Thursday, 31 March 2016

खिश्यातल्या पुऱ्या !


आम्ही  त्यावेळेस तिसरीला होतो , आमच्या कॉलनीच्या जवळच होती आमची  शाळा जिल्हा परिषद प्राथमिक आणि केंद्र शाळा कोडोली हे माझ्या शाळेचे नाव.  घराजवळ शाळा असल्याने मी काय कॉलनीतील , धनगरवाडीतील विद्यार्थी डबा आणायचे नाहीत. २ वाजता जेवायला सुट्टी व्हायची मग सुट्टी झाली आम्ही सरळ घरी जेवायला. जेवायला शाळा सुटली कि एकदम मस्त चित्र दिसे ,  काही काही पोरांना संडासला लागलेली असायची ती जरा जोरात सुटायची घरी, वर्गातील चांगल्या जी चांगल्या घरातील मुले होती ती गुपचूप घरी जायची, माझा एक मित्र होता त्यावेळेस अमोल म्हणून आय मीन अजूनही आहे, अमोल हा आमच्याच कॉलनीत राहायचा. माझ्याच वर्गात होता. मी आणि अमोल मात्र पूर्ण रस्त्यावर मस्ती करत घरी जायचो , अमोल जर जास्तच खोडील होता , पोरीना चिडव हिला काय बोल तिला काय बोल असले धंधे करायचा पण त्याचात अश्लीलता नव्हती , ना कुठल्या मुलीला दुखवायचा विचार होती ती निक्खळ चेष्टा.
माझी आई त्यावेळेस देगाव फाट्यावरच्या हॉटेल मधी होती कामाला , ती रात्री येताना हॉटेल मध्ये शिल्लक राहिलेले पुरी , वडा , कांदा भजी  इत्यादी घेऊन यायची , दुनियेच्या नजरेने आम्ही कितीही गरीब असलो तरी मला कधी आम्ही  गरीब आहे  वाटायचा  नाही, मी कायम खुश असायचो कारण वर्गात दर शनिवारी सगळ्या शिक्षिका बाहेरून भजीपाव , पुरीभाजी मागवून खायच्या त्यावेळेस आमच्या वर्गातील श्रीमंत घरची पोरे त्या वडापाव , भजीपाव कडे लाळ गाळत बघत बसायचे . मला तर हे घरी दररोज भेटायचे म्हणून मी स्वताला कधी गरीब मानतच नव्हतो . असो

गोष्ट अशी आहे कि मी दुपारी जेवण झाला कि शाळेपर्यंत जातोपर्यंत कायतरी टाईमपास म्हणून पुऱ्या, कांदाभजी, वडा इत्यादी घेऊन जायचो आणि रस्त्याने खात जायचो. येताना मी आणि अमोल सोबत असायचो पण जाताना नसायचो तो जरा उशिरा यायचा. मी आपला माझ्याच धुंदीत खिशातून थोडा थोडा बाहेर काढून खात खात शाळेत जायचो. एकदा असाच दुपारचे जेवण  करून मी शाळेत चाललो होतो , चड्डीच्या खिशात चांगल्या ७ पुऱ्या नीट घुसवून भरल्या होत्या.
मला रस्त्यातच अमोल भेटला , मग  आम्ही दोघेजण निघालो डुलत डुलत मी आपला माझ्याच नादात खिश्यातून एकेक पुरी खात खात चाललो होतो, पहिली पुरी काढली , अमोल ला वाटले मी त्यालाच द्यायला काढली पण तेंव्हा कुठे असले ज्ञान मला , त्याने पुरी बघताच बोलायचं थांबला आणि माझ्याकडे बघू लागला , मला काय माहित ह्याला पुरी पाहिजे , मी आपली तशीच आख्खी पुरी तोंडात टाकली , परत दुसरीला पण तसाच झाला असा करत करत मी शेवटच्या पुरीला आलो, आणि शेवटची पुरी  खिश्यातून काढली आणि तोंडात टाकणार तेवढ्यात अमोल मला म्हनला "लका  कांबळे मला दिकी पुरी ,मला पुऱ्या लय आवडत्यात  मघपसन बघातुया एकटाच खातुया व्हय"  मी त्याला ती पुरी देऊन टाकली.  च्यायला मी म्हणलो  लका आधी का नाही सांगितला तीन तरी पुऱ्या दिल्या असत्या , तो म्हनला मला वाटला तूच देशिल स्वताहून "  आता स्वताहून द्यायची अक्कल असती तर दिल्या असत्या किनाई"
त्यानंतर  माझ्या मनावर कायमचा बिंबला गेला  कि आपण काही खात असेल आणि जर सोबत कोण असला तर ते वाटून घ्यायचा , थोडा हिस्सा त्यालापण द्यायचा.   हि चांगली सवय मला लागली पण खिश्यातून पुऱ्या न्हायची सवय काय लौकर नाही सुटली .


