Wednesday, 30 August 2017

जानाई मळाई आणि बाय

सज्जनगडच्या थोडस अलीकडे  आंबवडे म्हणून गाव आहे  दोन आंबवडे आहेत त्या रोडवर एक थोरलं आणि एक धाकट, माझी आत्या धाकट्या आंबवड्यात राहते, माझे वडील, त्याचा लहान भाऊ आणि हि आत्या एकदम क्लोज होते त्यांच्या लहानपणापासून, माझे वडिलांना ४ भाऊ आणि ४ बहिणी होते.  माझे वडिलांचा ४०७ टेम्पो होता आणि   ज्या ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते माझ्या आत्याला भेटायला जायचे.   त्या आत्याला घरात सगळे “बाय” म्हणत माझे वडील सुद्धा बायच म्हणायचे आणि आम्ही सुद्धा बायच म्हणतो.  असो
१९९५ च्या ला माझे वडील वारले, वडिलांना त्यांच्या मरणाची कुणकुण लागली होती आधीच
त्यावेळेस बाय आंबवड्यावरून माझ्या वडिलांना भेटायला यायची ती पैशाने काही श्रीमंत नाही पण जीव लावते सगळ्यांवर. ती आली कि माझे वडील तिला म्हणायचे बाय आत्ता माझं काय खर नाही मी कधीपण मरेन, माझ्या तीन  पोरांची कोण नाही तू सांभाळ बाकीच्या बहिणी नाहीत बघणार त्यांच्याकडे पण तू तरी बघ
तर बाय म्हणायची “आर दिलीप आस का बोलतोय व्हशील बरा तू”
आप्पा म्हणायचा अशोक गेला सोडून तिकडून तो मला बोलावतोय ( अशोकनाना हे माझे सर्वात लहान चुलते, माझ्या वडिलांचे लहान भाऊ)
बाय लई खंबीर आहे मनाने ती म्हणायची
एकतर तू काही जात नाही आणि गेलास तरी तुझ्या पोरांना मी आहे
वडील वारले आणि आम्ही आमच्या  शाहूपुरीच्या घरातून बाहेर पडलो,
आणि कोडोली जवळ राहायला आलो कारण तिकडे एमआयडीसी होती आयमीन अजून आहे
काहीतरी काम भेटेल ह्या आशेने आम्ही तिकडे स्थलांतर केले.  कोडोलीच्या जवळचा जानाईमळाई देवीचा डोंगर आहे, तिकडे दर शुक्रवारी आणि मंगळवारी लोक जातात, देवीच्या भक्त लोक लोकात जास्त बायका असतात.  “ज्या बायकांचे नवरे वारलेले असतात, ज्या बायकांना नवऱ्याने सोडून दिलेले असते, किंवा ज्या बायका बिनालग्नाचा असतात त्यांना मांढरदेवी काळूबाई, जानाईमळाई, नाशिकची रेणुकामाता, अश्या देवता जास्त जवळच्या वाटत असतात त्याचे कारण अस आहे कि समाज अश्या महिलांकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि अश्यावेळेस त्या बायकांना ह्या देवीचा मानसिक आधार वाटत असतो. ( हे फक्त माझे निरीक्षण आहे). ब्याक तो स्टोरी
तर ह्या जानाईमळायच्या डोंगारावर आम्ही जायचो कायम, मी आठवीला असताना बायकडे गेले होतो बहुतेक उन्हाळ्याची सुट्टी होती बायने मला मी ४ वर्ष्याचा असताना बघितलं होत आणि आता मोठा झालो होतो  मी  तिच्या घरी गेल्यावर तिने ओळखलच नाही मला पहिल्यांदा मी सांगितले “मी दिलीपचा मुलगा”
आप्पाच नाव  ऐकल  आणि मला जवळ वडल पटपटा मुके घेतले आणि म्हणाली एवढा मोठा झाला व्हय तू आणि रडायला लागली आता मला समजेना बाय रडतेय, थोड्या वेळाने ती शांत झाली, मला जेवायला दिल आणि विचारलं तू आणि नितीन कधी जानाईमळाई च्या डोंगरावर गेला होता का ?
मी म्हणालो हो लयदा गेलो पार पयलीपासून जातोय आम्ही कोडलीजवळ राहतो ना ( शाहूपुरी सोडल्यानंतर कुणालाच माहित नव्हते आम्ही कुठे राहतो ते)
तिनेते ऐकल आणि परत रडायला लागली आणि म्हणायला लागली
“ दिलीप  तू खर बोलत होतास, मला माफ कर”
बाय खूप रडत होती आणि मी ब्लांक झालो होत काय चाललय समोर काही कळत नव्हते.   जेवायला वाढलेले ताट तसच होत
शेवटी ती रडायची  थांबली आणि सांगायला सुरुवात केली
म्हणाली
 साल १९९७ का ९८ ला मी  जानाईमळायला आलेले दर्शन घेतले आणि प्रसाद घेतला आणि आंबवड्याला परत आली, घरात आणि आजूबाजूला प्रसाद वाटला रात्रीचा स्वयपाक बनवला आणि रात्री जेवली आणि झोपली.  
रात्री मला एक  स्वप्न पडलं, स्वप्नात दिलीप आला होता
आणि म्हणाला काग बाय माझ्या दोन पोरांच्या जवळून गेलीस तर त्यांना ओळ्खल नाहीस
बाय म्हणाली कधी आणि कुठ ?
माझे वडील म्हणाले तू आज जानाईमळायला गेलीतीस्ना, तिकडच होती मिलिन आणि माझ पिटुकल ( माझ्या छोट्या भावाला घरात त्यावेळेस पिटुकल म्हणायचे)  आणि “तू शेजारण गेलीस दोघांच्या पण वळांखल नाय तू बाय”
बाय म्हणाली  आर तुझी पोरांना कस विसरीन मी, ती नव्हतीच पण डोंगरावर  
आणि स्वप्न संपल
पण अशी स्वप्न मला अजून पडतात दिलीप तेच म्हणतो अजून आणि मी तेच उत्तर देत होते ,पण आता मला वाटतंय दिलीपच बरोबर होता मी बघितलेली तिकड पोर पण मनात म्हटले दिलीपची पोर इकडे कश्याला येतील, दिलीप खरच बोलत होता.
आज  परत दिलीप स्वप्नात आला तर माफी मागेन त्याची.
बायने सांगितलेली  स्वप्नाची कथा किती खरी आहे हे मला नाही माहित पण एक समजल कि बाय आणि माझे वडिलांचा बॉंड माझे वडील गेल्यानंतरपण तसच आहे. 

No comments:

Post a Comment