिक , आर्थिक ,सामाजिक अश्या सगळ्या क्षेत्रात खूप पुढे आहे,  आपले राज्य हे औद्योगिक दृष्ट्या  महत्वाचे राज्य आहे परदेशी गुंतवणूक  हि कायम या राज्यात येत असते गेल्या दोन वर्षातील वेगवेगळे रिपोर्ट्स पाहिले तर महाराष्ट्राची पीछेहाट होताना दिसत आहे , नुकत्याच आलेल्या व्यापार वृद्धी च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे , महाराष्ट्रातील अनेक उदयोग आजारी पडत आहेत , मोठ्या मोठ्या कंपन्या राज्य सोडून जात आहेत, एम आय डी सी   तील उद्योगाकडे कुणाच लक्षच नाही आहे, मुंबई पूणे नाशिक अश्या मोठ्या शहरांचे ठीक चालू आहे पण सातारा , सांगली , विदर्भातील काही एम आय डी सी मरायला टेकल्या आहेत.
शेती हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण शेतीच्यापुरेश्या आणि योग्य  सुविधा   नसल्या मुळे शेतकरी मागासलेला आहे, पाटबंधारे खात्याने  प्रचंड पैसा खाल्ला आहे .  साधा कालवा नाही इकडे नीट , आणी आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन नाही , पूर्ण महारष्ट्रात दुष्काळ पडला आहे, शेतकरी कुठलाही ऋतू असू दे आत्म हत्या  करतच आहे ,  फक्त उस हेच पिक येत का महाराष्ट्रात ? साखर कारखाने कोटीचा पैसा खातात आणी मग विशेष पैकेज देऊन जगावयाचे त्यांना का आणी कशासाठी ?  उसावर जास्त लक्ष दिल्यामुळेच शेतीत सगळी विषमता आली आहे ,मराठवाडा ,विदर्भातील शेतकरी मरत आहे . उत्पादन होत नाही आहे मग  जे आहे त्याचे दर वाढणारच .  इथल्या कलाकारांना खेळाडू यांना मदत करावी लागत आहे , सरकारने वेळीच योग्य उपाय योजना केल्या असत्या तर हि वेळ आली नसती.
इथे बेरोजगारी तर भयानक आहे इथल्या मुलांनी ५-६ लाख रुपये खर्चून शिक्षण घेतले  आहे कुणी अभियंता , कुणी एम बी ए वाला सगळेच १०-१५ हजारा वर  काम करत आहेत , ते पण कुणी एम आर , कुणी कॅल सेंटर मध्ये नोकरी करत आहे , मोठ्या शहरात राहणे म्हणजे कमीत कमी ८ हजार लागतात , स्वतःसाठी किती , कर्ज फेडण्यासाठी किती , घरी किती आणि बचत  किती सगळा गणित अवघड होऊन बसला  आहे, हि परिस्थिती नोकरी मिळाल्या पोरांची आहे ,तर
 नोकरी न मिळाल्याची तर अजून बिकट  , घरून फोन येतो दररोज मिळाला का जॉब ? काय उत्तर देणार ? सगळाच भयानक आहे,
 पण सरकार ला हे सगळे माहित आहे का नाही हेच समजत नाही आहे .
अजून एक समस्या म्हणजे  इथे वाढत जाणारे दलितांवर अत्याचार , हा आपला समाज कधी  सुधारणार काय माहित का हेच चालू राहणार तसाच , नगर जिल्हा तर दलितांसाठी नरक झाला आहे दर महिन्यात येतेच   बातमी हत्या , बलात्कार ,  इथल्या शिकून न शिकलेल्या लोकांना समजतच नाही आहे आपण कुठल्या दिशेला जात आहोत , महाराष्ट्रातील दलित लोक बाबासाहेब आंबेडकरांना  मानतात म्हणून हा समाज कायद्यला धरून चालत आहे , एका जर यांनी हातात शस्त्र घेतला तर समजाची घडी कोलमडून पडेल पूर्ण, महाराष्ट्रातील लोकांना गरज आहे ती मुळात प्रबोधनाची पण सगळ्यांना फक्त बोलण्यात हवा आहे प्रबोधन वागण्यात नको .
शेवटचा एक मुद्दा  म्हणजे सरकारची विनाकारण लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावणे , अमुक दिवशी मांस बंदी , हे खाऊ नका ते खाऊ नका , मुलीनी असा वागा तसा वागा , जे मोरल पोलिसिंग आहे ते कुणालाच नको असते , सरकारने जरून एक विचारधारा जपावी पण समाजातील सर्वात लहान भागाला पण त्या विचाराने त्रास नाही झाला पाहिजे,तुमची विचारधारा सामान्य माणसावर लादु  नका  नाहीतर दुसरी  फ्रेंच क्रांती व्हायला वेळ नाही लागणार.
अश्या बऱ्याच समस्या आहेत इथे पण करणार काय आमचे सरकारचे लक्षच नाही आहे ! आणि मुख्य जबाबदार तर आम्हीच आहोत, आम्हीच  दिले आहे मत त्यांना !
मग यावर नक्की उपाय काय हे पाहू आपण पुढच्या लेखात