भेटू परत पुढच्या वेळी ते पण दुसऱ्या मित्राची कथा " अनिकेत आणि ऑफ पिरिअड"



Wednesday, 30 March 2016

असा माझा महाराष्ट्र

देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून मिरवणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र ! पण गेले काही वर्ष  राज्याची आर्थिक , सामाजिक, स्थिती ढासळत आहे , पण कुणालाच याचे पडलेले नाही सगळेजण फक्त आपले घोडे पुढे दामटवत आहेत , नक्की झालय काय तरी काय असा या महाराष्ट्रात ?  याचा हा आढावा !
महाराष्ट्र हे देशातील एक विकसित राज्य आहे , शैषणिक , आर्थिक ,सामाजिक अश्या सगळ्या क्षेत्रात खूप पुढे आहे,  आपले राज्य हे औद्योगिक दृष्ट्या  महत्वाचे राज्य आहे परदेशी गुंतवणूक  हि कायम या राज्यात येत असते गेल्या दोन वर्षातील वेगवेगळे रिपोर्ट्स पाहिले तर महाराष्ट्राची पीछेहाट होताना दिसत आहे , नुकत्याच आलेल्या व्यापार वृद्धी च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे , महाराष्ट्रातील अनेक उदयोग आजारी पडत आहेत , मोठ्या मोठ्या कंपन्या राज्य सोडून जात आहेत, एम आय डी सी   तील उद्योगाकडे कुणाच लक्षच नाही आहे, मुंबई पूणे नाशिक अश्या मोठ्या शहरांचे ठीक चालू आहे पण सातारा , सांगली , विदर्भातील काही एम आय डी सी मरायला टेकल्या आहेत.
शेती हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण शेतीच्यापुरेश्या आणि योग्य  सुविधा   नसल्या मुळे शेतकरी मागासलेला आहे, पाटबंधारे खात्याने  प्रचंड पैसा खाल्ला आहे .  साधा कालवा नाही इकडे नीट , आणी आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन नाही , पूर्ण महारष्ट्रात दुष्काळ पडला आहे, शेतकरी कुठलाही ऋतू असू दे आत्म हत्या  करतच आहे ,  फक्त उस हेच पिक येत का महाराष्ट्रात ? साखर कारखाने कोटीचा पैसा खातात आणी मग विशेष पैकेज देऊन जगावयाचे त्यांना का आणी कशासाठी ?  उसावर जास्त लक्ष दिल्यामुळेच शेतीत सगळी विषमता आली आहे ,मराठवाडा ,विदर्भातील शेतकरी मरत आहे . उत्पादन होत नाही आहे मग  जे आहे त्याचे दर वाढणारच .  इथल्या कलाकारांना खेळाडू यांना मदत करावी लागत आहे , सरकारने वेळीच योग्य उपाय योजना केल्या असत्या तर हि वेळ आली नसती.
