Thursday, 11 October 2018

सीमा कि सिमा ?

मी साताराजवळच्या कोडोली गावात राहायचो आय मिन अजून सुद्धा राहतो  त्यावेळेस मी चौथी का पाचवीत होतो  चौथीचं पूर्ण वर्ष  स्कॉलरशिप च्या अभ्यासात गेलं होत एकदा ती  परीक्षा झाली. त्यानंतर आम्ही पाचवीला जाणार होतो त्यावेळेस परत वर्ग फुटणार आहे पाचवीला  बाकीच्या तुकड्यातील मुले मुली मिळून परत तुकड्या पडणार होत्या आमच्या वर्गातील काही हुशार मुले ( म्हणजे अभ्यासात हुशार) सयाजीराव, भारत विद्या मंदिर अण्णासाहेब  कल्याणी ला जाणार होते  आम्ही मात्र जिल्हा परिषद शाळेतच शिकणार होतो ( बेस्ट शाळा असतात त्या गरीब श्रीमंत सगळ्या जातिधर्मची पोर पोरी एकत्र शिकत असतात मज्जा येते) असो तर स्टोरी अशी आहे कि
आमच्या वर्गात सिमा म्हणून एक मुलगी होती  ती उत्तर प्रदेश वरून आली होती एकदम स्मार्ट मुलगी दिसायला सुद्धा चांगली ती आमच्याच कॉलनीत राहायची  मला त्यावेळेस ती हाय क्लास वाटायची म्हणून मी जास्त बोलत नसायचो.  सीमा कडे वर्गाची चावी असायची आणि वर्गात मॅडम साठी घरून पाणी आणायची रिस्पॉन्सिबिलिटी होती. एकंदर मुलगी चांगली होती. आमच्या वर्गात सीमादेवी नावाची अजून एक मुलगी होती तीच आणि माझं जमायचं ( जमायचं म्हणजे मैत्री होती चांगली ती धनगरवाडीत राहायची त्यामुळे येताना चिंचा आणायची माझ्यासाठी) सीमादेवी सुद्धा उत्तर प्रदेश ची होती .
आमच्या वर्गाच्या शेजारीच ब तुकडी होती त्यात एक नापास होऊन आलेला सागर नावाचा पोरगा होता तो मोठा असल्या करणारे शरीराने हट्टाकट्टा होता साहजिकच पोरांनी त्याला डॉन करून टाकला अभ्यासात एकदम ढ गोळा पण बाकीच्या वेळेस हिरो)
त्यावेळेस त्याला सीमा आवडायला लागली  तिच्या वर लाईन मारायला लागला तो मग  साडेबाराच्या सुट्टीत ड तुकडी जवळ येऊन थांबणे सीमा दिसली कि खुश होऊन त्याच्या आजूबाजूला पोर त्याला  खुश करायची . हे  बरेच दिवस सुरूच होत शिक्षक लोकांनी याकडे सुरक्षा केलेले.  सीमाला समजले होते हा मागे लागला आहे पण  सीमाच्या मनात तसलं काहीच नव्हतं त्यामुळे ती रिलॅक्स होत.  असो बॅक टू स्टोरी
वार्षिक परीक्षा झाली  आम्हाला   उन्हाळयाच्या   सुट्ट्या  लागल्या आणि  कष्टकरी वर्गातील पोर सुट्टी लागली तर गावाला जात नाहीत. मी पण कुठे गेलो नव्हतो.
