मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी कथित "उच्चवर्णीय " आणि पहावी
मारणाऱ्या दलितांची "उतरंड" समतेच्या लढ्यासाठी !
मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी "बुराज्वा" आणि पहावी
घाम गळणाऱ्या गरीबाची "होरपळ " भाकरीच्या तुकड्यासाठी !
मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी " सत्ताधीश " आणि पहावी
लाथाडलेल्या जनतेची "तडफड" तग धरण्यासाठी !
मलाही वाटते कि व्हावे मी कधीतरी " राम " आणि पहावी
धरती फोडून अग्निपरीक्षा देणाऱ्या सीतेची "धडपड" पवित्र्यासाठी !
No comments:
Post a Comment