इथे बेरोजगारी तर भयानक आहे इथल्या मुलांनी ५-६ लाख रुपये खर्चून शिक्षण घेतले  आहे कुणी अभियंता , कुणी एम बी ए वाला सगळेच १०-१५ हजारा वर  काम करत आहेत , ते पण कुणी एम आर , कुणी कॅल सेंटर मध्ये नोकरी करत आहे , मोठ्या शहरात राहणे म्हणजे कमीत कमी ८ हजार लागतात , स्वतःसाठी किती , कर्ज फेडण्यासाठी किती , घरी किती आणि बचत  किती सगळा गणित अवघड होऊन बसला  आहे, हि परिस्थिती नोकरी मिळाल्या पोरांची आहे ,तर
 नोकरी न मिळाल्याची तर अजून बिकट  , घरून फोन येतो दररोज मिळाला का जॉब ? काय उत्तर देणार ? सगळाच भयानक आहे,
 पण सरकार ला हे सगळे माहित आहे का नाही हेच समजत नाही आहे .
अजून एक समस्या म्हणजे  इथे वाढत जाणारे दलितांवर अत्याचार , हा आपला समाज कधी  सुधारणार काय माहित का हेच चालू राहणार तसाच , नगर जिल्हा तर दलितांसाठी नरक झाला आहे दर महिन्यात येतेच   बातमी हत्या , बलात्कार ,  इथल्या शिकून न शिकलेल्या लोकांना समजतच नाही आहे आपण कुठल्या दिशेला जात आहोत , महाराष्ट्रातील दलित लोक बाबासाहेब आंबेडकरांना  मानतात म्हणून हा समाज कायद्यला धरून चालत आहे , एका जर यांनी हातात शस्त्र घेतला तर समजाची घडी कोलमडून पडेल पूर्ण, महाराष्ट्रातील लोकांना गरज आहे ती मुळात प्रबोधनाची पण सगळ्यांना फक्त बोलण्यात हवा आहे प्रबोधन वागण्यात नको .
शेवटचा एक मुद्दा  म्हणजे सरकारची विनाकारण लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावणे , अमुक दिवशी मांस बंदी , हे खाऊ नका ते खाऊ नका , मुलीनी असा वागा तसा वागा , जे मोरल पोलिसिंग आहे ते कुणालाच नको असते , सरकारने जरून एक विचारधारा जपावी पण समाजातील सर्वात लहान भागाला पण त्या विचाराने त्रास नाही झाला पाहिजे,तुमची विचारधारा सामान्य माणसावर लादु  नका  नाहीतर दुसरी  फ्रेंच क्रांती व्हायला वेळ नाही लागणार.
अश्या बऱ्याच समस्या आहेत इथे पण करणार काय आमचे सरकारचे लक्षच नाही आहे ! आणि मुख्य जबाबदार तर आम्हीच आहोत, आम्हीच  दिले आहे मत त्यांना !
मग यावर नक्की उपाय काय हे पाहू आपण पुढच्या लेखात

