आम्ही सातवीला होतो त्यावेळेस नुकतीच सगळ्या मुलांचे लाडके "जेना सरांची" बदली झाली होती. त्यांच्याजागी नवीन सर आले होते. डोळ्यावर काळा चष्मा, डोक्यावर कुरळी कुरळी केसाचा भांग, आणि चेहऱ्यावर एकदम वेगळेच भाव नक्की रागात आहेत का आनंदात आहेत हेच नाही समजणार उंचीने थोडे बुटके अंगावर निळे जीन्सचे ज्याकेट असे हे सर होते. तसा पण आम्हाला त्यांचा आणि आमचा त्यांचा दूरदूर पर्यंत संबध नाही असे वाटायचे ते शिवालिक सिनिअर चे हाऊसमास्टर होते ( नवोदय मध्ये रेक्टर ला हाऊसमास्टर म्हणतात. ) पण आधी जेना सर पहिले होते त्यामुळे हे सर जरा कडकच वाटायचे. असो
एकदा शनिवार होता आणि आमच्या हाऊस मधे खूप दंगा चालू होता. सगळे ओरडत होते या विंग मधून त्या विंग मधे जात होते. दंगा खुपच असह्य झाल्यावर सर जोरात चिडले असतील म्हणून ते घरातून बाहेर पडले म्हणजे त्याचा घर आमच्या होस्टेल समोरच होते आणि सर हळू हळू आमच्या होस्टेल कडे यायला लागले आणि होस्टेल च्या पायऱ्यापाशी पोचलो तेवढ्यात माझा मित्र प्रवीण ज्याला आम्ही प्रव्या म्हणायचो त्याने सरांना पाहिले आणि त्याने विचार केला आता सगळ्या पोरांना सर लय रेटतील ( मारतील) म्हणून लगेच जाऊन सांगूया पण सरांनी त्याला तिथूनच हात दाखवला आणि सांगितले तिकडेच थांब. हात पण असा दाखवला जसा कि गणपतीचा हात असतोन मूर्तीत तसा. सर पायरी चढून वर आले शिवालिक जुनिअर च्या पहिल्या विंग मध्ये जे कुणी सापडले सगळ्यांना धुवत धुवत चौथा विंग पर्य्नात आले तिथे प्रशांत म्हणून एक पोरगा होता तो जर जास्त हुशार होता. तो बेडवर शांत बसला होता. सरांना जरा आश्चर्य वाटले हा शांत कसा काय म्हणून त्याला विचारले
तू होता करे दंग करत ? त्यावर तो म्हणाला नाही सर मी संडासला गेलो होतो .
सर म्हणाले अच्छा तर हात दाखव त्याने हात दाखवला तर हात एकदम कोरडा ठणठणिट ! मग काय असा रेटला त्याला कि बासच परत कधी त्याने कुठल्या सरांना खोट बोलताना दहा वेळा विचार केला असावा. त्याच्यानंतर पण राहिल्याल्यांची धुलाई झाली पण आम्ही दंगेघोर ग्यांग मात्र समजून चुकलो कि हे सर डेंजर आहे आणि लय हुशार पण आहे. ते सर होते शिवालिक चे हाऊस मास्टर श्री मनोज राउत सर.
ह्या घटनेनंतर सगळ्याच मुलांवर त्याची जरब बसली होती.
आठवीला गेल्यावर शाळेतली काहीतरी पॉलिसी बदलली आणि आठवीतच सिनियर हाऊस ला आम्हाला टाकले आणि आम्ही सगळे राउत सरांच्या हाऊसला गेलो, त्यांच्याबद्दल जरब जास्त होती, त्यामुळे मनातून वाटत होते कि खूप मार खावा लागणार आहे आणि झाले पण तसच अगदी जिथे जिथे संधी भेटेल तिकडे सर आम्हाला मारायचे पण सरांच्या ह्या माराचा आम्हाला कधी राग यायचा नाही बाकी कुठल्या शिक्षकांनी मारलं तर मात्र आम्ही खूप रागात असायचो, राउत सरांबद्दल एक वेगळीच "आत्मियता" झाली होती, त्यांच्या मार खाण्यात मज्जा वाटायची आणि आता मोठे झाल्यावर तर त्या गोष्टींना आठवून भारी वाटते, नाहीतर काही काही पोरांचे बालपण असत " विद्यार्थी आयुष्यात साधा ओरडा पण खाल्ला नाही मार तर दुरच" एनीवेज बॅक टू राउत सर !
