Tuesday, 21 July 2020

सातारची लव्हस्टोरी


दुपारची जेवायची सुट्टी झाली होती  सुरज जेवण झाल होत आणि होत तो बसला होता तेवढ्यात कंपनीत युनिफॉर्म घातलेले स्टुडंट्स आले ते पाहताच सगळे कामगार जेवण आटोपत घेत  आपापल्या कामाला लागले. ते स्टुडंट्स इंजिनीरिंग चे होते साताराच्याच केबीपी कॉलेज मधून आले होते इंडस्ट्री व्हिजिट साठी आले होते. जवळ जवळ २२-२५ पोर होत आणि फक्त चारच पोरी होत्या.  सुरज च्या मॅनेजर ने त्याला कंपनी दाखवण्याची सूचना केली. सुरज  त्यांना कंपनी दाखवत होता. त्यातली एक पोरगी खूपच प्रश्न विचारात होती आणि बडबडा करत होती.
सुरज पण मेकँनिक इंजिनियर असल्यामुळे  पोरींबर बोलणे कमीच होते. हि पोरगी जास्तच विचारायला लागली. जाताना सुरज ने सगळयांना त्याचा नंबर दिला म्हणजे स्वतःहून नाही दिला त्यांनीच घेतला.
झालं हा किस्सा  झाला आणि सुरज रोजच्या कामात बीजी झाला सकाळी ८ ते ४ ची ड्युटी करायचा संध्याकळी जिम आणि थोडा वेळ टाईमपास मग  घर आणि जेवण  !
सुरजने इंजिनीरिंग केल्यावर पुण्यात न जाता साताऱ्यातच जॉब करायचे ठरवले आता साताऱ्यात पगार कमीच सुरज ला १२ हजार पगार होता तेवढ्यात त्याचा भागात होत म्हणून तो खुश होता, कधी एखाद कोण पुण्यातून आलं आणि त्याचा २० हजार ते २५ हजार पगार आकडा ऐकला कि त्याला पण पुण्यात जायची विष व्हायची आणि तिकडे होणारे जेवणाचे हाल लक्षात येऊन ऑटोमॅटिक ती विश मारून जायची.
असाच एक दिवशी जिम झाल्यावर तो पोरांच्यात बसला आणि नेहमी प्रमाणे मोबाईल बघितला तर त्याला चार मिसकॉल दिसले, त्यानं रिटर्न  कॉल करायच्या आधी ट्रू कॉलर वर बघितलं तर " स्विटी श्रद्धा " दिसले,
ते बघून एक मित्र म्हणाला तुला झवन्या कोणतरी उल्लू बनवत  असेल तुला कोण कुठली पोरगी फोन करेल ?
सुरज त्याला म्हणाला तू गप "आयघाल्या" चार मिसकॉल आल्यात म्हणजे महत्वाचे काम असेल. त्याने परत कॉल केला आणि विचारलं हॅलो कोण बोलतय ?
तर समोरून आवाज आला हॅलो सुरज सर मी श्रद्धा बोलतेय केबीपी कॉलेज मधून  त्यादिवशी तुमच्या कंपनीत आलो होतो ना
सुरज म्हणाला  हा हा बोला श्रद्धा जी !
तर ती पोरगी म्हणाली मला प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी मदत हवीय तुमची ! आता आख्या आयुष्यात सुरज ला कुणी अभ्यासात  मदतीसाठी विचारले नव्हते आणि आता डायरेक्त्त इंजिनीरिंग च्या प्रोजेक्ट साठी हेल्प आणि तीपण पोरीला सुरज लगेच म्हणाला हो करतो कि त्यात काय ! उद्या करतो कॉल तुम्हाला !
सकाळी ८ ला सुरज  कंपनीत पोचला आणि आणि तिच्या फोनची वाट  बघू लागला दिवसभर काही कॉल आला नाही  मग सुरज पण शांत होऊन आपले मशीनवर वर लक्ष देऊन काम करू लागला, संध्याकाळी काम सुटताना त्याला परत तिचा फोन आला आणि त्याला म्हणाली कि आज भेटायला जमेल का
सुरज हो म्हणाला आणि  विचारले कुठे भेटूया ? तर ती म्हणाली  अण्णासाहेब कल्याणी पाशी ये , मग सुरज तिकडे गेला, तिला भेटेपर्यंत त्याला चेहरा लक्षात येत नव्हता नक्की कोण श्रद्धा. कल्याणी जवळच्या झाडाखाली ते दोघे उभं राहिले आणि उभ्या उभ्या प्रोजेक्ट चे  बोलणे सुरु केले. श्रद्धा इतकी बडाबडा करत होती कि सुरज ला फक्त ऐकूनच घ्यावे लागत होते. ती सलग बोलत होती नुसती वन साईड  बडबड लावली होती आणि सुरज ला ते सगळं  "जब वि मेट" मधल्या शाहिद आणि करीना कपूर गत वाटत होते.
सुरज ला जिम जाण्यासाठी मित्राचा फोन यायला सुरुवात झाली होती, सुरजने फोन सायलेंट केला आणि मस्त तिचं बोलणं ऐकत राहिला. बोलणं झालं कि सुरज म्हणाला जातो मी आता ! आणि गाडीजवळ आणि गाडी स्टार्ट केली  आणि बघितले कि ती चालत आहे,  ते बघून त्याला हिम्मत होईना कि तिला विचारावे कि नको या सोडतो म्हणून ! शेवटी  हिम्मत करून म्हणाला श्रद्धा घर  सोडू का तुम्हाला
तर ती म्हणाली नको जवळच आहे जाईन मी चालत ! मग सुरज ने परत एकदा विनंती केली म्हणाला सोडतोकी
तर ती म्हणाली अच्छा चालेल चल आणि मला आता अहोजाओ बोलायचे सोडून दे नाहीतर मी पण "सर" म्हणणार तुम्हाला  आणि ती गाडी वर बसली.
मग सुरज ने तिला साईबाबा मंदिर जवळ सोडले आणि तो गेला सुरज त्याची डिक्सवर चालवत होता पण डोक्यात श्रद्धाच होती. घरी गेला निवांत जेवला पण डोळ्यासमोर फक्त तीच दिसत होती तिचीच बडबड !
आणि इकडे श्रद्धा ची  अवस्था पण तीच होती, आज पर्यंत तिला खूप जणांनी प्रोपोज केले होते पण तिला सुरज सारखा भारीवाला फील तो कम्फर्ट  नव्हता भेटला म्हणून ती कुणाला हो म्हटली नव्हती.
तेंव्हा सुरज कडे २०० एम बी डेटा असायचा आणि तो  तो डेटा आठवडा भर वापरात होता ! ऑफिसला गेला कि व्हाटसप वरचे सगळे फोटो आणि विडिओ डाउनलोड. पण आता तो २०० एम बी डेटा श्रद्धा साठी जायला लागला ! महिना "२०० रुपये १ जिबी डेटा" फक्त आता श्रद्धाचे डिपी लपून छापून सेव करायचा !
रात्री दोन दोन पर्यंत व्हाटसप वर चॅटिंग (सेक्सचॅट रोमँटिक चॅट नव्हता) एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी काही अपेक्षा न ठेवता ऍफिनिटी वाटते ती कंडिशन होती दोघांची. दोघांनी एकमेकांना प्रोपोज नव्हते केले.  असंच सुरु होते तिचा कॉलेज आणि त्याचा ऑफिस रोज वेळ मिळेल तेंव्हा कॉल्स आणि बोलायला वेळ नाही भेटला व्हाटसप ला मेसेज. असं एकदम भारीवाला सुरु होता.
आमच्या सातारला दांडिया जोरात असतात सैनिक स्कुल च्या ग्राउंड वर भरतात आख्या साताऱ्यातल्या पोरी एकदम नटून मेकअप करून तिकडे येतात