पटेल आरक्षण : नाण्याची दुसरी बाजू

गेले वर्षभर हार्दिक पटेल " पटेल" समाज्याला आरक्षण देण्यासाठी लढत आहे .   " पटेल" समाजासाठी आरक्षण हवा आहे म्हणून आंदोलन करत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ?
पटेल समाज हा गुजरातचा सर्वात प्रगत श्रीमंत आणि राजकीय शक्तीवर वर्चस्व  असणारा समाज अहे. सगळ्यात जास्त जमिनी हक्क त्यांचा आहे , उद्योग क्षेत्रात  पटेल समाज  पुढे आहे , सगळ्यात जास्त NRI त्यांचे आहेत ,१/३ भाजपा चे आमदार  पटेल आहेत , राज्य मंत्रिमंडळात सगळ्यात महत्वाची खाती पटेल समाजाकडे आहेत .  शिक्षण संस्था  त्यांचा आहेत, अश्या समाजाला न्यायालय पण आरक्षण नाकाराणारच  आणि तेच झाला
मग इतका सगळा असताना का गरज पडली पटेल समाजाला आरक्षणाच्या मागणीची ? त्यासाठी गुजरात जाणला पाहिजे.  खूप काळापासून  सरकारी नोकरी ची भरती तिकडे झाली नाही , नाही म्हणायला गेल्या पाच वर्षात फक्त १०००० लोकांना सरकारी नोकरी मिळाली आहे  ती पण पोलीस आणि शिक्षण सहायक म्हणून , हे  हेच दर्शवत  आहे की मुबलक नोकरी निर्माण नाही झाल्या सरकारी क्षेत्रात  आणि ज्या संधी झाल्या त्या घेण्यात  पटेल समाज  मागे पडला .
मग प्रश्न येतो इतका प्रगत समाज मागे का पडला त्याचे उत्तर दडला आहे गुजरात शिक्षण व्यवस्थेत  !
एक आढावा घेऊ गेल्या २५ वर्षातील गुजरात आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा  यांचा मुळात हि परीक्षा देणारे कमी आहेत पटेल समाजातर्फे, आणि हि परीक्षा पास केलेले विद्यार्थी आहेत दलित ,आदिवासी  इतर मागास वर्गातील, त्यांना आरक्षणाचा जरूर लाभ झाला असेल , पण बाकीच्या राज्यातील  खुला वर्गातील तर मुले हि परीक्षा पास होत आहेत .
मुळात समस्या आहे ती गचाळ शिक्षण व्यवस्था , प्राथमिक शिक्षणाचे तर तीन तेरा वाजले आहेत  शाळांची स्थिती खूप खराब आहे . शिक्षण फक्त देखाव्यासाठी केला गेला “विकसित राज्य” च्या नावामुळे कुणाचा लक्ष पण नाही गेला तिकडे . महिना ३००० रुपड्या वर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली  ज्यांचा दर्जा हि खालावलेला होता आणि मुळात त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार सरकार . याच मुले गुजराती तरुण मागे पडत गेला बाकीच्या राज्याच्या युवकांच्या तुलनेत .  कुठल्याही मोठ्या शहरात बघा  दुसऱ्या राज्यांची पोरे नोकऱ्या करताना दिसतात पण गुजराती अपवादानेच दिसतील. गुजरात सरकार याच आंधळ्या विश्वासात राहिले कि अजून खूप राज्य आहेत आपल्या पेक्षा मागासलेली शिक्षणाच्या क्षेत्रात लोकांच्या मनावर पण हेच बिंबवण्यात आले . पण खरी परिस्थिती खूप वेगळी आहे शेतीतून मुबलक पैसा येत नाहीये पटेल काय कोणताच समाजाला ज्याद्वारे ते कदाचित गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकतील  आपल्या मुलांना . आणि वैद्यकीय आणि अभियांत्रिकीची फी तर खूप जास्त आहे.
याच मूळे पटेल समाज एकटावला आहे आरक्षणाच्या मागणी साठी जशे दलित, आदिवासी, इतर मागास वर्गातील युवक निदान आरक्षणाचा लाभ घेऊन नोकऱ्या मिळवत आहेत तसाच ते हि करू इच्छितात .
तरुण  युवकांची स्वप्नाचा चुराडा होत आहे आणि मग येते ते frustration निराशा, आणि जन्माला येतो हार्दिक पटेल , जो मागणी साठी हाती बंदूक नक्षलि मार्ग घेण्याचा  खुलेआम  इशारा देतो , त्याला पूर्ण समर्थन पण मिळणार भरगोस पाठिंबा पण कारण  बेरोजगार युवकांकडे एकच हत्यार असतो तो म्हणजे आंदोलन !
आता तुम्हीच ठरावा नक्की कोण दोषी

