Sunday, 19 June 2016

सुनील गावस्करांचा निम्मिताने


आज झी  वर  अवॉर्ड सोहळा चालू  होता त्यात  सुनील गावस्करांचा "महाराष्ट्राची शान" असा कायतरी पुरस्कार दिला गेला.  त्यांनी त्यांच्या जन्माचा किस्सा सांगितला
तो असा
झाले असे होते की सुनील गावस्करांचा जन्म झाला तो  १९४९  ला.  ते आणि त्यांची आई हॉस्पिटलमधे होते. त्याचवेळी तिथे खुपसाऱ्या बायका पण होत्या बाळंतपण झालेल्या त्यांच्या बाळांबर.
आता मूळ जन्मले की नातेवाईक बघायला येतात . सुनील गावस्करांना बघायला त्यांचे "चुलत काका"  आले बाळाला पाहिले आणि गेले
दोन चार दिवसांनी ते परत आले तेंव्हा म्हणाले हे "बाळ" आमचे नाही  कारण सुनीलच्या  कानाजवळ एक छोटासा बोगदा होता तो नव्हता म्हणजे  बाळ बदलले गेले होते. झाले शोधाशोध सुरू झाली मग शेवटी ते बाळ एका कोळीण जवळ सापडले.
हा किस्सा सांगून झाला आणि सुनील गावस्कर म्हणाले  मी झालो असतो कोळी जर सापडलो नसतो तर.
इथे ते एक गोष्ट नकळत सांगून गेले " व्यवस्थाच  अशी कोळ्याचा घरी जन्माला तर "मासेमारीच" करायची , चांभाराच्या घरी जन्माला तर चपलांचे काम करायचे.   न्हाव्याच्या घरी   केसच कापायचे.  म्हणजे ही एक अशी इमारत होती ज्याच्यावर खूप मजले  होते आणि प्रत्येक मजल्या वरच्याला  आपल्या खाली एक मजला आहे म्हणून  वाटत नव्हता.   आणि मुळात भारत हा असा देश    जिथे  कामाला अजिबात डिग्निटी नाहीये.   काही वर्षांपूर्वी मी कॅफे कॉफी डे ला होतो कामाला मला खूप लाज वाटायची बाहेर  सांगायला की  मी तिकडे काम करतो म्हणून मग कॉलेजला गेलो की उगाच सांगायचा "कॅलसेंटर" आहे  कारण वेटर म्हणून सांगितला तर ईज्ज्जत कमी होईल असे इथल्या व्यवस्थेने अगदी शाळेच्या पहिल्यादिवसापासून ठासवले आहे. असो
आज   सगळी कडे आरक्षण विरोधी बोंब उठवली जात आहे. खासकरून "दलितांविरुद्ध" अपमानकारक जोक्स  फिरवले जातात. त्याचे मूळ  कोण लक्षात घेत नाही.

मी माझ्या शाळेत  अशी कितीतरी पोरे बघितली आहेत की त्यांच्यात इतकी क्षमता होती की त्यांना जर योग्य दिशा आणि मार्गदर्शन भेटला असता तर तर ती पोरे आज त्या क्षेत्रातील बंदी हस्ती झाली असती.
मग आशिष खटाव तालुक्यातील राजापूरच्या आशिष घनवट असू किंवा रेठऱ्याचा प्रशांत घोडके असू दे. गावाकडची गुणवत्ता कायमच दुर्लक्षित राहिलेली आहे.
माझ्या शाळेत अजून एक मुलगा होता  "भूषण"  म्हणून  तो जरा स्लो होता. पण संगीतात त्याचा इंटरेस्ट होता. त्याला त्याचा पुढे काय झाला हे अजून समजला नाही.
गावाकडची मुले एक शॉट मध्ये  बॉल फोडतात आणि एका बॉल मध्ये स्टंप, कुठलीही साधना ट्रैनिंग न घेता  अस्सल सुरेल आवाजात गातात. माझा जिवलग मित्र  हिंगे तो शाळेत असताना असा गायचाना की बस्स ऐकतच राहावे.
ईथली व्यवस्था इतकी हुशार आणि कपटी आहे की ज्यावेळेस खालचा मजल्यावरची वर यायला लागली  त्यांनी प्रत्येक मजल्यावरच्या विकल्याजाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विकले आणि परत एक ठराविक समूहाला पुढे ढकलले. आधी शिकायचं अधिकार   नव्हता तर जे जातीतील काम आहे तेच करावे लागायचे ज्यां कामाला मुळीच डिग्निटी नव्हती. मग शिकायचं हक्क भेटला की  सगळे जण शिकून मोठे होण्यासाठी धडपडू  लागले आणि रेस सुरू झाली. तोपर्यन्त सगळ्या पोटेन्शियल क्षेत्रात एक समूह पुढे  आला. आणि   आपले पाटी पुस्तक करत राहिलो.

 ही जी व्यवस्था आहे ना हि "दलबदलू" आहे.
कधी अचानक ही फुकटच्या भेटलेल्या  "शहरी"  ट्याग वर ग्रामीण ला स्पर्धेतून अनट्याग करते. तर कधी अचानक  धर्माच्या नावाखाली दुसऱ्या धर्माला खाली दाबते. कधी  "तो" च्या बळावर "ती"  ला  घरात दाबून ठेवते तर कधी "गोऱ्याच्या " खोट्या प्रकाशात काळ्याला अंधारात मिटवून टाकते. आणि कधी  फुकटच्या जातीच्या  जोरावर एखादा जोशी , कुलकर्णी किंवा कुठलातरी " कर" अवघडे, वर  "कांबळे" टाकून आवाज दाबतो.

आज जास्त काही बोलायचं मला "आरक्षणासाठी" खूप काही लिहायचा आहे माझ्या  प्रत्येक  पोस्टवर किमान एकतरी मला भेटतोच जो मला कायम " आरक्षणाच्या भिंगातून बघतो आणि तेच प्रश्न विचारतो.  त्यासाठी मला एक बेस तयार करायचं आहे तो करत आहे.