(सातारचे स्त्री सौन्दर्य बघायचे असेल तर सैनिक स्कुल च्या दांडिया आणि दिवाळीची पाहत कुरणेश्वर ला.) आणि पोर सगळी लाईन मारायला जातात  तिथल्या भाषेत सीजन मारायला. श्रद्धा पण कॉलेज मधल्या मुलीसोबत जायची. सुरज त्याच्या कॉलनी मधल्या मंडळाचा उत्साही कार्यकर्ता होता त्यामुळे तो नव्हता जात. एक दिवशी रात्री ११ ला श्रद्धा ने सुरज ला कॉल केला कि दांडिया खेळायला ये  सैनिक स्कुल च्या ग्राउंड जवळ मी थांबले आहे.  सुरज म्हणाला कि तू स्टार्ट कर मी आलोच त्याला इकडे कामे लागली. श्रद्धा ने शेवटचा कॉल केला येतोय का नाही का मी जाऊ घरी संपत आलाय दांडिया, सुरज म्हणाल दहा मिनिटात पोचतो. आणि लगेच पोचला तर दांडिया संपला होता श्रद्धा च्या मैत्रिणी गेल्या होता ती तिकडेच उभी होती सुरजची वाट बघत , सुरज आला आणि हॉर्न वाजवला तर ती म्हणाली नालायक आताशी आला का ? आता झाला दांडिया उद्या परत  ये  लौकर खेळू एकत्र.  सुरज म्हणाला चालेल  हातात घरी कशी जाणार तर ती म्हणाली भैय्याला कॉल करते आणि सांगते  तर सुरज म्हणाला कि मी सोडू का ? चाल सोडतो. रात्रीचे साडेबारा वाजून गेले. ती अशी कधी एकटी इतक्या लेट कुणाच्या गाडीवर बसली नव्हती आणि सुरजने पण असं कुणाला रात्री घरी सोडला नव्हता. सुरज सोबत तीला सेफ वाटायचे म्हणून ती लगेच बसली आणि सुरज ने गाडी ला किक मारली ! थोडंच पुढे गेला असेल तेवढ्यात पाऊस सुरु झाला ते दोघे नीट कल्याणी पाशी पण पोचले नव्हते. जोरात पाऊस सुरु झाला सूरज ने गाडी तिकडे वडाचं झाड आहे तिकडे थांबवली दोघे थांबले पाऊस पडत होता १०-१५ मिनिटे रपारप पडला पाऊस दोघे एकदम शांत उभे होते.
थोडा पाऊस कमी झाला श्रद्धा ला थंडी वाजत होती. ती थोडी भिजली पण होती. सुरज ने तिला तिचे जाकेट दिले. आणि श्रद्धाला म्हणाला श्रद्धा "आय लव्ह यु" मला  प्रेम  झालंय तुझ्या वर ! श्रद्धाला दोन मिनिट साठी काय होतेय काहीच  समजला नाही ! सुरज ने तेवढं बोलून शांत उभा राहिला !
श्रद्धा म्हणाली चाल उशीर झालाय घरी वाट बघत असतील ! सुरज ने लगेच गाडी स्टार्ट केली ! श्रद्धा मागे बसली आजपर्यंत तिने कधीच सूरज च्या खांदयावर हात ठेवला नव्हता आज ठेवला ! सुरज ला करंट लागल्यात झाले ! श्रद्धा शाहू नगर मध्ये राहायची सुरज तिला घरापर्यन्त सोडवायला गेला ! थोडासा अलीकडे त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि तिने त्याचे जॅकेट काढून दिले ! आणि सुरज ला आय लव्ह यु टू म्हणाली डोळे झाकले आणि सरळ हग केले. सुरज ला पण काही समजल नाही त्याने प्रतिसाद देत हग गेले ! आणि सरळ किस केले ! आणि सोडून दिले ! श्रद्धा चालत घरी गेली ती घरी पोचलेली दिसली कि त्याने गाडी ला किक मारली आणि घरी आला ! त्याने आणि तिने फर्स्ट टाइम किस केल होता कुणाला तरी दोघांच्या डोक्यातून ते क्षण जात नव्हते पहाटे ४ पर्यंत चॅटिंग करत होते शेवटी झोपले.
त्याच्यानंतर इज युजवल त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली सुरज ला मंगळवारी सुट्टी असायची मग त्या दिवशी कॉलेज बुडवून ते कास ला फिरायला जायचे,कधी सज्जनगडला ! श्रद्धा सातारा सिटीत आहे तोपर्यँत सुरज ला गाडीवर असली कि टच करत नव्हती एकदा बोगदा क्रॉस झाला कि त्याच्या गळ्यात हात टाकायची ! गाणी म्हणायची चेहऱ्याची ओढणी  काढून टाकायची !
 असं त्यांचं मस्त रिलेशन सुरु होते २ वर्ष झाली ! सुरज एकदमच भारी होता कधी तिच्यावर संशय घेत नव्हता आणि आणि ती पण सुरज चा स्पेस दुसऱ्या कुणाला घेऊन देत नव्हती ! प्रॉपर वेळ दयायचे एकमेकांना !
एकेदिवशी रात्री चॅटिंग करता करता सुरज म्हणाला तुला कोपर्डीची घटना समजली का तर श्रद्धा म्हणाली कि हो मूर्ख आहेत लोक अक्कल नाही त्यांना फाशी दिली पाहिजे. त्यानंतर आपल्या राज्यात मराठा मोर्चा सुरु झाले ! त्यात काही काही मागण्या होत्या !
त्याच्या आसपास रिलायन्स जिओ लाँच  झाले १ जीबी  डेटा २००  ला मिळायचा तो फ्री झाला ! मग सुरु व्हाटसप आणि फेसबुकवरून मराठा विरुद्ध दलित असे मेसेज , ऍट्रॉसिटी बंद करा अशी एका गटाची मागणी होती राज्य सरकार टेन्शन मध्ये होते राज्यात जवळ जवळ सगळेच अस्वस्थ होते. कधी पण कुठे पण दंगल होईल असे वाटायचे, गावागावाचे व्हाटसप ग्रुप  द्वेष पसरवण्याचे अड्डे झाले, दलित ग्रुप वर मराठा द्वेष आणि मराठा ग्रुप वर दलित द्वेष , मुस्लिम द्वेष असे प्रकार सुरु झाले.
आणि अश्या वातावरणात श्रद्धा सुरज चे प्रेम फुलत होते. सुरज ने सातारचा मराठा मोर्चा अटेंड केला. सूरजला जात समज कमी होती त्यावेळी पहिल्यांदा मराठा समाज एकत्र झाला होता त्यामुळे जवळ जवळ सगळे मराठा युवक उत्साहात होते. रात्री श्रद्धाला सांगताना त्याने दलित समाजाला नकळत कायतरी बोलून गेला. श्रद्धाला राग आला ! सुरज पण सॉरी म्हणायच्या मुड   मध्ये नव्हता  मग श्रद्धाने पण कायतरी पाठवला !
दोघांचं प्रेम होते पण काल दोघांना पहिल्यांदा जात समजल्यागत झाले. त्यानंतर जोपर्यंत मराठा मोर्चा सुरु होता तोपर्यँत त्यांचे मेसेज पाठवणे सुरु होतेच. पण प्रेम कमी नव्हते झाले. दोघे एकमेकांना म्हणायचे "तुमचा समाज असला तसला पण तू नाही तसा" असच त्यांचं प्रेम सुरु होते.  सुरजचे मित्र म्हणायचे आरे तिला झोपव  लवकर आणि दे सोडून  तर सुरज म्हणाला तसलं नाही करणार माझा खरे प्रेम आहे. पण शेवटी वाद इतका वाढत गेला कि ब्रेकअप झाले. मग श्रद्धा पुण्याला निघून आली सुरज तिकडेच थांबला ! जवळ जवळ एक वर्ष एकमेकांसोबत बोलली नाहीत.
ह्या वर्षी श्रद्धा सातारला आली होती फेब्रुवारी मध्ये  स्कुटीवरून घरी येत असताना वायसी जवळ तिला सुरज दिसला तिने गाडी थांबवली  त्याने पण थांबवली दोघे परत डिजे कॉलेज जवळ गेले. दोघे परत दहा पंधरा मिनिटे न बोलता क्षणात उभे होते. श्रद्धा म्हणाली मी गेल्यावर तू पटवली असशील ना दुसरी ? आणि सुरज पण तेच म्हणाला तुला भेटलं असेल पुण्याला कोणतरी !
तर सुरज म्हणाला ह्याच एरियात तुला प्रोपोज केले होते आणि आज परत प्रोपोज करतोय "आय लव्ह यु" लग्न करशील का ?
श्रद्धा ने शून्य मिनिटात हो म्हणत त्याला एक फाईट मारली म्हणाली एवढा कसला अटीट्युड कि वर्षभर कॉल नाही केलास स्वतःहून माकडा ? सुरज म्हणाला तू तरी कुठे केलास ? परत दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली !
रात्री मला फोन आला मॅडी भावा पुण्याला येतोय व्हॅलेंनटाईन डे ला श्रद्धाला घेऊन येतोय ,आळंदीला लग्न करायच आहे आपल्याला तू एक पाहिजे तिकडे आपल्याला. मी म्हटलं चालतंय कि भावा ! करू कि !  ते दोघे जण आले त्यादिवशी पण मला ऑफिस च्या कामानिमित्त दिल्लीत जावे लागले त्यादिवशी त्यामुळे मी काही साक्षीदार होऊ शकलो  नाही आळंदीत.
मनापासून प्रेम असेल तर जात, धर्म ह्या असल्या भुरट्या गोष्टी मॅटर नाही करत