Tuesday, 29 March 2016

मलाही वाटते

     


मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी   कथित  "उच्चवर्णीय " आणि पहावी
मारणाऱ्या दलितांची "उतरंड" समतेच्या लढ्यासाठी  !

मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी  "बुराज्वा" आणि पहावी
घाम गळणाऱ्या गरीबाची "होरपळ " भाकरीच्या तुकड्यासाठी !


मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी  " सत्ताधीश " आणि पहावी
लाथाडलेल्या जनतेची "तडफड" तग धरण्यासाठी !

मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी  " राम  " आणि पहावी
धरती फोडून  अग्निपरीक्षा  देणाऱ्या  सीतेची "धडपड" पवित्र्यासाठी ! 

Friday, 11 March 2016

देवीची करणी आणि माझा ड्रेस

                               
आमचे घर म्हणजे  माझी आई तिला सगळे आक्का म्हणत , आणि आम्ही तीन भाऊ पैकी मोठा भाऊ त्याच्या बायकोबर दुसरीकडे राहत होता, दुसरा भाऊ म्हणजे मी शिकायला बाहेर होतो आणि छोटा भाऊ एका दवाखान्यात कामाला होता. मोठा भाऊ काही लक्ष देत नवता घराकडे आणि माझा नोकरीचा काही पक्का नव्हता, आणि छोटा भाऊ चळवळीत शामिल झाला होता.  आईला  खूप काळजी वाटत होती कि कसा होणार मुलाचं . आक्का जात होती एका कंपनीत कामाला , जेवायच्या सुट्टीत असाच विषय निघत असेल आमचा,कि पोरांच कधी  आणि कस चांगल होणार , आक्काने पूर्ण आयुष्य घातले होते आमच्या साठी हॉटेल मध्ये काम करून , तर कधी भंगाराच्या दुकानात काम करून . तिला नक्कीच वाटत असणार कि तिचे कष्ट वाया जाणार , आक्काची हि अवस्था बघून तिच्या कामावरच्या एका बाईने सांगितले कि आमच्या इकडे एक देवरुषीण आहे जी करते सगळे नीट , आणि बरीच उदाहरने दिली हिचा पोरगा ह्या पोरीच्या नादात येडा होता आता सुधरला, तर कोण घरात लक्ष द्यायला लागला तर कुणाला जॉब लागला   असे  बराच काहीकाही .

झाल आक्काच्या डोक्यात पक्क झाल कि आता हाच लास्ट पर्याय मग असाच एका मंगळवारी आमची आक्का आणि ती दुसरी बाई गेले त्या  देवरुषीण कडे तर तिची वेगळीच तर तिच्या अंगात यायचं ते पण फक्त ५ ते ७ ला मग तोपर्यंत अक्काने वाट पहिली . झाले एकदाचे वाजले ५ आली देवी अंगात आणि सांगितला तुझा मरुण १५ वर्षे झाली , तीन पोरे आहेत तुला, मोठे लक्ष देत नाही , दोन नंबरचा  हुशार आहे जबाबदार आहे आणि तिसराचे की खरा नाही . आक्काचा विश्वास बसला कि खरेच आहे सगळा . आता हि देवी आपला काम करणार मग परत आक्काने विचारला काय करू मग मी , अंगात आलेली देवी बोलली तुझ्यावर घरातल्यानीच करणी केली आहे. ती करणी तोडायची असेल तर अमावास्येला शाळेच्या  माळावर एक उलट्या पकाची कोंबडी , पिवळा भात हळद कुंकू  आणि स्वखुशीने  द्यायचे असतील  तर ११११ रुपये  दे वाह म्हणून …