पटेल आरक्षण : नाण्याची दुसरी बाजू

गेले वर्षभर हार्दिक पटेल " पटेल" समाज्याला आरक्षण देण्यासाठी लढत आहे .   " पटेल" समाजासाठी आरक्षण हवा आहे म्हणून आंदोलन करत आहे. नक्की काय आहे हे प्रकरण ?
पटेल समाज हा गुजरातचा सर्वात प्रगत श्रीमंत आणि राजकीय शक्तीवर वर्चस्व  असणारा समाज अहे. सगळ्यात जास्त जमिनी हक्क त्यांचा आहे , उद्योग क्षेत्रात  पटेल समाज  पुढे आहे , सगळ्यात जास्त NRI त्यांचे आहेत ,१/३ भाजपा चे आमदार  पटेल आहेत , राज्य मंत्रिमंडळात सगळ्यात महत्वाची खाती पटेल समाजाकडे आहेत .  शिक्षण संस्था  त्यांचा आहेत, अश्या समाजाला न्यायालय पण आरक्षण नाकाराणारच  आणि तेच झाला
मग इतका सगळा असताना का गरज पडली पटेल समाजाला आरक्षणाच्या मागणीची ? त्यासाठी गुजरात जाणला पाहिजे.  खूप काळापासून  सरकारी नोकरी ची भरती तिकडे झाली नाही , नाही म्हणायला गेल्या पाच वर्षात फक्त १०००० लोकांना सरकारी नोकरी मिळाली आहे  ती पण पोलीस आणि शिक्षण सहायक म्हणून , हे  हेच दर्शवत  आहे की मुबलक नोकरी निर्माण नाही झाल्या सरकारी क्षेत्रात  आणि ज्या संधी झाल्या त्या घेण्यात  पटेल समाज  मागे पडला .
मग प्रश्न येतो इतका प्रगत समाज मागे का पडला त्याचे उत्तर दडला आहे गुजरात शिक्षण व्यवस्थेत  !
एक आढावा घेऊ गेल्या २५ वर्षातील गुजरात आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा  यांचा मुळात हि परीक्षा देणारे कमी आहेत पटेल समाजातर्फे, आणि हि परीक्षा पास केलेले विद्यार्थी आहेत दलित ,आदिवासी  इतर मागास वर्गातील, त्यांना आरक्षणाचा जरूर लाभ झाला असेल , पण बाकीच्या राज्यातील  खुला वर्गातील तर मुले हि परीक्षा पास होत आहेत .
मुळात समस्या आहे ती गचाळ शिक्षण व्यवस्था , प्राथमिक शिक्षणाचे तर तीन तेरा वाजले आहेत  शाळांची स्थिती खूप खराब आहे . शिक्षण फक्त देखाव्यासाठी केला गेला “विकसित राज्य” च्या नावामुळे कुणाचा लक्ष पण नाही गेला तिकडे . महिना ३००० रुपड्या वर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली  ज्यांचा दर्जा हि खालावलेला होता आणि मुळात त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार सरकार . याच मुले गुजराती तरुण मागे पडत गेला बाकीच्या राज्याच्या युवकांच्या तुलनेत .  कुठल्याही मोठ्या शहरात बघा  दुसऱ्या राज्यांची पोरे नोकऱ्या करताना दिसतात पण गुजराती अपवादानेच दिसतील. गुजरात सरकार याच आंधळ्या विश्वासात राहिले कि अजून खूप राज्य आहेत आपल्या पेक्षा मागासलेली शिक्षणाच्या क्षेत्रात लोकांच्या मनावर पण हेच बिंबवण्यात आले . पण खरी परिस्थिती खूप वेगळी आहे शेतीतून मुबलक पैसा येत नाहीये पटेल काय कोणताच समाजाला ज्याद्वारे ते कदाचित गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकतील  आपल्या मुलांना . आणि वैद्यकीय आणि अभियांत्रिकीची फी तर खूप जास्त आहे.
याच मूळे पटेल समाज एकटावला आहे आरक्षणाच्या मागणी साठी जशे दलित, आदिवासी, इतर मागास वर्गातील युवक निदान आरक्षणाचा लाभ घेऊन नोकऱ्या मिळवत आहेत तसाच ते हि करू इच्छितात .
तरुण  युवकांची स्वप्नाचा चुराडा होत आहे आणि मग येते ते frustration निराशा, आणि जन्माला येतो हार्दिक पटेल , जो मागणी साठी हाती बंदूक नक्षलि मार्ग घेण्याचा  खुलेआम  इशारा देतो , त्याला पूर्ण समर्थन पण मिळणार भरगोस पाठिंबा पण कारण  बेरोजगार युवकांकडे एकच हत्यार असतो तो म्हणजे आंदोलन !
आता तुम्हीच ठरावा नक्की कोण दोषी

Tuesday, 29 March 2016

मलाही वाटते

     


मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी   कथित  "उच्चवर्णीय " आणि पहावी
मारणाऱ्या दलितांची "उतरंड" समतेच्या लढ्यासाठी  !

मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी  "बुराज्वा" आणि पहावी
घाम गळणाऱ्या गरीबाची "होरपळ " भाकरीच्या तुकड्यासाठी !


मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी  " सत्ताधीश " आणि पहावी
लाथाडलेल्या जनतेची "तडफड" तग धरण्यासाठी !

मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी  " राम  " आणि पहावी
धरती फोडून  अग्निपरीक्षा  देणाऱ्या  सीतेची "धडपड" पवित्र्यासाठी ! 

Friday, 11 March 2016

देवीची करणी आणि माझा ड्रेस

                               
आमचे घर म्हणजे  माझी आई तिला सगळे आक्का म्हणत , आणि आम्ही तीन भाऊ पैकी मोठा भाऊ त्याच्या बायकोबर दुसरीकडे राहत होता, दुसरा भाऊ म्हणजे मी शिकायला बाहेर होतो आणि छोटा भाऊ एका दवाखान्यात कामाला होता. मोठा भाऊ काही लक्ष देत नवता घराकडे आणि माझा नोकरीचा काही पक्का नव्हता, आणि छोटा भाऊ चळवळीत शामिल झाला होता.  आईला  खूप काळजी वाटत होती कि कसा होणार मुलाचं . आक्का जात होती एका कंपनीत कामाला , जेवायच्या सुट्टीत असाच विषय निघत असेल आमचा,कि पोरांच कधी  आणि कस चांगल होणार , आक्काने पूर्ण आयुष्य घातले होते आमच्या साठी हॉटेल मध्ये काम करून , तर कधी भंगाराच्या दुकानात काम करून . तिला नक्कीच वाटत असणार कि तिचे कष्ट वाया जाणार , आक्काची हि अवस्था बघून तिच्या कामावरच्या एका बाईने सांगितले कि आमच्या इकडे एक देवरुषीण आहे जी करते सगळे नीट , आणि बरीच उदाहरने दिली हिचा पोरगा ह्या पोरीच्या नादात येडा होता आता सुधरला, तर कोण घरात लक्ष द्यायला लागला तर कुणाला जॉब लागला   असे  बराच काहीकाही .

झाल आक्काच्या डोक्यात पक्क झाल कि आता हाच लास्ट पर्याय मग असाच एका मंगळवारी आमची आक्का आणि ती दुसरी बाई गेले त्या  देवरुषीण कडे तर तिची वेगळीच तर तिच्या अंगात यायचं ते पण फक्त ५ ते ७ ला मग तोपर्यंत अक्काने वाट पहिली . झाले एकदाचे वाजले ५ आली देवी अंगात आणि सांगितला तुझा मरुण १५ वर्षे झाली , तीन पोरे आहेत तुला, मोठे लक्ष देत नाही , दोन नंबरचा  हुशार आहे जबाबदार आहे आणि तिसराचे की खरा नाही . आक्काचा विश्वास बसला कि खरेच आहे सगळा . आता हि देवी आपला काम करणार मग परत आक्काने विचारला काय करू मग मी , अंगात आलेली देवी बोलली तुझ्यावर घरातल्यानीच करणी केली आहे. ती करणी तोडायची असेल तर अमावास्येला शाळेच्या  माळावर एक उलट्या पकाची कोंबडी , पिवळा भात हळद कुंकू  आणि स्वखुशीने  द्यायचे असतील  तर ११११ रुपये  दे वाह म्हणून …

