दुपारची जेवायची सुट्टी झाली होती सुरज जेवण झाल होत आणि होत तो बसला होता तेवढ्यात कंपनीत युनिफॉर्म घातलेले स्टुडंट्स आले ते पाहताच सगळे कामगार जेवण आटोपत घेत आपापल्या कामाला लागले. ते स्टुडंट्स इंजिनीरिंग चे होते साताराच्याच केबीपी कॉलेज मधून आले होते इंडस्ट्री व्हिजिट साठी आले होते. जवळ जवळ २२-२५ पोर होत आणि फक्त चारच पोरी होत्या. सुरज च्या मॅनेजर ने त्याला कंपनी दाखवण्याची सूचना केली. सुरज त्यांना कंपनी दाखवत होता. त्यातली एक पोरगी खूपच प्रश्न विचारात होती आणि बडबडा करत होती.
सुरज पण मेकँनिक इंजिनियर असल्यामुळे पोरींबर बोलणे कमीच होते. हि पोरगी जास्तच विचारायला लागली. जाताना सुरज ने सगळयांना त्याचा नंबर दिला म्हणजे स्वतःहून नाही दिला त्यांनीच घेतला.
झालं हा किस्सा झाला आणि सुरज रोजच्या कामात बीजी झाला सकाळी ८ ते ४ ची ड्युटी करायचा संध्याकळी जिम आणि थोडा वेळ टाईमपास मग घर आणि जेवण !
सुरजने इंजिनीरिंग केल्यावर पुण्यात न जाता साताऱ्यातच जॉब करायचे ठरवले आता साताऱ्यात पगार कमीच सुरज ला १२ हजार पगार होता तेवढ्यात त्याचा भागात होत म्हणून तो खुश होता, कधी एखाद कोण पुण्यातून आलं आणि त्याचा २० हजार ते २५ हजार पगार आकडा ऐकला कि त्याला पण पुण्यात जायची विष व्हायची आणि तिकडे होणारे जेवणाचे हाल लक्षात येऊन ऑटोमॅटिक ती विश मारून जायची.
असाच एक दिवशी जिम झाल्यावर तो पोरांच्यात बसला आणि नेहमी प्रमाणे मोबाईल बघितला तर त्याला चार मिसकॉल दिसले, त्यानं रिटर्न कॉल करायच्या आधी ट्रू कॉलर वर बघितलं तर " स्विटी श्रद्धा " दिसले,
ते बघून एक मित्र म्हणाला तुला झवन्या कोणतरी उल्लू बनवत असेल तुला कोण कुठली पोरगी फोन करेल ?
सुरज त्याला म्हणाला तू गप "आयघाल्या" चार मिसकॉल आल्यात म्हणजे महत्वाचे काम असेल. त्याने परत कॉल केला आणि विचारलं हॅलो कोण बोलतय ?
तर समोरून आवाज आला हॅलो सुरज सर मी श्रद्धा बोलतेय केबीपी कॉलेज मधून त्यादिवशी तुमच्या कंपनीत आलो होतो ना
सुरज म्हणाला हा हा बोला श्रद्धा जी !
तर ती पोरगी म्हणाली मला प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी मदत हवीय तुमची ! आता आख्या आयुष्यात सुरज ला कुणी अभ्यासात मदतीसाठी विचारले नव्हते आणि आता डायरेक्त्त इंजिनीरिंग च्या प्रोजेक्ट साठी हेल्प आणि तीपण पोरीला सुरज लगेच म्हणाला हो करतो कि त्यात काय ! उद्या करतो कॉल तुम्हाला !
सकाळी ८ ला सुरज कंपनीत पोचला आणि आणि तिच्या फोनची वाट बघू लागला दिवसभर काही कॉल आला नाही मग सुरज पण शांत होऊन आपले मशीनवर वर लक्ष देऊन काम करू लागला, संध्याकाळी काम सुटताना त्याला परत तिचा फोन आला आणि त्याला म्हणाली कि आज भेटायला जमेल का
सुरज हो म्हणाला आणि विचारले कुठे भेटूया ? तर ती म्हणाली अण्णासाहेब कल्याणी पाशी ये , मग सुरज तिकडे गेला, तिला भेटेपर्यंत त्याला चेहरा लक्षात येत नव्हता नक्की कोण श्रद्धा. कल्याणी जवळच्या झाडाखाली ते दोघे उभं राहिले आणि उभ्या उभ्या प्रोजेक्ट चे बोलणे सुरु केले. श्रद्धा इतकी बडाबडा करत होती कि सुरज ला फक्त ऐकूनच घ्यावे लागत होते. ती सलग बोलत होती नुसती वन साईड बडबड लावली होती आणि सुरज ला ते सगळं "जब वि मेट" मधल्या शाहिद आणि करीना कपूर गत वाटत होते.