Sunday, 27 October 2019

दगडांपासून जिवंत मूर्ती घडवणाऱ्या शिक्षकाबद्दल ! 😍



आम्ही सातवीला होतो त्यावेळेस  नुकतीच सगळ्या मुलांचे लाडके  "जेना सरांची" बदली झाली होती. त्यांच्याजागी नवीन सर आले होते.  डोळ्यावर काळा चष्मा, डोक्यावर कुरळी कुरळी केसाचा भांग, आणि चेहऱ्यावर  एकदम वेगळेच भाव  नक्की रागात आहेत का आनंदात आहेत हेच नाही समजणार  उंचीने थोडे बुटके अंगावर निळे जीन्सचे ज्याकेट असे हे सर होते.  तसा पण आम्हाला त्यांचा आणि आमचा  त्यांचा दूरदूर पर्यंत संबध नाही असे वाटायचे ते शिवालिक सिनिअर चे हाऊसमास्टर होते ( नवोदय मध्ये रेक्टर ला हाऊसमास्टर म्हणतात. )  पण आधी जेना सर पहिले होते त्यामुळे हे सर जरा कडकच वाटायचे. असो
 एकदा शनिवार होता  आणि आमच्या हाऊस मधे खूप दंगा चालू होता. सगळे ओरडत होते या विंग मधून त्या विंग मधे जात होते.  दंगा खुपच असह्य झाल्यावर सर जोरात चिडले असतील म्हणून ते घरातून बाहेर पडले म्हणजे त्याचा घर आमच्या होस्टेल समोरच होते आणि सर हळू हळू आमच्या होस्टेल कडे यायला लागले आणि होस्टेल च्या पायऱ्यापाशी पोचलो तेवढ्यात माझा मित्र प्रवीण ज्याला आम्ही प्रव्या म्हणायचो त्याने सरांना पाहिले आणि त्याने विचार केला आता सगळ्या पोरांना सर लय रेटतील ( मारतील) म्हणून लगेच जाऊन सांगूया पण सरांनी त्याला तिथूनच हात दाखवला आणि सांगितले तिकडेच थांब. हात पण असा दाखवला जसा कि गणपतीचा हात असतोन मूर्तीत तसा.  सर पायरी चढून वर आले शिवालिक जुनिअर च्या पहिल्या विंग मध्ये जे कुणी सापडले सगळ्यांना धुवत धुवत चौथा विंग पर्य्नात आले  तिथे प्रशांत म्हणून एक पोरगा होता  तो जर जास्त हुशार होता. तो बेडवर शांत बसला होता. सरांना जरा आश्चर्य वाटले हा शांत  कसा काय म्हणून त्याला विचारले
तू होता करे दंग करत ? त्यावर तो म्हणाला नाही सर मी संडासला गेलो होतो .
सर म्हणाले अच्छा तर हात दाखव त्याने हात दाखवला तर हात एकदम कोरडा ठणठणिट !  मग काय असा रेटला त्याला कि बासच परत कधी त्याने कुठल्या सरांना खोट बोलताना दहा वेळा विचार केला असावा.  त्याच्यानंतर पण राहिल्याल्यांची धुलाई झाली पण आम्ही दंगेघोर ग्यांग मात्र समजून चुकलो कि हे सर डेंजर आहे आणि लय हुशार पण आहे.   ते सर होते शिवालिक चे हाऊस मास्टर श्री मनोज राउत सर. 
ह्या घटनेनंतर सगळ्याच मुलांवर त्याची जरब बसली होती. 
आठवीला गेल्यावर शाळेतली काहीतरी पॉलिसी बदलली आणि आठवीतच सिनियर हाऊस  ला आम्हाला टाकले आणि आम्ही सगळे  राउत सरांच्या  हाऊसला  गेलो, त्यांच्याबद्दल  जरब जास्त होती, त्यामुळे मनातून वाटत होते कि खूप मार खावा  लागणार आहे आणि झाले पण तसच अगदी जिथे जिथे संधी भेटेल तिकडे सर आम्हाला मारायचे पण सरांच्या ह्या माराचा आम्हाला कधी राग यायचा नाही बाकी कुठल्या शिक्षकांनी मारलं तर मात्र आम्ही खूप रागात असायचो,  राउत सरांबद्दल एक वेगळीच "आत्मियता" झाली होती, त्यांच्या मार खाण्यात मज्जा वाटायची आणि आता मोठे झाल्यावर तर त्या गोष्टींना आठवून भारी वाटते, नाहीतर काही काही पोरांचे बालपण असत   " विद्यार्थी आयुष्यात साधा ओरडा पण खाल्ला नाही मार तर दुरच"   एनीवेज बॅक टू राउत सर !
राउत सर म्हणजे शिवालिक हाउस वाल्यांची एकाअर्थानी "आई" होते,  शाळेच्या वयात सगळी बरीचशी मुल दंगा, मस्ती करतात आणि शाळेत असताना बाकीचे शिक्षक नुसता असेम्ब्लीला लेट झाला कि सरळ प्रिन्सिपल  सरांकडे घेऊन जायचे मग त्यामुळे पोराची इज्जत तर जायचीच प्लस प्यारेनट्स सहन कराव लागयच ते वेगळ पण हे सर मात्र कितीही मोठी चूक होऊदे  स्वत:च्या लेवेल वर ह्यांडेल करायचे, मी आज पर्यंत खूप शिक्षक पहिले आहेत पण  ह्युमन  म्यानेजमेंट @ पर्सनल लेवेल त्यांचाइतक बेस्ट कोणीच नाही करत अगदी  देशातल्या प्रतिष्ठीत टाटा इनस्टीट्युट मधले सायकालॉजिस्ट पण नाही. 