आता आक्काला पगार एवढासा त्यातून हा खर्च म्हणजे १५००-१६००० रुपये जाणार ती म्हणली बघू करते म्हणून.  त्यानंतर  ती देवरुषीण बी सारखा फोन करून विचारू लागली कि कधी करायचा कधी करायचा , आणि इकडे माझा छोटा भाऊ जास्तच चळवळीत जात होता म्हणून आक्काला वाटत होते कि खरच कुणीतरी करणी केली आहे. मला यातला काहीच माहित नव्हता . आक्का मला दरमहिना १००० रुपये पाठवायची  जानेवारीच्या महिन्यात आक्का मला म्हणाली  तुला या महिन्यात पैशे नाही पाठवले तर चालतील का ?
मला काहीच समजेना कारण मला जॉबची  मुलाखतीसाठी कपडे  घ्यायचे  होते म्हणून मि थोडे पैशे साठवून ठेवले होते आणि ड्रेससाठी कमीत कमी हजार रुपये तरी जाणार होते, त्यात कॉलेज संपत आलेले जर पैशाची गरज होती
मला वाटला काहीतरी अडचण असेल म्हणून आक्का नाही म्हणत असेल मी पण म्हनलो चालेल आणि सहजच विचारले कि काय अडचण आहे आणि आक्काने मला सगळी स्टोरी सांगितली , माझ्या कपाळातून झिणझीण्या बाहेर आल्या, आणि   डोक्यात विचार आला
आयला ब्रान्डेड  ड्रेस घेणार आहे मी एकदाच, आणि त्यात  हि देवी आणि तिची करणी मधी आली
माझा डोकच सटकला होता एकदम ,मग मी पण एक आयडिया केली सांगितला कि ह्या  आमची मुलखात एप्रिल  मधे आहे , तू आता दे मला पैशे आणि
 मार्च मध्ये कर तू तुला जे करायचे ते , आक्काने थोड्या नाखुशीने पाठवले  मला पैसे . मी घेतले इकडे एक मस्त  पैंट शर्ट. झाला फेब्रुवारीच्या २ तारखेला माझा इंटरविव झाला .
मला  नोकरी लागणारच  याची खात्री होती संध्याकाळी घरी फोन करून सांगितला कि नोकरी लागली म्हणून  आक्काला एकदम आनंद झाला , मला जितका आनंद झाला नव्हता तितका आनंद तिला झाला . कष्टाचे चीज झाल्यासारखा वाटले. झाले दोन तीन दिवसात मी पूर्ण माहिती काढली  त्या देवरुषीण बाईची, ती पण बिचारी पोट भरायला आलेली पण तिला समजला होता कि लोक फसतात ते देवाच्या नावावर म्हणून तिने हे सुरु केले होते . आणि त्या दुसर्या बाईने या देवरुषीण बाईला आमच्या आक्काबद्दल सागितलं होता आधी , म्हणून तिने  अंगात आल्यावर सगळा बरोबर सांगितला.
मी रात्री आक्काला फोन करून सगळा खरा खरा सांगितला कि मी खोट बोललो तुझ्याबर , आणि त्या देवरुषीण बद्दल पण सांगितला आणि आक्काला बोलाव आग हे सगळे आपल्याला देवाच्या नावावर लुबाडतात , आता तू मला पैशे नसते दिले तर मी कुठून कपडे घेतले असते आणि कशी मला नोकरी लागली असती ?  आक्काच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .
उन्हाळ्यात जेव्हा घरी आलो तर आमच्या देवार्ह्यात एकपण देव नव्हता 

Wednesday, 2 March 2016

पेन का पाना

                                           

