लहानपासून आमच्या घरी मटण मासे मुबलक असायचे माझे वडील हे रसिक मांसाहारी होते म्हणून आमच्या घरात सुकत बोंबील, चुणक्या ( वाळवलेले मटण) कायम असायचे. आठवड्यातून कधीतरी मी आणि माझे वडील ज्यांना मी "आप्पा" बोलायचो ते कधीतरी शाकाहारी जेवण करायचो. त्यावेळेस आमच्या घरी ४०७ टेम्पो होता. अप्पा तो टेम्पो पोवई नाका किंवा मोळाचा ओढा इकडे लावायचे त्यामुळे सगळी ड्राइवर गॅंग त्यांची दोस्त होती. त्यांचे वडारी दोस्त खास होते ते कायम आमच्या घरी यायचे मटण घेऊन आता मला आठवत नाही ते डुकराचे असायचे का बकऱ्याचे पण मी मात्र खायचो . माझा मोठा भाऊ ,आई आणि छोटा भाऊ अजिबात खायचे नाही नॉनव्हेज पण मी आणि अप्पा रोज खायचो.
१९९५ साली आप्पा वारले आणि ९६-९७ ला आमच्या घरातून त्रासामुळे आम्ही बाहेर पडलो किंवा आम्हाला चुलत्यांनी घराबाहेर काढले. मग माझी आई धुनीभांडी , हॉटेल मधे काम करायला लागली. भाड्याचे घर एक्दम कमी पगार म्हणून माझा नॉनव्हेज बंद झाले. कधीतरी आम्ही अंडी खायचो बस. हळू हळू माझे नोंव्हेज प्रेम कमी होते गेले. नाही म्हणायला अधून मधून माझी आई जिला मी अक्का बोलतो ती हॉटेल मधून राहिलेले वडा-भजी पुऱ्या आणायची कधीतरी( त्याकाळात रोज रोज वडा पुऱ्या भाजी खाणे हे मला श्रीमंतीचे प्रतीक वाटत असायचे कारण माझे बाकीचे मित्रांना ते खूप आवडायचे पण त्यांना रोज मिळत नव्हते ). आणि कधी मधी नॉनव्हेज ते फक्त मी खायचो बाकी कुणी खायला नव्हते.
पुढे नवोदयला गेल्यानंतर महिन्यातून एकदा चिकन मिळायचो तेच खाऊन आम्ही मस्त राहायचो तिकडे सात वर्ष होतो मज्जा यायची चिकन खायला त्यावेळेस चा छोटा किस्सा आहे माझा दुसऱ्या मित्र महेश (जो आता लेफ्टनंट आहे) तो आणि मी एकाच मुलीवर लाईन मारायचो ती पण खात नव्हती नॉनव्हेज आणि हा माही पण नाही खायचा शाळेत, आणि शाळेत अशी सिस्टिम होती कि सिनियर मुले आणि मुली जे व्हेज खातात त्यांना आणि जुनियर लोकांना एकतर जावे लागायचे लंच साठी मग माही त्यांच्यबर जायचा जेवायला मग मला उगाच भीती वाटायची ह्याला पटेल कि काय ती पोरगी म्हणून अकरावीत असताना मी एका रविवारी चिकन खाल्ले नाही व्हेज खाऊन आलो तर वर्गातील सगळे पोरे अशी बघायला लागली जणू मी कायतरी मोठा मॅटर केलाय मनात ठरवलं पोरगी पेक्षा चिकन आणि मित्र महत्वाचे मी परत चिकन पाहायला सुरु झालो. (ती सुंदर गोड मुलगी मला पण नाही पटली आणि माहीला पन)
पुढे मी पुण्यात आलो मग इकडे नॉनव्हेज म्हणजे फक्त "अंडे" हे मनावर बिबवून घेतले. कारण डब्यात फक्त तेच मिळायचे आणि हॉटेल मधे जाऊन खाण्याची इच्छा नव्हती. आणि कोण जात असेल तर उगाच सांगायचे हॉटेल मधे डुकराचे गायीचे मटन घालतात म्हणजे दुसरा पण नाही जाणार. हां पण एकदा टोया आणि त्याच्या गँगने "ओडिसी" (आऊट डोर केटरिंग) ला जाऊन राहिलेले सगळे नॉनव्हेज आणले आणि आम्ही खूप खूप खाल्ले. लक्षात राहणेजोगे खाल्लेले हेच ते नॉन व्हेज.
खरी स्टोरी आता आहे
मी पोस्ट ग्रॅज्युशन साठी हैद्राबादच्या टाटा इन्स्टिटयूट ला गेलो आणि तिकडे इतका फ्रीडम आणि सुविधा होता कि मजा यायला लागली. तिकडे गेल्यावर देशभरातील नवोदयची पोरे पण भेटली "नवोदय" या फॅक्टर वर दोस्ती लगेच झाली. तेलंगणा मधल्या नालगोंडा नवोदयचा अनिल , आसाम च्या दुलन राजस्थानचा मीना गुजरातचा जितेंद्र अशी बरीच मंडळी होती. हैदराबाद ला आठवड्यातून दोनदा नॉनव्हेज मिळायचे तिकडे राईस खायला पण मज्जा यायची. आम्ही सगळे एका टेबल वर बसून खूप खूप वडायचो चिकन कधी कधी कधी कधी त्याच्यावर बीफ पॉवडर टाकायचो भारी लागायची आणि कधी माश्याचे लोणचे. हैद्राबादला गेल्यावर मी खुललो होतो. पहिले वर्ष गेले दुसऱ्या वर्षात असताना बीफ बॅन चा विषय आला आणि आमच्या कॅम्पस मधे रोज चर्चा झडू लागल्या आधी आम्ही सगळी पोरे जागा भेटेल तिकडे बसून जेवायायची आता काही मनातून कट्टर असणारे,मनातून ब्राह्मण्यवाद" मानणारे पोरे वेगळी बीफ पावडर खाणाऱ्यांपासून बसायला लागली त्यावेळेस माझ्या आणि बाकीच्या पोरांच्या लक्षात नाही आले. मजेची गोष्ट अशी कि एक दोन उच्चवर्णीय मुली होत्या ज्या सगळं मटन खायचा बीफ, बफ,ससा, पोर्क इत्यादी त्यांना मात्र "लिबरल" जातीभेद न मानणारे असली विशेषण लावून मोकळी झाली. बाकी जी राहिलेली ग्यांग होती ती आपली तशीच राहिली. असो
आमच्या मटन खाणे ना थांबले ना बीफ पावडर ना माश्याचे लोणचे. आमच्या ग्रुप मधे जो जितेंद्र होता तो बिचारा व्हेज खायचा पण कायम आमच्यात बसायचा आय मिन मित्रच होता तो त्यामुळे आमच्यातच बसणारे ( एखाद्याच्या खाण्यावरून दोस्ती ठरवणारे माणूस म्हणायच्या लायकीचे नसतात).