प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसिक गरज ओळखून त्या अकोर्डींग त्याला तसं  सोलुशन बनवून त्याच्या नकळत त्याला इम्प्रोव  करन हे जिकिरीच काम सर करायचे.  आय रिमेंबर आठवीत असताना  अकरावीच्या  दीपक भैय्याचे ५० रुपये चोरी झाले होते आणि त्याला वाटत होते आठवीच्या कुणीतरी घेतले त्यात त्याला मी आणि प्रव्यानि घेतले असे वाटत होते  त्यामुळे आमची खूप जोरात भांडणे झाली होती मला खूप राग आला होता, मी बाहेर जाऊन एक मोठा दगड आणला होता त्याच्या डोक्यात घालायला पण अचानक राउत सर आले आणि त्यांनी तो विषय योग्य पद्धतीने सोडवला,  त्यावेळेस माझ्या अंगात असलेला हिंसकपना आणि दीपक भैय्याच्या अंगात असलेली संशयीवृत्ती ला सरांनी व्यवस्थित वेसन घातली.  मला अजून कधी कधी वाटते त्यादिवशी सर नसते तर .....  नुसता विचार करूनच नको होते. बाकीच्या मुलांचे पण बरेचसे असे इशुज सरांनी सोडवले असतील.  मी बारावीला असताना तुम्ही दहावीच्या एका मुलाला  जो मेंटल पाठिंबा  दिला ,त्याला हॉस्टेल आणि क्लास मधून बराच त्रास होता आणि त्या रात्री मी तुम्हाला  याबद्दल सांगितल्यावर  तुम्हालापण वाईट वाटल होत खूप आणि तुम्ही त्यानंतर  क्लास मध्ये त्याला समजावून त्याला परत न मारता, बाकी त्रास देणाऱ्या पोरांना  तो सूचक इशारा दिला आणि त्याचा बराचसा त्रास कमी झाला. हि गोष्ट तर न विसरता येण्याजोगी आहे. 🙏 ( बरेच दिवस मुलांमध्ये हि  चर्चा होती कि राऊतसर ह्याला अचानक का सपोर्ट करत आहेत.)
अजून एक गोष्ट  म्हणजे हाऊसच्या  कुठल्यापण मुलाचे प्यारेंट्स  आले कि तुम्ही सर्वाना समान वाजवायचा मला हे खूप आवडायचे, शाळेत कितीतरी गरीब पोर  होती, त्यांचे प्यारेंट्स पण गरीबच पण सगळ्याशी त्याच फ्रिक्वेन्सी  मधून बोलायचा 
 त्यावेळेस साळुंखे सरांनी प्रत्येक वर्गाला ट्रीप ला न्यायचा रतीब लावला होता,आता होस्टेल आहे म्हटल्यावर गरीब श्रीमंत अशी बरीचशी पोर असतात वर्गात  त्यावेळेस खुपदा सर येऊन विचारयाचे   पैशे आहेत का जायला आणि जरी खोट आपण खोट बोलल कि सर आहेत तरी त्यांना कळायचे नेमके फि भरायच्या वेळेस सर येऊन पैशे द्यायचे, शिवालिकच्या पोरांनी अनुभव घेतला असेल याचा खुपदा. 
मला कायम  वाटत राहत हे सर खरतर जनयु,टीआयएसएस मोठ्या  विद्यापीठ लेवेल च्या प्रोफेसर साठी अगदी योग्य आहेत, त्याचं विजन, त्यांची विचार क्षमता, त्यांचा विषयातल ज्ञान  हे सगळ   खूप खूप मोठ्या प्रोफेसर मधेच सापडतं आणि आम्हाला ते इतक्या लहान वयात मिळालं याच्यापेक्षा दुसर आमचा भाग्य काय असणार ! 
 सर मुलांच्या  अकॅडमिक प्रगती साठी  "डेलीवर्क" नावाची  कन्सेप्ट वापरायाचे किती मुल  खूप मन लावून करायची नाहीत पण मी ९ वी ला ते खूप मन लावून केल, नववीला असलेला "जगाचा इतिहास" आजपण आपल्याला एकदम point तो point माहित आहे. 
त्याच मॅनेजमेंट स्किल खूप  Strong &  Result oriented आहे, कोणतीही  गोष्ट   अगदी सोप्या पद्धतीने पॅनिक न होता करणं  हे कुनीपण तुमच्याकडनं  शिकावं, निदान मी तरी तुमच्या कडून शिकलोय. कॉर्पोरेट क्षेत्रात ह्या स्किलची खूप गरज असते.  👌👌
 एकदा शाळेत  पॅनल इन्स्पेक्शन  आलं होत आणि पुस्तकाच्या शुल्लक कारणावरून  तुम्हाला ते पॅनल कसेतरी  वाईट बोललं  होत ज्यात तुमची काहीच चूक नव्हती आणि  महत्वाची  गोष्ट  म्हणजे त्यावर्षी सोशल सायन्सचा  काहीच निकाल सर्वोत्तम होता तरीपण तुम्हाला बोललं  गेलं तुमचा डोळ्यात  ! नेमकं हे घडताना मी आणि कोणातरी  कॉम्पुटर लॅब पाशी उभे होते आणि आम्ही चोरून ऐकलं मला त्यावेळेस वाटलं तुम्हाला पाठीवर थाप मिळणार आहे म्हणून आम्ही उभे राहिले होतो पण ऐकायला उलट मिळालं , मला पर्सनली खूप राग आला होता त्यावेळेस त्या पॅनल चा ( हि गोष्ट  आज पहिल्यांदा सांगतोय मी त्यावर्षीपासून कुणालाच सांगितली नव्हती मी  आणि क्षमा पण मागतो खाजगी गोष्ट  उघड केल्याबद्दल ) कधी कधी माणसाला खूप कष्ट करून पण  अप्रेशेशेन मिळत हे त्यावेळेस समजलं आणि ते पण आपण बेस्ट परफॉर्मर असताना ! पण तुम्ही ते पण सहन केले आणि पुढे वाटचाल करत राहिला ! 
तुम्ही  वैयक्तिक आणि करियर पातळीवर खूप संघर्ष करत आहात आणि तुमची ती लढाई बघून मला माझा संघर्ष अगदी छोटा म्हणजे कस्पटाप्रमाणे वाटतो ! माझ्या सारख्या कितीतरी दगडांना  तुम्ही मूर्तीत घडवलं आहे !   एखाद्या माणसाला प्रेरणा तर खूप शिक्षक  देतात  पण तुम्ही त्या  माणसाला योग्य रस्ता दाखवता आणि तो  त्या रस्त्यावर कसे चालायचे हे पण तुम्ही शिकवता ! 