आता आक्काला पगार एवढासा त्यातून हा खर्च म्हणजे १५००-१६००० रुपये जाणार ती म्हणली बघू करते म्हणून.  त्यानंतर  ती देवरुषीण बी सारखा फोन करून विचारू लागली कि कधी करायचा कधी करायचा , आणि इकडे माझा छोटा भाऊ जास्तच चळवळीत जात होता म्हणून आक्काला वाटत होते कि खरच कुणीतरी करणी केली आहे. मला यातला काहीच माहित नव्हता . आक्का मला दरमहिना १००० रुपये पाठवायची  जानेवारीच्या महिन्यात आक्का मला म्हणाली  तुला या महिन्यात पैशे नाही पाठवले तर चालतील का ?
मला काहीच समजेना कारण मला जॉबची  मुलाखतीसाठी कपडे  घ्यायचे  होते म्हणून मि थोडे पैशे साठवून ठेवले होते आणि ड्रेससाठी कमीत कमी हजार रुपये तरी जाणार होते, त्यात कॉलेज संपत आलेले जर पैशाची गरज होती
मला वाटला काहीतरी अडचण असेल म्हणून आक्का नाही म्हणत असेल मी पण म्हनलो चालेल आणि सहजच विचारले कि काय अडचण आहे आणि आक्काने मला सगळी स्टोरी सांगितली , माझ्या कपाळातून झिणझीण्या बाहेर आल्या, आणि   डोक्यात विचार आला
आयला ब्रान्डेड  ड्रेस घेणार आहे मी एकदाच, आणि त्यात  हि देवी आणि तिची करणी मधी आली
माझा डोकच सटकला होता एकदम ,मग मी पण एक आयडिया केली सांगितला कि ह्या  आमची मुलखात एप्रिल  मधे आहे , तू आता दे मला पैशे आणि
 मार्च मध्ये कर तू तुला जे करायचे ते , आक्काने थोड्या नाखुशीने पाठवले  मला पैसे . मी घेतले इकडे एक मस्त  पैंट शर्ट. झाला फेब्रुवारीच्या २ तारखेला माझा इंटरविव झाला .
मला  नोकरी लागणारच  याची खात्री होती संध्याकाळी घरी फोन करून सांगितला कि नोकरी लागली म्हणून  आक्काला एकदम आनंद झाला , मला जितका आनंद झाला नव्हता तितका आनंद तिला झाला . कष्टाचे चीज झाल्यासारखा वाटले. झाले दोन तीन दिवसात मी पूर्ण माहिती काढली  त्या देवरुषीण बाईची, ती पण बिचारी पोट भरायला आलेली पण तिला समजला होता कि लोक फसतात ते देवाच्या नावावर म्हणून तिने हे सुरु केले होते . आणि त्या दुसर्या बाईने या देवरुषीण बाईला आमच्या आक्काबद्दल सागितलं होता आधी , म्हणून तिने  अंगात आल्यावर सगळा बरोबर सांगितला.
मी रात्री आक्काला फोन करून सगळा खरा खरा सांगितला कि मी खोट बोललो तुझ्याबर , आणि त्या देवरुषीण बद्दल पण सांगितला आणि आक्काला बोलाव आग हे सगळे आपल्याला देवाच्या नावावर लुबाडतात , आता तू मला पैशे नसते दिले तर मी कुठून कपडे घेतले असते आणि कशी मला नोकरी लागली असती ?  आक्काच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .
उन्हाळ्यात जेव्हा घरी आलो तर आमच्या देवार्ह्यात एकपण देव नव्हता 

Wednesday, 2 March 2016

पेन का पाना

                                           