सीमा पण होती त्यावेळेस सगळ्या मॅडम लोकं मुलांचे पेपर चेक करत असायच्या काहींचा रिजल्ट चांगला लागावा म्हणून काही ढ गोळ्या पोरांना पास करायला लागायचे मग मॅडम लोक आमच्यासारख्या मुलांना बोलवून त्याच्या उत्तर पत्रिकेत थोडं लिहायला लावायच्या. मग मला सीमा श्रद्धा, विक्रम अश्या थोड्या हुशार लोकांना बोलवायाचे. त्यावेळेस सुद्धा बोलावले आम्हाला ते काम करायला खूप अभिमान वाटायचा आणि आपण कोणतरी भारी आहोत हा फील यायचा तो वेगळा असो ते काम झालं कि आम्ही घरी येताना सीमा आणि सोबत असायचो. त्यावेळेस आमचा बोलणं व्हायाला लागला मग समजले ती काही जास्त हाय फाय नाही आणि आपण पण काय लो क्लास नाही. त्यावेळेस आमची ट्युनिंग जमलं. तिची आई गावाला होती घरातले सगळं तीच करायची. त्यावेळेस एकदा सीमा म्हणाली कि तो सागर आणि मी एका वर्गात नको यायला. सागर माझ्या मागे लागला आहे. आपण दोघे एक वर्गात  आलो पाहिजे असं पण म्हणाली
पण  पाचवीला गेल्यावर  मी गेलो गुरव मॅडमच्या वर्गात आणि  ती गेली पिसाळ मॅडमच्या वर्गात.  सागर ज्याला आता सगळी सागऱ्या म्हणायला लागली होती तो पण तिच्याच वर्गात गेला. तिला जाचक त्रास सुरु झाला. रोज तिला चिट्टी देणे सुरु झाले
सीमा  पण चिट्ट्या घेत होत बरीच लोकांना वाटलं कि सिमा  पटली त्याला म्हणून. पण प्रत्यक्षात  वेगळच होत ती चिट्ठी घेतली कि उघडून बघायची त्यात एक    बदाम आणि बाणाचे चित्र काढलेले असायचे  त्यात एका साईडला ला सागर आणि दुसऱ्या साईड सीमा लिहलेले असायचे. सीमा त्यातले  स्वतःचे नाव खोडायची
आणि देऊन टाकायची चिट्ठी कुणाला पण. त्याचे असले प्रकार बरेच दिवस चालू होते. मी नवोदयच्या अभ्यासात गुंतलो असल्यामूळे तिकडे लक्ष देत नव्हतो.
झालं असाच दिवस गेले मी पाचवी झाल्यावर ती शाळा सोडून नवोदयला शिकायला गेलो  व हे सगळं विसरून पण गेलो.
एक वर्षी मला सीमा साताऱ्यात भेटली खूप  दिवसांनीं भेटल्यामुळे खूप आनंद झाला होता. तेंव्हा ती सांगत होती कि आता ती युपी ला परत जाणार आहे वैगरे.
नंतर मी मस्तीमध्ये विचारले ते सागर चे काय झाला पुढं ?
ती हसायला लागली  आणि म्हणाली  आम्ही जानाई मलाई हॉल  जवळ राहायला गेल्यावर तो आला होता एकदा घरी  रीमाला  सांगितले आणि मला बाहेर  बोलावले,  मी  जाणारच  नव्हते  पण घरात पप्पा होते म्हणून मी बाहेर गेले आणि विचारले काय आहे तर  त्याने  परत एक  चिठ्ठी दिली मी तिकडेच उघडून बघितले तर तेच होते एक बदाम  एक क्रोस  बाण आणि ह्या साईड ला सागर आणि त्या साईड ला सीमा . मी चिठ्ठी वाचली आणि आणि म्हणले  चौथी पासून माझ्या मागे आहेस  तरी  अजून  माझं नाव लिहायला येत नाही सीमा ला वेलांटी आहे का दुसरी ते पण नाही माहित ? आणि कसला प्रेम करणार तू.
एवढं सांगून ती हसायला लागली मी पण  थोडा हसलो आणि बाय बोलून गेलो (   त्यावेळेस व्हाटसप नव्हते नाहीतर तिचा व्हाटसप नंबर घेतला असता)
तर हा किस्सा  लिहायचे कारण कि मला फेसबुक वरून समजले कि सीमा आता "शिक्षक" झालीय. 

No comments:

Post a Comment