सुरज ला जिम जाण्यासाठी मित्राचा फोन यायला सुरुवात झाली होती, सुरजने फोन सायलेंट केला आणि मस्त तिचं बोलणं ऐकत राहिला. बोलणं झालं कि सुरज म्हणाला जातो मी आता ! आणि गाडीजवळ आणि गाडी स्टार्ट केली आणि बघितले कि ती चालत आहे, ते बघून त्याला हिम्मत होईना कि तिला विचारावे कि नको या सोडतो म्हणून ! शेवटी हिम्मत करून म्हणाला श्रद्धा घर सोडू का तुम्हाला
तर ती म्हणाली नको जवळच आहे जाईन मी चालत ! मग सुरज ने परत एकदा विनंती केली म्हणाला सोडतोकी
तर ती म्हणाली अच्छा चालेल चल आणि मला आता अहोजाओ बोलायचे सोडून दे नाहीतर मी पण "सर" म्हणणार तुम्हाला आणि ती गाडी वर बसली.
मग सुरज ने तिला साईबाबा मंदिर जवळ सोडले आणि तो गेला सुरज त्याची डिक्सवर चालवत होता पण डोक्यात श्रद्धाच होती. घरी गेला निवांत जेवला पण डोळ्यासमोर फक्त तीच दिसत होती तिचीच बडबड !
आणि इकडे श्रद्धा ची अवस्था पण तीच होती, आज पर्यंत तिला खूप जणांनी प्रोपोज केले होते पण तिला सुरज सारखा भारीवाला फील तो कम्फर्ट नव्हता भेटला म्हणून ती कुणाला हो म्हटली नव्हती.
तेंव्हा सुरज कडे २०० एम बी डेटा असायचा आणि तो तो डेटा आठवडा भर वापरात होता ! ऑफिसला गेला कि व्हाटसप वरचे सगळे फोटो आणि विडिओ डाउनलोड. पण आता तो २०० एम बी डेटा श्रद्धा साठी जायला लागला ! महिना "२०० रुपये १ जिबी डेटा" फक्त आता श्रद्धाचे डिपी लपून छापून सेव करायचा !
रात्री दोन दोन पर्यंत व्हाटसप वर चॅटिंग (सेक्सचॅट रोमँटिक चॅट नव्हता) एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळी काही अपेक्षा न ठेवता ऍफिनिटी वाटते ती कंडिशन होती दोघांची. दोघांनी एकमेकांना प्रोपोज नव्हते केले. असंच सुरु होते तिचा कॉलेज आणि त्याचा ऑफिस रोज वेळ मिळेल तेंव्हा कॉल्स आणि बोलायला वेळ नाही भेटला व्हाटसप ला मेसेज. असं एकदम भारीवाला सुरु होता.
आमच्या सातारला दांडिया जोरात असतात सैनिक स्कुल च्या ग्राउंड वर भरतात आख्या साताऱ्यातल्या पोरी एकदम नटून मेकअप करून तिकडे येतात
(सातारचे स्त्री सौन्दर्य बघायचे असेल तर सैनिक स्कुल च्या दांडिया आणि दिवाळीची पाहत कुरणेश्वर ला.) आणि पोर सगळी लाईन मारायला जातात तिथल्या भाषेत सीजन मारायला. श्रद्धा पण कॉलेज मधल्या मुलीसोबत जायची. सुरज त्याच्या कॉलनी मधल्या मंडळाचा उत्साही कार्यकर्ता होता त्यामुळे तो नव्हता जात. एक दिवशी रात्री ११ ला श्रद्धा ने सुरज ला कॉल केला कि दांडिया खेळायला ये सैनिक स्कुल च्या ग्राउंड जवळ मी थांबले आहे. सुरज म्हणाला कि तू स्टार्ट कर मी आलोच त्याला इकडे कामे लागली. श्रद्धा ने शेवटचा कॉल केला येतोय का नाही का मी जाऊ घरी संपत आलाय दांडिया, सुरज म्हणाल दहा मिनिटात पोचतो. आणि लगेच पोचला तर दांडिया संपला होता श्रद्धा च्या मैत्रिणी गेल्या होता ती तिकडेच उभी होती सुरजची वाट बघत , सुरज आला आणि हॉर्न वाजवला तर ती म्हणाली नालायक आताशी आला का ? आता झाला दांडिया उद्या परत ये लौकर खेळू एकत्र. सुरज म्हणाला चालेल हातात घरी कशी जाणार तर ती म्हणाली भैय्याला कॉल करते आणि सांगते तर सुरज म्हणाला कि मी सोडू का ? चाल सोडतो. रात्रीचे साडेबारा वाजून गेले. ती अशी कधी एकटी इतक्या लेट कुणाच्या गाडीवर बसली नव्हती आणि सुरजने पण असं कुणाला रात्री घरी सोडला नव्हता. सुरज सोबत तीला सेफ वाटायचे म्हणून ती लगेच बसली आणि सुरज ने गाडी ला किक मारली ! थोडंच पुढे गेला असेल तेवढ्यात पाऊस सुरु झाला ते दोघे नीट कल्याणी पाशी पण पोचले नव्हते. जोरात पाऊस सुरु झाला सूरज ने गाडी तिकडे वडाचं झाड आहे तिकडे थांबवली दोघे थांबले पाऊस पडत होता १०-१५ मिनिटे रपारप पडला पाऊस दोघे एकदम शांत उभे होते.
थोडा पाऊस कमी झाला श्रद्धा ला थंडी वाजत होती. ती थोडी भिजली पण होती. सुरज ने तिला तिचे जाकेट दिले. आणि श्रद्धाला म्हणाला श्रद्धा "आय लव्ह यु" मला प्रेम झालंय तुझ्या वर ! श्रद्धाला दोन मिनिट साठी काय होतेय काहीच समजला नाही ! सुरज ने तेवढं बोलून शांत उभा राहिला !
श्रद्धा म्हणाली चाल उशीर झालाय घरी वाट बघत असतील ! सुरज ने लगेच गाडी स्टार्ट केली ! श्रद्धा मागे बसली आजपर्यंत तिने कधीच सूरज च्या खांदयावर हात ठेवला नव्हता आज ठेवला ! सुरज ला करंट लागल्यात झाले ! श्रद्धा शाहू नगर मध्ये राहायची सुरज तिला घरापर्यन्त सोडवायला गेला ! थोडासा अलीकडे त्याला गाडी थांबवायला सांगितली आणि तिने त्याचे जॅकेट काढून दिले ! आणि सुरज ला आय लव्ह यु टू म्हणाली डोळे झाकले आणि सरळ हग केले. सुरज ला पण काही समजल नाही त्याने प्रतिसाद देत हग गेले ! आणि सरळ किस केले ! आणि सोडून दिले ! श्रद्धा चालत घरी गेली ती घरी पोचलेली दिसली कि त्याने गाडी ला किक मारली आणि घरी आला ! त्याने आणि तिने फर्स्ट टाइम किस केल होता कुणाला तरी दोघांच्या डोक्यातून ते क्षण जात नव्हते पहाटे ४ पर्यंत चॅटिंग करत होते शेवटी झोपले.
त्याच्यानंतर इज युजवल त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली सुरज ला मंगळवारी सुट्टी असायची मग त्या दिवशी कॉलेज बुडवून ते कास ला फिरायला जायचे,कधी सज्जनगडला ! श्रद्धा सातारा सिटीत आहे तोपर्यँत सुरज ला गाडीवर असली कि टच करत नव्हती एकदा बोगदा क्रॉस झाला कि त्याच्या गळ्यात हात टाकायची ! गाणी म्हणायची चेहऱ्याची ओढणी काढून टाकायची !
असं त्यांचं मस्त रिलेशन सुरु होते २ वर्ष झाली ! सुरज एकदमच भारी होता कधी तिच्यावर संशय घेत नव्हता आणि आणि ती पण सुरज चा स्पेस दुसऱ्या कुणाला घेऊन देत नव्हती ! प्रॉपर वेळ दयायचे एकमेकांना !
एकेदिवशी रात्री चॅटिंग करता करता सुरज म्हणाला तुला कोपर्डीची घटना समजली का तर श्रद्धा म्हणाली कि हो मूर्ख आहेत लोक अक्कल नाही त्यांना फाशी दिली पाहिजे. त्यानंतर आपल्या राज्यात मराठा मोर्चा सुरु झाले ! त्यात काही काही मागण्या होत्या !
