Wednesday, 2 March 2016

पेन का पाना

                                           

माझा एक मित्र आहे लहानपनीचा  "टोया" म्हणून.  तसा त्याचा  नाव तसा खूप भारी आहे" निखील"  
 पण  काय माहित का  आमच्या शाळेत ज्याचे  नाव निखिल त्याला सगळे "टोया" म्हणायचे 
तसा  तो अभ्यासात हुशार होता पण अभ्यास करतच नसायचा. पाचवीत त्याने नवोदयचि परीक्षा दिली होती    आणि त्याची निवड नवोदय मधे झाली झाला अख्या गावात हुशार मुलगा म्हणून ख्याती झाली नवोदय मध्ये झालेली निवड हे बहुतेक मुलांच्या आयुष्यातील पहिले यश असते त्यामुळे सहावीचे वर्ष तसे हवेतच जाते, अजाण वयात मिळालेले यश निट हाताळायला कसा जमणार लगेच ? या लाटेतच त्याचा सहावी सातवीची  वर्षे सरली, 
 पुढे  आठवीला गणित आणि विज्ञान  इंग्रजीतून झाले आता आधीच  गणित  मराठीतून येत नाही आणिआता  हे इंग्रजीतून शिकवला जाणार म्हणजे आधी चुकून २५ पैकी ९ तरी भेटायची आता तितका पण भेटणे मुश्किल झाला. 
आठवीची पहिली सहामायी परीक्षा झाली अपेक्षेप्रमाणे याचा त्रिफळा उडाला होता, त्याचे  वडील त्याला सुट्टीसाठी घरी न्यायला आले होते, होस्टेल च्या बाहेरच होस्टेल चे हाउस मास्टर  मिश्रा सर  खुर्ची टाकून एकेकाची कुंडली आणि कामगिरी वाचून दाखवत होते. याचा पण नंबर आला सर खूप ओरडले सांगितले कि मस्ती करतो मेस मधून पापड चोरतो, बोरे आणायला बाहेर जातो असाच खूप काही काही. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतला आणि घरी आले. 
 याचा आपला चालुंच असायचा दिवसभर इकडेतिकडे फिरायचा टीवी बघायचा निवांत राहायचा. पूर्ण सुट्टीभर वडील  त्याला एका शब्दाने पण बोलले नाहीत झाला हा खूप खुश होता कि  पप्पा खूप चांगले आहेत काही बोलले नाहीत . सुट्टी संपायला दोनतीन दिवस बाकी होते , संध्याकाळची वेळ होती याचे पप्पा दारात खाटेवर बसले होते हा आपला गावभर  फिरून आला हातपाय धुतले आईकडून चहा बटर घेतला आणि बसला तेवढ्यात याच्या पप्पानी याला जवळ बोलावले हा पण गेला लगेच आणि त्यांनी याला समजवायला  केली कि आता वेळकाळ बदलली आहे , शिकण खूप गरजेचे आहे, आमच्या काळात तसा चालत होते आता इथून पुढे चालणार नाही तू अभ्यासावर लक्ष दे असा बराच काही काही शेवटी अजून एक त्याला सांगितला कि आता तू ठरव कि तुला आयुष्यात पाना हवाय का पेन ? जर पाना हवा असेल तर शाळा सोडून दे आणि माझ्याबर ग्याऱेज मध्ये येत जा तेवढीच मला मदत होईल घरच आहे ग्याऱेज आणि पेन हवा असेल तर  अभ्यास कर या पुढे नीट मनलावून.  तू विचार कर एक रात्र आणि मला सकाळी सांग तुझा निर्णय. 
बिचारा १२-१४ वर्षाचा शेंबड  पोर ज्याला अजून निट  चड्डी घालता येत नव्हती कि शेंबूड पुसता येत नव्हता त्याला चक्क आयुष्याचा निर्णय करायचा होता ते पण एका रात्रीत. हा आपला रात्री उशिरा पर्यंत दोन्ही बाजूनी विचार करत होता कधी पेन वरचढ होत असे आणि पेन वरचढ झाला कि त्याला इंग्रजीतले गणित दिसायचे तर कधी  विज्ञान दिसायचे , खूप सारा होमवर्क  दिसायचा ते दिसला कि लगेच पाना वरचढ व्हायचा , असा करत करत तो कधी झोपला त्यालाच समजला नाही 
 झाला सकाळी टोया  उठला अंघोळ केली नाश्ता केला, आतल्या खोलीत जाऊन पान्याची एक छोटी थैली होती त्यातून एक पाना काढला आणि गेला पप्पानजवळ आणि म्हणाला 
"दादा मी ठरवले  कि मी पाना घेणार हातात" 
दादा  चहा पीत होते चहाचा कप  तसाच बाजूच्या  खिडकीवर  ठेवला आणि अशी सणसणीत खाडकन कानाखाली ओढली कि बस्स दिवसभर याचा गाल  आणि कान लाल होते. आणि  म्हटले परत जर अभ्यास केला नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. आला लगेच पाना घेऊन !  
त्यावेळेस जो पाना याच्या हातातून पडला तो त्याने परत कधीच उचलला नाही गुपचूप याने सामानाची प्याकिंग केली आणि दिवाळीची सुट्टी संपवून शाळेत आला. 
कधीच अभ्यासात लक्ष न देणारा हा माझा मित्र आता  देशातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.   



1 comment: