Tuesday, 8 August 2017

लहानपणीची गोष्ट



मी दुसरी का तिसरीत होतो त्यावेळेस  साताराजवळच्या कोडोली गावात राहायचो म्हणजे अजून सुद्धा तिकडेच राहतो.  आम्ही कॉलोनी  मध्ये राहायचो हि कॉलोनी बनलेली  बाहेर गावावरून कामासाठी आलेल्या माणसांनी.  पार बेळगाव, बिहार,यूपी  ते अगदी जवळच्या चिंचणेर  पासून लोक कॉलोनीत  राहतात.  मध्यमवर्गीय  कष्टकरी गरीब असला   कि जात धर्म ह्या फालतू गोष्टीना घेऊन जास्त उड्या  मारत नाही, कॉलोनीत  सगळे लोक शेजारी असणाऱ्या  जुन्या आणि नव्या एमआयडीसी मधल्या कंपनीत  कामाला  जायचे सकाळी आठला बाहेर कि रात्री आठला  ला घरी. त्यामुळे कॉलोनीतली पोर  सगळी दिवसभर भर इकडे तिकडे करत असायची.
कॉलोनीला लागून जिल्हा  परिषद प्राथमिक शाळा होती आणि शाळेचे  खूप मोठं मैदान होत त्याला आम्ही "माळ" म्हणायचो. खालच्या साईडला  मातंग वस्ती मधल्या कुणीतरी खूप अगोदर ती जमीन शाळेसाठी दिली होती. बरेच मोठे मैदान होते.
तिकडे आम्ही बॅटबॉल  खेळायचो आणि तिकडे खेळायला बऱ्याच लांबून यायची पोर कोडोली गावातून दोन तीन ग्रुप यायचे, आमच्या कॉलोनीतले दोन,तीन, मातंग वस्तीतला एक ग्रुप कधीतरी धनगरवाडी चे पोर यायची सगळी नीट खेळायची.
एकदा असाच रविवार होता
आम्ही श्रीकृष्णा संपून बॅटबॉल खेळायला आलो होतो, बाराला शक्तिमान लागणार म्हणून आम्ही लौकर लौकर आवरत होतो आम्ही म्हणजे आमच्या टीम चे नाहीतरी लहानपणी बारक्याना  फिल्डिंग साठी वापरतात आणि ट्रायबॉल खेळायला देतात.  लहान मुले पण मोठे होऊन बॅटिंग  करायची स्वप्नं  बघत राहतात.
त्यादिवशी बौद्धवस्तीतली पोर आणि मातंग वस्तीतली पोर यांची मॅच  लावली होती दोन्ही तिथले स्थानिक म्हणून पूर्ण जीव लावून खेळत होती.
आणि अचानक भांडण सुरु झाले सगळे मारायला लागले एकमेकांना बॅट फेकून मारामारी सुरु झाली.  बौद्धवस्तीलया पोरांनी अजून पोर बोलावली आणि आणि मातंग वस्तीतल्या पोरांनी पण तेच केले.
मी, राहुल, आणि चंद्या  असे   तिघेजन  भांडण बघत होतो. शक्तिमान सुरु व्हायला वेळ होता, म्हणून आम्ही तिघेजण भिलो होतो तरीपण भांडण बघत होतो तेवढ्यात कोणतरी म्हणल  
ह्या मांगांना लै मस्ती आलीय
मग तिकडून पण रिप्लाय आला
आणि महारांनी  काय उपटला  बौद्ध होऊन ?
आता मी चंद्या आणि राहुल नेमका त्याच जातीतल होतो तिघांना पण पहिल्यांदाच असं कायतरी ऐकायला भेटलं होत. आमची चलबिचल सुरु झाली  इतकावेळ एकत्र राहून आम्ही मज्जा घेत होतो ती मज्जा जाऊन आम्ही त्या भांडणातील भांडणाऱ्याची बाजू घ्यायला लागलो, म्हणजे एकदम कट्टर होऊन नव्हतो भांडत पण सुरु झाला आमचा छोटासा वाद
इकडे बारा वाजायला दहा मिनिट बाकी असतील आणि आमच्यात त्या भांडणात कोण बरोबर आणि कोण चूक ह्यावर वाद सुरु होता.
तेवढ्यात राहुल म्हटलं आर  जाऊदे लगा त्यांची भांडण  त्यांचा भांडण दुसऱ्या कारणावरून सुरु आहे
आपण एक काम करू  आत्ता घरी जाऊ शक्तिमान बघू  नंतर बघू काय करायचे
मला आणि चंद्याला  पटलं
मग मी अजून डोकं चालवलं आणि म्हणलं
आज जानाई मळाइ हॉल  ला लग्न आहे  ( आमच्या कॉलोनीच्या जवळ जनाई मळाइ मंगल कार्यालय होते तिकडे आम्ही जेवायला जायचो न बोलवतात कितीतरी लग्नात असच जेवून यायचो आणि कधी कधी खिश्यात लाडू  घेऊन यायचो)  
आपण शक्तिमान बघू हॉलवर जेवून येऊ मग बघू  काय करायचे ते
चंद्या  म्हणाला  कॅनल ला पाणी आलय परवाच जाऊ तिकडे मग
 तर असा आमचा प्लॅन झाला
आम्ही शक्तीमन बघितलं हॉल जाऊन जेवलो चांगले खिश्यात दोन दोन बुंदीचे लाडू आणले आणि कॅनल ला पोहायला गेलो  तिकडून   तसच पुढे जाऊन चिंचाला गेलो.
अश्याप्रकारे इतक्या लहान वयात आम्ही जातप्रश्न आणि त्याच्यावरून होणाऱ्या भांडणाला  कल्टी मारून तो दिवस घालवला एकदम मस्त.  रात्री चिंचा खायला बसल्यावर आम्ही एकमेकांना म्हणालो बरं झाली सकाळी भांडण नाही केली. भांडण करणारी शेवटी गाववाले होते आपण शेवटी भाडेकरी इथले.

टीप : ह्या गोष्टीतला शब्द न शब्द खरा आहे, आजकाल जात जास्तच अधोरिखेंत व्हायला लागली म्हणून हि गोष्ट लिहली.




No comments:

Post a Comment