त्याच्या आसपास रिलायन्स जिओ लाँच झाले १ जीबी डेटा २०० ला मिळायचा तो फ्री झाला ! मग सुरु व्हाटसप आणि फेसबुकवरून मराठा विरुद्ध दलित असे मेसेज , ऍट्रॉसिटी बंद करा अशी एका गटाची मागणी होती राज्य सरकार टेन्शन मध्ये होते राज्यात जवळ जवळ सगळेच अस्वस्थ होते. कधी पण कुठे पण दंगल होईल असे वाटायचे, गावागावाचे व्हाटसप ग्रुप द्वेष पसरवण्याचे अड्डे झाले, दलित ग्रुप वर मराठा द्वेष आणि मराठा ग्रुप वर दलित द्वेष , मुस्लिम द्वेष असे प्रकार सुरु झाले.
आणि अश्या वातावरणात श्रद्धा सुरज चे प्रेम फुलत होते. सुरज ने सातारचा मराठा मोर्चा अटेंड केला. सूरजला जात समज कमी होती त्यावेळी पहिल्यांदा मराठा समाज एकत्र झाला होता त्यामुळे जवळ जवळ सगळे मराठा युवक उत्साहात होते. रात्री श्रद्धाला सांगताना त्याने दलित समाजाला नकळत कायतरी बोलून गेला. श्रद्धाला राग आला ! सुरज पण सॉरी म्हणायच्या मुड मध्ये नव्हता मग श्रद्धाने पण कायतरी पाठवला !
दोघांचं प्रेम होते पण काल दोघांना पहिल्यांदा जात समजल्यागत झाले. त्यानंतर जोपर्यंत मराठा मोर्चा सुरु होता तोपर्यँत त्यांचे मेसेज पाठवणे सुरु होतेच. पण प्रेम कमी नव्हते झाले. दोघे एकमेकांना म्हणायचे "तुमचा समाज असला तसला पण तू नाही तसा" असच त्यांचं प्रेम सुरु होते. सुरजचे मित्र म्हणायचे आरे तिला झोपव लवकर आणि दे सोडून तर सुरज म्हणाला तसलं नाही करणार माझा खरे प्रेम आहे. पण शेवटी वाद इतका वाढत गेला कि ब्रेकअप झाले. मग श्रद्धा पुण्याला निघून आली सुरज तिकडेच थांबला ! जवळ जवळ एक वर्ष एकमेकांसोबत बोलली नाहीत.
ह्या वर्षी श्रद्धा सातारला आली होती फेब्रुवारी मध्ये स्कुटीवरून घरी येत असताना वायसी जवळ तिला सुरज दिसला तिने गाडी थांबवली त्याने पण थांबवली दोघे परत डिजे कॉलेज जवळ गेले. दोघे परत दहा पंधरा मिनिटे न बोलता क्षणात उभे होते. श्रद्धा म्हणाली मी गेल्यावर तू पटवली असशील ना दुसरी ? आणि सुरज पण तेच म्हणाला तुला भेटलं असेल पुण्याला कोणतरी !
तर सुरज म्हणाला ह्याच एरियात तुला प्रोपोज केले होते आणि आज परत प्रोपोज करतोय "आय लव्ह यु" लग्न करशील का ?
श्रद्धा ने शून्य मिनिटात हो म्हणत त्याला एक फाईट मारली म्हणाली एवढा कसला अटीट्युड कि वर्षभर कॉल नाही केलास स्वतःहून माकडा ? सुरज म्हणाला तू तरी कुठे केलास ? परत दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली !
रात्री मला फोन आला मॅडी भावा पुण्याला येतोय व्हॅलेंनटाईन डे ला श्रद्धाला घेऊन येतोय ,आळंदीला लग्न करायच आहे आपल्याला तू एक पाहिजे तिकडे आपल्याला. मी म्हटलं चालतंय कि भावा ! करू कि ! ते दोघे जण आले त्यादिवशी पण मला ऑफिस च्या कामानिमित्त दिल्लीत जावे लागले त्यादिवशी त्यामुळे मी काही साक्षीदार होऊ शकलो नाही आळंदीत.
मनापासून प्रेम असेल तर जात, धर्म ह्या असल्या भुरट्या गोष्टी मॅटर नाही करत
No comments:
Post a Comment