माझा एक मित्र आहे लहानपनीचा  "टोया" म्हणून.  तसा त्याचा  नाव तसा खूप भारी आहे" निखील"  
 पण  काय माहित का  आमच्या शाळेत ज्याचे  नाव निखिल त्याला सगळे "टोया" म्हणायचे 
तसा  तो अभ्यासात हुशार होता पण अभ्यास करतच नसायचा. पाचवीत त्याने नवोदयचि परीक्षा दिली होती    आणि त्याची निवड नवोदय मधे झाली झाला अख्या गावात हुशार मुलगा म्हणून ख्याती झाली नवोदय मध्ये झालेली निवड हे बहुतेक मुलांच्या आयुष्यातील पहिले यश असते त्यामुळे सहावीचे वर्ष तसे हवेतच जाते, अजाण वयात मिळालेले यश निट हाताळायला कसा जमणार लगेच ? या लाटेतच त्याचा सहावी सातवीची  वर्षे सरली, 
 पुढे  आठवीला गणित आणि विज्ञान  इंग्रजीतून झाले आता आधीच  गणित  मराठीतून येत नाही आणिआता  हे इंग्रजीतून शिकवला जाणार म्हणजे आधी चुकून २५ पैकी ९ तरी भेटायची आता तितका पण भेटणे मुश्किल झाला. 
आठवीची पहिली सहामायी परीक्षा झाली अपेक्षेप्रमाणे याचा त्रिफळा उडाला होता, त्याचे  वडील त्याला सुट्टीसाठी घरी न्यायला आले होते, होस्टेल च्या बाहेरच होस्टेल चे हाउस मास्टर  मिश्रा सर  खुर्ची टाकून एकेकाची कुंडली आणि कामगिरी वाचून दाखवत होते. याचा पण नंबर आला सर खूप ओरडले सांगितले कि मस्ती करतो मेस मधून पापड चोरतो, बोरे आणायला बाहेर जातो असाच खूप काही काही. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतला आणि घरी आले. 
 याचा आपला चालुंच असायचा दिवसभर इकडेतिकडे फिरायचा टीवी बघायचा निवांत राहायचा. पूर्ण सुट्टीभर वडील  त्याला एका शब्दाने पण बोलले नाहीत झाला हा खूप खुश होता कि  पप्पा खूप चांगले आहेत काही बोलले नाहीत . सुट्टी संपायला दोनतीन दिवस बाकी होते , संध्याकाळची वेळ होती याचे पप्पा दारात खाटेवर बसले होते हा आपला गावभर  फिरून आला हातपाय धुतले आईकडून चहा बटर घेतला आणि बसला तेवढ्यात याच्या पप्पानी याला जवळ बोलावले हा पण गेला लगेच आणि त्यांनी याला समजवायला  केली कि आता वेळकाळ बदलली आहे , शिकण खूप गरजेचे आहे, आमच्या काळात तसा चालत होते आता इथून पुढे चालणार नाही तू अभ्यासावर लक्ष दे असा बराच काही काही शेवटी अजून एक त्याला सांगितला कि आता तू ठरव कि तुला आयुष्यात पाना हवाय का पेन ? जर पाना हवा असेल तर शाळा सोडून दे आणि माझ्याबर ग्याऱेज मध्ये येत जा तेवढीच मला मदत होईल घरच आहे ग्याऱेज आणि पेन हवा असेल तर  अभ्यास कर या पुढे नीट मनलावून.  तू विचार कर एक रात्र आणि मला सकाळी सांग तुझा निर्णय. 
बिचारा १२-१४ वर्षाचा शेंबड  पोर ज्याला अजून निट  चड्डी घालता येत नव्हती कि शेंबूड पुसता येत नव्हता त्याला चक्क आयुष्याचा निर्णय करायचा होता ते पण एका रात्रीत. हा आपला रात्री उशिरा पर्यंत दोन्ही बाजूनी विचार करत होता कधी पेन वरचढ होत असे आणि पेन वरचढ झाला कि त्याला इंग्रजीतले गणित दिसायचे तर कधी  विज्ञान दिसायचे , खूप सारा होमवर्क  दिसायचा ते दिसला कि लगेच पाना वरचढ व्हायचा , असा करत करत तो कधी झोपला त्यालाच समजला नाही 
 झाला सकाळी टोया  उठला अंघोळ केली नाश्ता केला, आतल्या खोलीत जाऊन पान्याची एक छोटी थैली होती त्यातून एक पाना काढला आणि गेला पप्पानजवळ आणि म्हणाला 
"दादा मी ठरवले  कि मी पाना घेणार हातात" 
दादा  चहा पीत होते चहाचा कप  तसाच बाजूच्या  खिडकीवर  ठेवला आणि अशी सणसणीत खाडकन कानाखाली ओढली कि बस्स दिवसभर याचा गाल  आणि कान लाल होते. आणि  म्हटले परत जर अभ्यास केला नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. आला लगेच पाना घेऊन !  
त्यावेळेस जो पाना याच्या हातातून पडला तो त्याने परत कधीच उचलला नाही गुपचूप याने सामानाची प्याकिंग केली आणि दिवाळीची सुट्टी संपवून शाळेत आला. 
कधीच अभ्यासात लक्ष न देणारा हा माझा मित्र आता  देशातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.