Wednesday, 30 March 2016

असा माझा महाराष्ट्र

देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून मिरवणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र ! पण गेले काही वर्ष  राज्याची आर्थिक , सामाजिक, स्थिती ढासळत आहे , पण कुणालाच याचे पडलेले नाही सगळेजण फक्त आपले घोडे पुढे दामटवत आहेत , नक्की झालय काय तरी काय असा या महाराष्ट्रात ?  याचा हा आढावा !
महाराष्ट्र हे देशातील एक विकसित राज्य आहे , शैषणिक , आर्थिक ,सामाजिक अश्या सगळ्या क्षेत्रात खूप पुढे आहे,  आपले राज्य हे औद्योगिक दृष्ट्या  महत्वाचे राज्य आहे परदेशी गुंतवणूक  हि कायम या राज्यात येत असते गेल्या दोन वर्षातील वेगवेगळे रिपोर्ट्स पाहिले तर महाराष्ट्राची पीछेहाट होताना दिसत आहे , नुकत्याच आलेल्या व्यापार वृद्धी च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे , महाराष्ट्रातील अनेक उदयोग आजारी पडत आहेत , मोठ्या मोठ्या कंपन्या राज्य सोडून जात आहेत, एम आय डी सी   तील उद्योगाकडे कुणाच लक्षच नाही आहे, मुंबई पूणे नाशिक अश्या मोठ्या शहरांचे ठीक चालू आहे पण सातारा , सांगली , विदर्भातील काही एम आय डी सी मरायला टेकल्या आहेत.
शेती हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे पण शेतीच्यापुरेश्या आणि योग्य  सुविधा   नसल्या मुळे शेतकरी मागासलेला आहे, पाटबंधारे खात्याने  प्रचंड पैसा खाल्ला आहे .  साधा कालवा नाही इकडे नीट , आणी आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन नाही , पूर्ण महारष्ट्रात दुष्काळ पडला आहे, शेतकरी कुठलाही ऋतू असू दे आत्म हत्या  करतच आहे ,  फक्त उस हेच पिक येत का महाराष्ट्रात ? साखर कारखाने कोटीचा पैसा खातात आणी मग विशेष पैकेज देऊन जगावयाचे त्यांना का आणी कशासाठी ?  उसावर जास्त लक्ष दिल्यामुळेच शेतीत सगळी विषमता आली आहे ,मराठवाडा ,विदर्भातील शेतकरी मरत आहे . उत्पादन होत नाही आहे मग  जे आहे त्याचे दर वाढणारच .  इथल्या कलाकारांना खेळाडू यांना मदत करावी लागत आहे , सरकारने वेळीच योग्य उपाय योजना केल्या असत्या तर हि वेळ आली नसती.
इथे बेरोजगारी तर भयानक आहे इथल्या मुलांनी ५-६ लाख रुपये खर्चून शिक्षण घेतले  आहे कुणी अभियंता , कुणी एम बी ए वाला सगळेच १०-१५ हजारा वर  काम करत आहेत , ते पण कुणी एम आर , कुणी कॅल सेंटर मध्ये नोकरी करत आहे , मोठ्या शहरात राहणे म्हणजे कमीत कमी ८ हजार लागतात , स्वतःसाठी किती , कर्ज फेडण्यासाठी किती , घरी किती आणि बचत  किती सगळा गणित अवघड होऊन बसला  आहे, हि परिस्थिती नोकरी मिळाल्या पोरांची आहे ,तर
 नोकरी न मिळाल्याची तर अजून बिकट  , घरून फोन येतो दररोज मिळाला का जॉब ? काय उत्तर देणार ? सगळाच भयानक आहे,
 पण सरकार ला हे सगळे माहित आहे का नाही हेच समजत नाही आहे .
अजून एक समस्या म्हणजे  इथे वाढत जाणारे दलितांवर अत्याचार , हा आपला समाज कधी  सुधारणार काय माहित का हेच चालू राहणार तसाच , नगर जिल्हा तर दलितांसाठी नरक झाला आहे दर महिन्यात येतेच   बातमी हत्या , बलात्कार ,  इथल्या शिकून न शिकलेल्या लोकांना समजतच नाही आहे आपण कुठल्या दिशेला जात आहोत , महाराष्ट्रातील दलित लोक बाबासाहेब आंबेडकरांना  मानतात म्हणून हा समाज कायद्यला धरून चालत आहे , एका जर यांनी हातात शस्त्र घेतला तर समजाची घडी कोलमडून पडेल पूर्ण, महाराष्ट्रातील लोकांना गरज आहे ती मुळात प्रबोधनाची पण सगळ्यांना फक्त बोलण्यात हवा आहे प्रबोधन वागण्यात नको .
शेवटचा एक मुद्दा  म्हणजे सरकारची विनाकारण लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावणे , अमुक दिवशी मांस बंदी , हे खाऊ नका ते खाऊ नका , मुलीनी असा वागा तसा वागा , जे मोरल पोलिसिंग आहे ते कुणालाच नको असते , सरकारने जरून एक विचारधारा जपावी पण समाजातील सर्वात लहान भागाला पण त्या विचाराने त्रास नाही झाला पाहिजे,तुमची विचारधारा सामान्य माणसावर लादु  नका  नाहीतर दुसरी  फ्रेंच क्रांती व्हायला वेळ नाही लागणार.
अश्या बऱ्याच समस्या आहेत इथे पण करणार काय आमचे सरकारचे लक्षच नाही आहे ! आणि मुख्य जबाबदार तर आम्हीच आहोत, आम्हीच  दिले आहे मत त्यांना !
मग यावर नक्की उपाय काय हे पाहू आपण पुढच्या लेखात

No comments:

Post a Comment