राउत सर म्हणजे शिवालिक हाउस वाल्यांची एकाअर्थानी "आई" होते, शाळेच्या वयात सगळी बरीचशी मुल दंगा, मस्ती करतात आणि शाळेत असताना बाकीचे शिक्षक नुसता असेम्ब्लीला लेट झाला कि सरळ प्रिन्सिपल सरांकडे घेऊन जायचे मग त्यामुळे पोराची इज्जत तर जायचीच प्लस प्यारेनट्स सहन कराव लागयच ते वेगळ पण हे सर मात्र कितीही मोठी चूक होऊदे स्वत:च्या लेवेल वर ह्यांडेल करायचे, मी आज पर्यंत खूप शिक्षक पहिले आहेत पण ह्युमन म्यानेजमेंट @ पर्सनल लेवेल त्यांचाइतक बेस्ट कोणीच नाही करत अगदी देशातल्या प्रतिष्ठीत टाटा इनस्टीट्युट मधले सायकालॉजिस्ट पण नाही.
प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसिक गरज ओळखून त्या अकोर्डींग त्याला तसं सोलुशन बनवून त्याच्या नकळत त्याला इम्प्रोव करन हे जिकिरीच काम सर करायचे. आय रिमेंबर आठवीत असताना अकरावीच्या दीपक भैय्याचे ५० रुपये चोरी झाले होते आणि त्याला वाटत होते आठवीच्या कुणीतरी घेतले त्यात त्याला मी आणि प्रव्यानि घेतले असे वाटत होते त्यामुळे आमची खूप जोरात भांडणे झाली होती मला खूप राग आला होता, मी बाहेर जाऊन एक मोठा दगड आणला होता त्याच्या डोक्यात घालायला पण अचानक राउत सर आले आणि त्यांनी तो विषय योग्य पद्धतीने सोडवला, त्यावेळेस माझ्या अंगात असलेला हिंसकपना आणि दीपक भैय्याच्या अंगात असलेली संशयीवृत्ती ला सरांनी व्यवस्थित वेसन घातली. मला अजून कधी कधी वाटते त्यादिवशी सर नसते तर ..... नुसता विचार करूनच नको होते. बाकीच्या मुलांचे पण बरेचसे असे इशुज सरांनी सोडवले असतील. मी बारावीला असताना तुम्ही दहावीच्या एका मुलाला जो मेंटल पाठिंबा दिला ,त्याला हॉस्टेल आणि क्लास मधून बराच त्रास होता आणि त्या रात्री मी तुम्हाला याबद्दल सांगितल्यावर तुम्हालापण वाईट वाटल होत खूप आणि तुम्ही त्यानंतर क्लास मध्ये त्याला समजावून त्याला परत न मारता, बाकी त्रास देणाऱ्या पोरांना तो सूचक इशारा दिला आणि त्याचा बराचसा त्रास कमी झाला. हि गोष्ट तर न विसरता येण्याजोगी आहे. 🙏 ( बरेच दिवस मुलांमध्ये हि चर्चा होती कि राऊतसर ह्याला अचानक का सपोर्ट करत आहेत.)
अजून एक गोष्ट म्हणजे हाऊसच्या कुठल्यापण मुलाचे प्यारेंट्स आले कि तुम्ही सर्वाना समान वाजवायचा मला हे खूप आवडायचे, शाळेत कितीतरी गरीब पोर होती, त्यांचे प्यारेंट्स पण गरीबच पण सगळ्याशी त्याच फ्रिक्वेन्सी मधून बोलायचा
त्यावेळेस साळुंखे सरांनी प्रत्येक वर्गाला ट्रीप ला न्यायचा रतीब लावला होता,आता होस्टेल आहे म्हटल्यावर गरीब श्रीमंत अशी बरीचशी पोर असतात वर्गात त्यावेळेस खुपदा सर येऊन विचारयाचे पैशे आहेत का जायला आणि जरी खोट आपण खोट बोलल कि सर आहेत तरी त्यांना कळायचे नेमके फि भरायच्या वेळेस सर येऊन पैशे द्यायचे, शिवालिकच्या पोरांनी अनुभव घेतला असेल याचा खुपदा.
मला कायम वाटत राहत हे सर खरतर जनयु,टीआयएसएस मोठ्या विद्यापीठ लेवेल च्या प्रोफेसर साठी अगदी योग्य आहेत, त्याचं विजन, त्यांची विचार क्षमता, त्यांचा विषयातल ज्ञान हे सगळ खूप खूप मोठ्या प्रोफेसर मधेच सापडतं आणि आम्हाला ते इतक्या लहान वयात मिळालं याच्यापेक्षा दुसर आमचा भाग्य काय असणार !
सर मुलांच्या अकॅडमिक प्रगती साठी "डेलीवर्क" नावाची कन्सेप्ट वापरायाचे किती मुल खूप मन लावून करायची नाहीत पण मी ९ वी ला ते खूप मन लावून केल, नववीला असलेला "जगाचा इतिहास" आजपण आपल्याला एकदम point तो point माहित आहे.
त्याच मॅनेजमेंट स्किल खूप Strong & Result oriented आहे, कोणतीही गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने पॅनिक न होता करणं हे कुनीपण तुमच्याकडनं शिकावं, निदान मी तरी तुमच्या कडून शिकलोय. कॉर्पोरेट क्षेत्रात ह्या स्किलची खूप गरज असते. 👌👌
एकदा शाळेत पॅनल इन्स्पेक्शन आलं होत आणि पुस्तकाच्या शुल्लक कारणावरून तुम्हाला ते पॅनल कसेतरी वाईट बोललं होत ज्यात तुमची काहीच चूक नव्हती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावर्षी सोशल सायन्सचा काहीच निकाल सर्वोत्तम होता तरीपण तुम्हाला बोललं गेलं तुमचा डोळ्यात ! नेमकं हे घडताना मी आणि कोणातरी कॉम्पुटर लॅब पाशी उभे होते आणि आम्ही चोरून ऐकलं मला त्यावेळेस वाटलं तुम्हाला पाठीवर थाप मिळणार आहे म्हणून आम्ही उभे राहिले होतो पण ऐकायला उलट मिळालं , मला पर्सनली खूप राग आला होता त्यावेळेस त्या पॅनल चा ( हि गोष्ट आज पहिल्यांदा सांगतोय मी त्यावर्षीपासून कुणालाच सांगितली नव्हती मी आणि क्षमा पण मागतो खाजगी गोष्ट उघड केल्याबद्दल ) कधी कधी माणसाला खूप कष्ट करून पण अप्रेशेशेन मिळत हे त्यावेळेस समजलं आणि ते पण आपण बेस्ट परफॉर्मर असताना ! पण तुम्ही ते पण सहन केले आणि पुढे वाटचाल करत राहिला !
तुम्ही वैयक्तिक आणि करियर पातळीवर खूप संघर्ष करत आहात आणि तुमची ती लढाई बघून मला माझा संघर्ष अगदी छोटा म्हणजे कस्पटाप्रमाणे वाटतो ! माझ्या सारख्या कितीतरी दगडांना तुम्ही मूर्तीत घडवलं आहे ! एखाद्या माणसाला प्रेरणा तर खूप शिक्षक देतात पण तुम्ही त्या माणसाला योग्य रस्ता दाखवता आणि तो त्या रस्त्यावर कसे चालायचे हे पण तुम्ही शिकवता !
शनीवार होता २४ मार्च २००७ ची घटना आहे मी दहावीला होतो त्यावेळेस
उद्या रविवार होता म्हणून मुले सगळी हॉस्टेलच्या मागे खेळत होती आम्ही हॉस्टेल ला हाऊस म्हणायचो नवोदय मधे मोन्या (मोहनीश खुंटे) अलंकार आणि पोरे बॅटबॉल खेळत होती आणि आमच्या हाऊस मास्टर म्हणजेच राऊत सरांना सापडली आणि नेमका मी तिकडून जात होतो मग सरांनी त्यांना दोन चार बोल ऐकवत सोडून दिले आणि माझ्यावर बोलायला लागले साधारण रात्रीचे ९:४५ झाले होते आणि त्यानंतर आमचे बोलणे रात्री अडीच पर्यंत चालले घटनेचं एका वाक्यात क्रक्स म्हणजे मला आत्मशक्तींची जाणीव करून दिली आणि जिवन म्हणजे काई हे समजले.
त्या नंतर मला हळू हळू समजले कि नक्की काय करायचे .
🙏🙏🙏
शिष्याला त्याच्या आत्मशक्तीची जाणीव करून देणाऱ्या या गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !😍😍🎂🎂