शनीवार  होता २४ मार्च २००७ ची घटना आहे मी  दहावीला होतो त्यावेळेस 
उद्या रविवार होता म्हणून मुले सगळी हॉस्टेलच्या मागे खेळत होती आम्ही हॉस्टेल ला हाऊस म्हणायचो नवोदय मधे  मोन्या (मोहनीश खुंटे) अलंकार आणि  पोरे बॅटबॉल खेळत होती  आणि आमच्या हाऊस मास्टर म्हणजेच राऊत सरांना सापडली आणि नेमका मी तिकडून जात होतो मग सरांनी त्यांना दोन चार बोल ऐकवत सोडून दिले आणि माझ्यावर बोलायला लागले साधारण रात्रीचे ९:४५ झाले होते आणि त्यानंतर आमचे बोलणे रात्री अडीच पर्यंत चालले घटनेचं  एका वाक्यात क्रक्स म्हणजे  मला  आत्मशक्तींची जाणीव करून दिली आणि जिवन म्हणजे काई हे समजले. 
त्या नंतर मला हळू हळू समजले कि नक्की काय करायचे . 

 🙏🙏🙏 
शिष्याला त्याच्या आत्मशक्तीची जाणीव करून देणाऱ्या या गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !😍😍🎂🎂

Sunday, 13 October 2019

भातकेक

मी त्यावेळेस सातवी ला होतो  दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्या आणि आमच्या कॉलनी मध्ये खूप पोर होती.   दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये खूप वाढदिवस असल्याचे त्यामुळे आम्हाला  केक खायला मिळायचा आम्ही सगळे बघतच असायचो कि आज कुणाचा वाढदिवस आहे ते. ज्याचे आईवडील चांगल्या ठिकाणी कामाला होते त्याच पोरांचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे  बाकी आमच्यासारखे ज्यांचे आईवडील एमआयडीसी मध्ये कंपनीत कामाला असल्याचे १०० रुपये हाजरीवर त्यांचे वाढदिवस साजरे सोडा लक्षात पण नसायचं कुणाच्या. असो बॅक तो स्टोरी
आमच्या ग्रुप मध्ये स्वप्नील नावाचा एक पोरगा होत्या आय मिन अजूनही आहे त्याला आम्ही "सप्या" म्हणायचो.  माझ्यापेक्षा  ३ वर्षांनी लहान होता. आमचा चांगला ग्रुप होता आम्ही लग्न असले कि जवळच असणाऱ्या जानाई मळाई मंगल कार्यलयात जेवायला जायचो विना आमंत्रण त्यानंतर  धनगरवाडी जवळच्या कॅनल ला पोहायला जायचो रोज तिकडे चिंचा आणि बोर खायची संध्याकाळी ४ ते ५ पर्यंत घरी टच !
एक दिवशी असंच घरी आलो तर कॉलनीत एकाचा  वाढदिवस होता.  आम्ही सगळे गेलो तिकडे केक खायला त्यावेळी कुणाच्या तरी लक्षात आले कि आज "सप्याचा"पण वाढदिवस असतो.  हे नेमकं ज्याचा वाढदिवस होता  त्याच्या लक्षात आल त्याने सप्याला केक कापायला बोलावलं तर त्याच्या वडिलांनी त्याला आतल्या घरात नेले व  म्हणाले  कि "आय घालायला एवढा पैसा खर्च करून तुझा वाढदिवस साजरा करतोय का आम्ही ?  दुसऱ्याचा पोराला कशाला बोलावतोय ? गुपचूप एकटा केक काप. तो पण बापाच्या पुढे जाऊ शकला नाही. सप्या आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले पण कसातरी कन्ट्रोल करून वेळ मारून नेली.

हे मी ऐकलं मला खूप राग आला असं वाटलं कि आत्ताच विद्रोह करून बाहेर जावे मग मी आमच्या गॅंग ला सांगितलं हे आमची गॅंग पण चिडली पण तो पोरगा आमचा दोस्त होता आणि आम्हाला केक पण खायचा होता मग विद्रोह तिथेच शमला ! त्याचा वाढदिवस झाला  चांगला चॉकोलेट केक होता पण माझी आणि राहुलची इच्छाच मेली होती केक खायची  चॉकोलेट केक मला आवडायचा  पण मला आणि राहुल ला खूप वाईट वाटला होत कि साला गरिबाला काय किंमत आहे काय नाही ? आम्ही ठरवलं सप्याचा वाढदिवस साजरा करायचा योगायोगाने त्या दिवशी जानाई मळाई मंगल कार्यालयात जेवण होते आय मिन लग्न होते.
नेहमी प्रमाणे तिकडे गेलो जेवण केले जेवताना बुंदिचे लाडू होते ते खिश्यातुन लपवून आणले.शनिवारचा दिवस होता आमच्या कॉलोनी शेजारी मराठी शाळा होती. तिकडे मी आणि राहुल गेलो  बाकी पोरांना सांगितले कि तुम्ही पुढे जावा कॅनल ला आम्ही येतो.
आम्ही शाळेत गेलो तिकडे आमच्या माजी मॅडम होत्या त्यांना सांगितले कि मॅडम आम्हाला थोडा भात हवाय  मी शाळेचा हुशार विद्यार्थी होतो चवथीला स्कॉलरशिप आणि नवोदय मध्ये निवड झाल्यामुळे मला वेगळा मान होता, अजुनपण आहे.  त्यामुळे लगेच भात भेटला आम्ही एका डब्यात भात घेतला.
आणि तिकडून कॅनल कडे जायला निघालो तिकडे रस्त्यात आमच्या इकडे येणारा भंगारवाला दिसला   मराठी शाळेच्या आवारात रात्री रोज दारुडे दारू पिऊन बाटल्या टाकून जायचे आम्ही सकाळी सकाळी उठून त्या आणायचो आणि विकायचो तेवढंच खर्चायला पैसे भेटायचे.  पण त्या दिवशी बाटली नव्हती त्यामुळे
खिश्यात काहीच पैसे नव्हते  मी त्या भंगारवाल्याला सांगितले कि आज २ रुपये दे तुम्हाला दोन दिवसात १० बाटल्या देतो त्याने पण लगेच दिले आमच्यावर विश्वास होता. ते दोन रुपये घेऊन आम्ही दुकानात गेलो १ रुपयाला भेटणारे कपकेक घेतले  शेवटी प्रस्थान केले
कॅनल मध्ये खूप वेळ पोहलो शेवटी तीनच्या सुमारास कंटाळा आल्यावर कॅनल मधून बाहेर आलो डोक्यावर ओल्या  अंडरपँट  अडकवल्या आणि चिंचा काढायला गेलो.
तिकडे एक झाड तोडलेलं होत त्याच्यावर आणलेला भाताचा डब्बा उलटा ठेवला व अलगद डब्बा काढला  त्यामुळे व त्याच्यावरती जे कप केक आणले होते त्याचा चुरा करून टाकला एकदम डिट्टो केकच दिसायला लागला ते. मग सप्या आणि तो पोरगा ज्याचा वाढदिवस त्यादिवशी होता त्यांना बोलावले आणि केक कापायला लावलं केक कापायला चमचा वापरला !
आम्हाला हॅपी बर्थडे  चे गाणं फक्त पहिलीच ओळ यायची तेवढीच आम्ही रिपीट केली मग जरा डान्स केला आणि "भातकेक" खाल्ला आणि ५ वाजता  वाजता घरी गेलो. सप्याचा पहिला वाढदिवस होता  ज्यावेळी त्याने केक कापला होता. तो तर एकदम खुश होता आणि आम्ही पण !