माझा एक मित्र आहे लहानपनीचा  "टोया" म्हणून.  तसा त्याचा  नाव तसा खूप भारी आहे" निखील"  
 पण  काय माहित का  आमच्या शाळेत ज्याचे  नाव निखिल त्याला सगळे "टोया" म्हणायचे 
तसा  तो अभ्यासात हुशार होता पण अभ्यास करतच नसायचा. पाचवीत त्याने नवोदयचि परीक्षा दिली होती    आणि त्याची निवड नवोदय मधे झाली झाला अख्या गावात हुशार मुलगा म्हणून ख्याती झाली नवोदय मध्ये झालेली निवड हे बहुतेक मुलांच्या आयुष्यातील पहिले यश असते त्यामुळे सहावीचे वर्ष तसे हवेतच जाते, अजाण वयात मिळालेले यश निट हाताळायला कसा जमणार लगेच ? या लाटेतच त्याचा सहावी सातवीची  वर्षे सरली, 
 पुढे  आठवीला गणित आणि विज्ञान  इंग्रजीतून झाले आता आधीच  गणित  मराठीतून येत नाही आणिआता  हे इंग्रजीतून शिकवला जाणार म्हणजे आधी चुकून २५ पैकी ९ तरी भेटायची आता तितका पण भेटणे मुश्किल झाला. 
आठवीची पहिली सहामायी परीक्षा झाली अपेक्षेप्रमाणे याचा त्रिफळा उडाला होता, त्याचे  वडील त्याला सुट्टीसाठी घरी न्यायला आले होते, होस्टेल च्या बाहेरच होस्टेल चे हाउस मास्टर  मिश्रा सर  खुर्ची टाकून एकेकाची कुंडली आणि कामगिरी वाचून दाखवत होते. याचा पण नंबर आला सर खूप ओरडले सांगितले कि मस्ती करतो मेस मधून पापड चोरतो, बोरे आणायला बाहेर जातो असाच खूप काही काही. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतला आणि घरी आले. 
 याचा आपला चालुंच असायचा दिवसभर इकडेतिकडे फिरायचा टीवी बघायचा निवांत राहायचा. पूर्ण सुट्टीभर वडील  त्याला एका शब्दाने पण बोलले नाहीत झाला हा खूप खुश होता कि  पप्पा खूप चांगले आहेत काही बोलले नाहीत . सुट्टी संपायला दोनतीन दिवस बाकी होते , संध्याकाळची वेळ होती याचे पप्पा दारात खाटेवर बसले होते हा आपला गावभर  फिरून आला हातपाय धुतले आईकडून चहा बटर घेतला आणि बसला तेवढ्यात याच्या पप्पानी याला जवळ बोलावले हा पण गेला लगेच आणि त्यांनी याला समजवायला  केली कि आता वेळकाळ बदलली आहे , शिकण खूप गरजेचे आहे, आमच्या काळात तसा चालत होते आता इथून पुढे चालणार नाही तू अभ्यासावर लक्ष दे असा बराच काही काही शेवटी अजून एक त्याला सांगितला कि आता तू ठरव कि तुला आयुष्यात पाना हवाय का पेन ? जर पाना हवा असेल तर शाळा सोडून दे आणि माझ्याबर ग्याऱेज मध्ये येत जा तेवढीच मला मदत होईल घरच आहे ग्याऱेज आणि पेन हवा असेल तर  अभ्यास कर या पुढे नीट मनलावून.  तू विचार कर एक रात्र आणि मला सकाळी सांग तुझा निर्णय. 
बिचारा १२-१४ वर्षाचा शेंबड  पोर ज्याला अजून निट  चड्डी घालता येत नव्हती कि शेंबूड पुसता येत नव्हता त्याला चक्क आयुष्याचा निर्णय करायचा होता ते पण एका रात्रीत. हा आपला रात्री उशिरा पर्यंत दोन्ही बाजूनी विचार करत होता कधी पेन वरचढ होत असे आणि पेन वरचढ झाला कि त्याला इंग्रजीतले गणित दिसायचे तर कधी  विज्ञान दिसायचे , खूप सारा होमवर्क  दिसायचा ते दिसला कि लगेच पाना वरचढ व्हायचा , असा करत करत तो कधी झोपला त्यालाच समजला नाही 
 झाला सकाळी टोया  उठला अंघोळ केली नाश्ता केला, आतल्या खोलीत जाऊन पान्याची एक छोटी थैली होती त्यातून एक पाना काढला आणि गेला पप्पानजवळ आणि म्हणाला 
"दादा मी ठरवले  कि मी पाना घेणार हातात" 
दादा  चहा पीत होते चहाचा कप  तसाच बाजूच्या  खिडकीवर  ठेवला आणि अशी सणसणीत खाडकन कानाखाली ओढली कि बस्स दिवसभर याचा गाल  आणि कान लाल होते. आणि  म्हटले परत जर अभ्यास केला नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. आला लगेच पाना घेऊन !  
त्यावेळेस जो पाना याच्या हातातून पडला तो त्याने परत कधीच उचलला नाही गुपचूप याने सामानाची प्याकिंग केली आणि दिवाळीची सुट्टी संपवून शाळेत आला. 
कधीच अभ्यासात लक्ष न देणारा हा माझा मित्र आता  देशातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.