एक दिवशी सहज त्याला विचारले
जितेन तू व्हेजिटेरियन बचपण से है या बाद मे बना ?
त्याने उत्तर दिले
भाई बचपण से हू लेकिन मैने कूच देखा जिसे देखकर मेरा और मन नही होता.
मी म्हणालो
हां चल ठीक है !
रात्री त्याने मला फेसबुकवर एक विडिओ पाठवला ज्यात कोंबडी, गाय , पोर्क यांना कसे मारले जाते हे दाखवले होते आणि शेवटी मॅसेज होता " बी व्हेजिटेरियन"
त्या रात्री तो विडिओ पाहून मला झोपच नाही आली रात्रभर त्या कोंबड्या आणि डुकरे माझ्या कानात ओरडत आहेत असा वाटत होते ( माणसाने का जास्त इमोशनल असू नये हे मला नंतर समजले)
सकाळी कॉलेजला गेली दोन दिवस मला सतत बैचेन होत होते शेवटी फॉर्म मधे येऊन मी फेसबुक वर घोषणा केली कि "मी आज पासून शाकाहारी बनत आहेत" माझे ग्रुप मधले शॉक झाले. फेसबुक पोस्ट वर वेगवेगळ्या कमेंट यायला सुरुवात झाली "अभिनंदन ,खरा अहिंसावादी" असलं बराच काय काय
मला पण मी कायतरी हिरो काम केलय अस वाटायला लागल.
तरी ग्रुप ला वाटत होत कि हा कायतरी स्टंट आहे म्हणून ते पण निवांत होते पण चिकन च्या दिवशी मात्र मी खरंच नाही घेतले व्हेज घेतले आणि बसलो त्यादिवशी जे जे लोक चिकन खात होते ते मला क्रुएल वाटत होते. मनातून वाटत होते ह्यांना प्राणिमात्रांबद्दल काही कणव आहे का नाही.
झाले दोन आठवडे गेले असेच मला मात्र वेगळ्या जगात असल्या सारखे वाटायला लागले.
मग एक दिवशी ग्रुप मधल्या दुलन ने मला असच विचारले
क्या हुवा मिलिंद क्यो खा नही रहा हैं ? मी त्याला त्या विडिओ बद्दल सांगितले, त्याने तो विडिओ पहिला थोडा आणि सोडून दिला.
संध्याकाळी खेळून झाल्यानंतर त्याने मला बोलावले आणि विचारले
प्लांट्स मे लाईफ होती हैं क्या ?
मी बोललो हां होती हैं !
तो बस जानवर चिख पाते है और प्लांट्स नही ! प्लांट्स को भी जान हैं बेचारे बोल नही पाते या हम उनकी आवाज सून नही पाते.
परत मी हँग झालो शुक्रवारी त्याने मला सांगितले हे सगळं परत रात्री मला प्लांट्स तोडताना जो आवाज येत नाही तो आवाज मला ऐकू येऊ लागला मी झोपूच शकलो नाही. शनिवारी सकाळी मेस मधून नाश्ता करायला गेलो "लेमन राईस" होता नाष्ट्याला मला ते बघून भात तोडणी आठवली आणि माझी खायची इच्छाच मेली तसाच बाहेर मेस मधून दिवसभर एक कण नाहीं खाल्ला मी फक्त पाणी पिले. शनिवार गेला रविवार गेला दोन दिवस बिना अन्नाचा होतो मी. मग आमच्या ग्रुप मधे समजला मी ग्रुप मधल्या अनिल ला सगळी स्टोरी सांगितली त्याने ऐकली आणि म्हणला
“आर यु फूल? “
मग तिकडून त्याने मला "अलसभा" हॉटेल ला नेले आणि चिकन बिर्याणी ऑर्डर केली आणि मला फूड चैन समजावली आणि बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या. ज्या माझ्या तर्कबुद्धीला पटल्या सुद्धा. मग मी ठरवलं खाण्यापिण्यात फालतू गोष्टी मधे आणायच्या नाहीत.
आणि ती हैद्राबादी बिर्याणी आम्ही खाल्ली ! त्यानंतर दोनवर्ष आठवड्यातून दोन ते तिनदा आम्ही जायचो कधी बावर्ची कधी पॅराडाईज कधी शोऊगोस जायचो बिर्याणी ,खिमापाव , पाया, कबाब अजून बरेच आहेत असा खाल्ला.
अश्याप्रकारे परत मी अन्न खाणारा माणूस झालो !
Interesting story..
ReplyDeleteNice.