आजपण कुणाचा वाढदिवस असला तर मी चॉकोलेट केक आणा असं म्हणतो आणि खूप वेगेवगेळ्या प्रकारचे चॉकोलेट केक खाल्लेत  खुपसारे मोठे वाढदिवस  साजरे केलेत पण सप्याचा वाढदिवसाचा भातकेक अजून आठवतो अजून आठवतात तो  दिवस !






Thursday, 11 October 2018

सीमा कि सिमा ?

मी साताराजवळच्या कोडोली गावात राहायचो आय मिन अजून सुद्धा राहतो  त्यावेळेस मी चौथी का पाचवीत होतो  चौथीचं पूर्ण वर्ष  स्कॉलरशिप च्या अभ्यासात गेलं होत एकदा ती  परीक्षा झाली. त्यानंतर आम्ही पाचवीला जाणार होतो त्यावेळेस परत वर्ग फुटणार आहे पाचवीला  बाकीच्या तुकड्यातील मुले मुली मिळून परत तुकड्या पडणार होत्या आमच्या वर्गातील काही हुशार मुले ( म्हणजे अभ्यासात हुशार) सयाजीराव, भारत विद्या मंदिर अण्णासाहेब  कल्याणी ला जाणार होते  आम्ही मात्र जिल्हा परिषद शाळेतच शिकणार होतो ( बेस्ट शाळा असतात त्या गरीब श्रीमंत सगळ्या जातिधर्मची पोर पोरी एकत्र शिकत असतात मज्जा येते) असो तर स्टोरी अशी आहे कि
आमच्या वर्गात सिमा म्हणून एक मुलगी होती  ती उत्तर प्रदेश वरून आली होती एकदम स्मार्ट मुलगी दिसायला सुद्धा चांगली ती आमच्याच कॉलनीत राहायची  मला त्यावेळेस ती हाय क्लास वाटायची म्हणून मी जास्त बोलत नसायचो.  सीमा कडे वर्गाची चावी असायची आणि वर्गात मॅडम साठी घरून पाणी आणायची रिस्पॉन्सिबिलिटी होती. एकंदर मुलगी चांगली होती. आमच्या वर्गात सीमादेवी नावाची अजून एक मुलगी होती तीच आणि माझं जमायचं ( जमायचं म्हणजे मैत्री होती चांगली ती धनगरवाडीत राहायची त्यामुळे येताना चिंचा आणायची माझ्यासाठी) सीमादेवी सुद्धा उत्तर प्रदेश ची होती .
आमच्या वर्गाच्या शेजारीच ब तुकडी होती त्यात एक नापास होऊन आलेला सागर नावाचा पोरगा होता तो मोठा असल्या करणारे शरीराने हट्टाकट्टा होता साहजिकच पोरांनी त्याला डॉन करून टाकला अभ्यासात एकदम ढ गोळा पण बाकीच्या वेळेस हिरो)
त्यावेळेस त्याला सीमा आवडायला लागली  तिच्या वर लाईन मारायला लागला तो मग  साडेबाराच्या सुट्टीत ड तुकडी जवळ येऊन थांबणे सीमा दिसली कि खुश होऊन त्याच्या आजूबाजूला पोर त्याला  खुश करायची . हे  बरेच दिवस सुरूच होत शिक्षक लोकांनी याकडे सुरक्षा केलेले.  सीमाला समजले होते हा मागे लागला आहे पण  सीमाच्या मनात तसलं काहीच नव्हतं त्यामुळे ती रिलॅक्स होत.  असो बॅक टू स्टोरी
वार्षिक परीक्षा झाली  आम्हाला   उन्हाळयाच्या   सुट्ट्या  लागल्या आणि  कष्टकरी वर्गातील पोर सुट्टी लागली तर गावाला जात नाहीत. मी पण कुठे गेलो नव्हतो.
सीमा पण होती त्यावेळेस सगळ्या मॅडम लोकं मुलांचे पेपर चेक करत असायच्या काहींचा रिजल्ट चांगला लागावा म्हणून काही ढ गोळ्या पोरांना पास करायला लागायचे मग मॅडम लोक आमच्यासारख्या मुलांना बोलवून त्याच्या उत्तर पत्रिकेत थोडं लिहायला लावायच्या. मग मला सीमा श्रद्धा, विक्रम अश्या थोड्या हुशार लोकांना बोलवायाचे. त्यावेळेस सुद्धा बोलावले आम्हाला ते काम करायला खूप अभिमान वाटायचा आणि आपण कोणतरी भारी आहोत हा फील यायचा तो वेगळा असो ते काम झालं कि आम्ही घरी येताना सीमा आणि सोबत असायचो. त्यावेळेस आमचा बोलणं व्हायाला लागला मग समजले ती काही जास्त हाय फाय नाही आणि आपण पण काय लो क्लास नाही. त्यावेळेस आमची ट्युनिंग जमलं. तिची आई गावाला होती घरातले सगळं तीच करायची. त्यावेळेस एकदा सीमा म्हणाली कि तो सागर आणि मी एका वर्गात नको यायला. सागर माझ्या मागे लागला आहे. आपण दोघे एक वर्गात  आलो पाहिजे असं पण म्हणाली
पण  पाचवीला गेल्यावर  मी गेलो गुरव मॅडमच्या वर्गात आणि  ती गेली पिसाळ मॅडमच्या वर्गात.  सागर ज्याला आता सगळी सागऱ्या म्हणायला लागली होती तो पण तिच्याच वर्गात गेला. तिला जाचक त्रास सुरु झाला. रोज तिला चिट्टी देणे सुरु झाले
सीमा  पण चिट्ट्या घेत होत बरीच लोकांना वाटलं कि सिमा  पटली त्याला म्हणून. पण प्रत्यक्षात  वेगळच होत ती चिट्ठी घेतली कि उघडून बघायची त्यात एक    बदाम आणि बाणाचे चित्र काढलेले असायचे  त्यात एका साईडला ला सागर आणि दुसऱ्या साईड सीमा लिहलेले असायचे. सीमा त्यातले  स्वतःचे नाव खोडायची
आणि देऊन टाकायची चिट्ठी कुणाला पण. त्याचे असले प्रकार बरेच दिवस चालू होते. मी नवोदयच्या अभ्यासात गुंतलो असल्यामूळे तिकडे लक्ष देत नव्हतो.
झालं असाच दिवस गेले मी पाचवी झाल्यावर ती शाळा सोडून नवोदयला शिकायला गेलो  व हे सगळं विसरून पण गेलो.
एक वर्षी मला सीमा साताऱ्यात भेटली खूप  दिवसांनीं भेटल्यामुळे खूप आनंद झाला होता. तेंव्हा ती सांगत होती कि आता ती युपी ला परत जाणार आहे वैगरे.
नंतर मी मस्तीमध्ये विचारले ते सागर चे काय झाला पुढं ?
ती हसायला लागली  आणि म्हणाली  आम्ही जानाई मलाई हॉल  जवळ राहायला गेल्यावर तो आला होता एकदा घरी  रीमाला  सांगितले आणि मला बाहेर  बोलावले,  मी  जाणारच  नव्हते  पण घरात पप्पा होते म्हणून मी बाहेर गेले आणि विचारले काय आहे तर  त्याने  परत एक  चिठ्ठी दिली मी तिकडेच उघडून बघितले तर तेच होते एक बदाम  एक क्रोस  बाण आणि ह्या साईड ला सागर आणि त्या साईड ला सीमा . मी चिठ्ठी वाचली आणि आणि म्हणले  चौथी पासून माझ्या मागे आहेस  तरी  अजून  माझं नाव लिहायला येत नाही सीमा ला वेलांटी आहे का दुसरी ते पण नाही माहित ? आणि कसला प्रेम करणार तू.
एवढं सांगून ती हसायला लागली मी पण  थोडा हसलो आणि बाय बोलून गेलो (   त्यावेळेस व्हाटसप नव्हते नाहीतर तिचा व्हाटसप नंबर घेतला असता)
तर हा किस्सा  लिहायचे कारण कि मला फेसबुक वरून समजले कि सीमा आता "शिक्षक" झालीय. 

Wednesday, 30 August 2017

जानाई मळाई आणि बाय

सज्जनगडच्या थोडस अलीकडे  आंबवडे म्हणून गाव आहे  दोन आंबवडे आहेत त्या रोडवर एक थोरलं आणि एक धाकट, माझी आत्या धाकट्या आंबवड्यात राहते, माझे वडील, त्याचा लहान भाऊ आणि हि आत्या एकदम क्लोज होते त्यांच्या लहानपणापासून, माझे वडिलांना ४ भाऊ आणि ४ बहिणी होते.  माझे वडिलांचा ४०७ टेम्पो होता आणि   ज्या ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते माझ्या आत्याला भेटायला जायचे.   त्या आत्याला घरात सगळे “बाय” म्हणत माझे वडील सुद्धा बायच म्हणायचे आणि आम्ही सुद्धा बायच म्हणतो.  असो
१९९५ च्या ला माझे वडील वारले, वडिलांना त्यांच्या मरणाची कुणकुण लागली होती आधीच
त्यावेळेस बाय आंबवड्यावरून माझ्या वडिलांना भेटायला यायची ती पैशाने काही श्रीमंत नाही पण जीव लावते सगळ्यांवर. ती आली कि माझे वडील तिला म्हणायचे बाय आत्ता माझं काय खर नाही मी कधीपण मरेन, माझ्या तीन  पोरांची कोण नाही तू सांभाळ बाकीच्या बहिणी नाहीत बघणार त्यांच्याकडे पण तू तरी बघ
तर बाय म्हणायची “आर दिलीप आस का बोलतोय व्हशील बरा तू”
आप्पा म्हणायचा अशोक गेला सोडून तिकडून तो मला बोलावतोय ( अशोकनाना हे माझे सर्वात लहान चुलते, माझ्या वडिलांचे लहान भाऊ)
बाय लई खंबीर आहे मनाने ती म्हणायची
एकतर तू काही जात नाही आणि गेलास तरी तुझ्या पोरांना मी आहे
वडील वारले आणि आम्ही आमच्या  शाहूपुरीच्या घरातून बाहेर पडलो,
आणि कोडोली जवळ राहायला आलो कारण तिकडे एमआयडीसी होती आयमीन अजून आहे
काहीतरी काम भेटेल ह्या आशेने आम्ही तिकडे स्थलांतर केले.  कोडोलीच्या जवळचा जानाईमळाई देवीचा डोंगर आहे, तिकडे दर शुक्रवारी आणि मंगळवारी लोक जातात, देवीच्या भक्त लोक लोकात जास्त बायका असतात.  “ज्या बायकांचे नवरे वारलेले असतात, ज्या बायकांना नवऱ्याने सोडून दिलेले असते, किंवा ज्या बायका बिनालग्नाचा असतात त्यांना मांढरदेवी काळूबाई, जानाईमळाई, नाशिकची रेणुकामाता, अश्या देवता जास्त जवळच्या वाटत असतात त्याचे कारण अस आहे कि समाज अश्या महिलांकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि अश्यावेळेस त्या बायकांना ह्या देवीचा मानसिक आधार वाटत असतो. ( हे फक्त माझे निरीक्षण आहे). ब्याक तो स्टोरी
तर ह्या जानाईमळायच्या डोंगारावर आम्ही जायचो कायम, मी आठवीला असताना बायकडे गेले होतो बहुतेक उन्हाळ्याची सुट्टी होती बायने मला मी ४ वर्ष्याचा असताना बघितलं होत आणि आता मोठा झालो होतो  मी  तिच्या घरी गेल्यावर तिने ओळखलच नाही मला पहिल्यांदा मी सांगितले “मी दिलीपचा मुलगा”
आप्पाच नाव  ऐकल  आणि मला जवळ वडल पटपटा मुके घेतले आणि म्हणाली एवढा मोठा झाला व्हय तू आणि रडायला लागली आता मला समजेना बाय रडतेय, थोड्या वेळाने ती शांत झाली, मला जेवायला दिल आणि विचारलं तू आणि नितीन कधी जानाईमळाई च्या डोंगरावर गेला होता का ?
मी म्हणालो हो लयदा गेलो पार पयलीपासून जातोय आम्ही कोडलीजवळ राहतो ना ( शाहूपुरी सोडल्यानंतर कुणालाच माहित नव्हते आम्ही कुठे राहतो ते)
तिनेते ऐकल आणि परत रडायला लागली आणि म्हणायला लागली
“ दिलीप  तू खर बोलत होतास, मला माफ कर”
बाय खूप रडत होती आणि मी ब्लांक झालो होत काय चाललय समोर काही कळत नव्हते.   जेवायला वाढलेले ताट तसच होत
शेवटी ती रडायची  थांबली आणि सांगायला सुरुवात केली
म्हणाली
 साल १९९७ का ९८ ला मी  जानाईमळायला आलेले दर्शन घेतले आणि प्रसाद घेतला आणि आंबवड्याला परत आली, घरात आणि आजूबाजूला प्रसाद वाटला रात्रीचा स्वयपाक बनवला आणि रात्री जेवली आणि झोपली.  
रात्री मला एक  स्वप्न पडलं, स्वप्नात दिलीप आला होता
आणि म्हणाला काग बाय माझ्या दोन पोरांच्या जवळून गेलीस तर त्यांना ओळ्खल नाहीस
बाय म्हणाली कधी आणि कुठ ?
माझे वडील म्हणाले तू आज जानाईमळायला गेलीतीस्ना, तिकडच होती मिलिन आणि माझ पिटुकल ( माझ्या छोट्या भावाला घरात त्यावेळेस पिटुकल म्हणायचे)  आणि “तू शेजारण गेलीस दोघांच्या पण वळांखल नाय तू बाय”
बाय म्हणाली  आर तुझी पोरांना कस विसरीन मी, ती नव्हतीच पण डोंगरावर  
आणि स्वप्न संपल
पण अशी स्वप्न मला अजून पडतात दिलीप तेच म्हणतो अजून आणि मी तेच उत्तर देत होते ,पण आता मला वाटतंय दिलीपच बरोबर होता मी बघितलेली तिकड पोर पण मनात म्हटले दिलीपची पोर इकडे कश्याला येतील, दिलीप खरच बोलत होता.
आज  परत दिलीप स्वप्नात आला तर माफी मागेन त्याची.
बायने सांगितलेली  स्वप्नाची कथा किती खरी आहे हे मला नाही माहित पण एक समजल कि बाय आणि माझे वडिलांचा बॉंड माझे वडील गेल्यानंतरपण तसच आहे. 

Tuesday, 8 August 2017

लहानपणीची गोष्ट



मी दुसरी का तिसरीत होतो त्यावेळेस  साताराजवळच्या कोडोली गावात राहायचो म्हणजे अजून सुद्धा तिकडेच राहतो.  आम्ही कॉलोनी  मध्ये राहायचो हि कॉलोनी बनलेली  बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या माणसांनी.  पार बेळगाव, बिहार,यूपी  ते अगदी जवळच्या चिंचणेर  पासून लोक कॉलोनीत  राहतात.  मध्यमवर्गीय  कष्टकरी गरीब असला   कि जात धर्म ह्या फालतू गोष्टीना घेऊन जास्त उड्या  मारत नाही, कॉलोनीत  सगळे लोक शेजारी असणाऱ्या  जुन्या आणि नव्या एमआयडीसी मधल्या कंपनीत  कामाला  जायचे सकाळी आठला बाहेर कि रात्री आठला  ला घरी. त्यामुळे कॉलोनीतली पोर  सगळी दिवसभर भर इकडे तिकडे करत असायची.
कॉलोनीला लागून जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा होती आणि शाळेचे  खूप मोठं मैदान होत त्याला आम्ही "माळ" म्हणायचो. खालच्या साईडला  मातंग वस्ती मधल्या कुणीतरी खूप अगोदर ती जमीन शाळेसाठी दिली होती. बरेच मोठे मैदान होते.
तिकडे आम्ही बॅटबॉल  खेळायचो आणि तिकडे खेळायला बऱ्याच लांबून यायची पोर कोडोली गावातून दोन तीन ग्रुप यायचे, आमच्या कॉलोनीतले दोन,तीन, मातंग वस्तीतला एक ग्रुप कधीतरी धनगरवाडी चे पोर यायची सगळी नीट खेळायची.
एकदा असाच रविवार होता
आम्ही श्रीकृष्णा संपून बॅटबॉल खेळायला आलो होतो, बाराला शक्तिमान लागणार म्हणून आम्ही लौकर लौकर आवरत होतो आम्ही म्हणजे आमच्या टीम चे नाहीतरी लहानपणी बारक्याना  फिल्डिंग साठी वापरतात आणि ट्रायबॉल खेळायला देतात.  लहान मुले पण मोठे होऊन बॅटिंग  करायची स्वप्नं  बघत राहतात.
त्यादिवशी बौद्धवस्तीतली पोर आणि मातंग वस्तीतली पोर यांची मॅच  लावली होती दोन्ही तिथले स्थानिक म्हणून पूर्ण जीव लावून खेळत होती.
आणि अचानक भांडण सुरु झाले सगळे मारायला लागले एकमेकांना बॅट फेकून मारामारी सुरु झाली.  बौद्धवस्तीलया पोरांनी अजून पोर बोलावली आणि आणि मातंग वस्तीतल्या पोरांनी पण तेच केले.
मी, राहुल, आणि चंद्या  असे   तिघेजन  भांडण बघत होतो. शक्तिमान सुरु व्हायला वेळ होता, म्हणून आम्ही तिघेजण भिलो होतो तरीपण भांडण बघत होतो तेवढ्यात कोणतरी म्हणल  
ह्या मांगांना लै मस्ती आलीय
मग तिकडून पण रिप्लाय आला
आणि महारांनी  काय उपटला  बौद्ध होऊन ?
आता मी चंद्या आणि राहुल नेमका त्याच जातीतल होतो तिघांना पण पहिल्यांदाच असं कायतरी ऐकायला भेटलं होत. आमची चलबिचल सुरु झाली  इतकावेळ एकत्र राहून आम्ही मज्जा घेत होतो ती मज्जा जाऊन आम्ही त्या भांडणातील भांडणाऱ्याची बाजू घ्यायला लागलो, म्हणजे एकदम कट्टर होऊन नव्हतो भांडत पण सुरु झाला आमचा छोटासा वाद
इकडे बारा वाजायला दहा मिनिट बाकी असतील आणि आमच्यात त्या भांडणात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यावर वाद सुरु होता.
तेवढ्यात राहुल म्हटलं आर  जाऊदे लगा त्यांची भांडण  त्यांचा भांडण दुसऱ्या कारणावरून सुरु आहे
आपण एक काम करू  आत्ता घरी जाऊ शक्तिमान बघू  नंतर बघू काय करायचे
मला आणि चंद्याला  पटलं
मग मी अजून डोकं चालवलं आणि म्हणलं
आज जानाई मळाइ हॉल  ला लग्न आहे  ( आमच्या कॉलोनीच्या जवळ जनाई मळाइ मंगल कार्यालय होते तिकडे आम्ही जेवायला जायचो न बोलवतात कितीतरी लग्नात असच जेवून यायचो आणि कधी कधी खिश्यात लाडू  घेऊन यायचो)  
आपण शक्तिमान बघू हॉलवर जेवून येऊ मग बघू  काय करायचे ते
चंद्या  म्हणाला  कॅनल ला पाणी आलय परवाच जाऊ तिकडे मग
 तर असा आमचा प्लॅन झाला
आम्ही शक्तीमन बघितलं हॉल जाऊन जेवलो चांगले खिश्यात दोन दोन बुंदीचे लाडू आणले आणि कॅनल ला पोहायला गेलो  तिकडून   तसच पुढे जाऊन चिंचाला गेलो.
अश्याप्रकारे इतक्या लहान वयात आम्ही जातप्रश्न आणि त्याच्यावरून होणाऱ्या भांडणाला  कल्टी मारून तो दिवस घालवला एकदम मस्त.  रात्री चिंचा खायला बसल्यावर आम्ही एकमेकांना म्हणालो बरं झाली सकाळी भांडण नाही केली. भांडण करणारी शेवटी गाववाले होते आपण शेवटी भाडेकरी इथले.

टीप : ह्या गोष्टीतला शब्द न शब्द खरा आहे, आजकाल जात जास्तच अधोरिखेंत व्हायला लागली म्हणून हि गोष्ट लिहली.