आमचे घर म्हणजे माझी आई तिला सगळे आक्का म्हणत , आणि आम्ही तीन भाऊ पैकी मोठा भाऊ त्याच्या बायकोबर दुसरीकडे राहत होता, दुसरा भाऊ म्हणजे मी शिकायला बाहेर होतो आणि छोटा भाऊ एका दवाखान्यात कामाला होता. मोठा भाऊ काही लक्ष देत नवता घराकडे आणि माझा नोकरीचा काही पक्का नव्हता, आणि छोटा भाऊ चळवळीत शामिल झाला होता. आईला खूप काळजी वाटत होती कि कसा होणार मुलाचं . आक्का जात होती एका कंपनीत कामाला , जेवायच्या सुट्टीत असाच विषय निघत असेल आमचा,कि पोरांच कधी आणि कस चांगल होणार , आक्काने पूर्ण आयुष्य घातले होते आमच्या साठी हॉटेल मध्ये काम करून , तर कधी भंगाराच्या दुकानात काम करून . तिला नक्कीच वाटत असणार कि तिचे कष्ट वाया जाणार , आक्काची हि अवस्था बघून तिच्या कामावरच्या एका बाईने सांगितले कि आमच्या इकडे एक देवरुषीण आहे जी करते सगळे नीट , आणि बरीच उदाहरने दिली हिचा पोरगा ह्या पोरीच्या नादात येडा होता आता सुधरला, तर कोण घरात लक्ष द्यायला लागला तर कुणाला जॉब लागला असे बराच काहीकाही .
झाल आक्काच्या डोक्यात पक्क झाल कि आता हाच लास्ट पर्याय मग असाच एका मंगळवारी आमची आक्का आणि ती दुसरी बाई गेले त्या देवरुषीण कडे तर तिची वेगळीच तर तिच्या अंगात यायचं ते पण फक्त ५ ते ७ ला मग तोपर्यंत अक्काने वाट पहिली . झाले एकदाचे वाजले ५ आली देवी अंगात आणि सांगितला तुझा मरुण १५ वर्षे झाली , तीन पोरे आहेत तुला, मोठे लक्ष देत नाही , दोन नंबरचा हुशार आहे जबाबदार आहे आणि तिसराचे की खरा नाही . आक्काचा विश्वास बसला कि खरेच आहे सगळा . आता हि देवी आपला काम करणार मग परत आक्काने विचारला काय करू मग मी , अंगात आलेली देवी बोलली तुझ्यावर घरातल्यानीच करणी केली आहे. ती करणी तोडायची असेल तर अमावास्येला शाळेच्या माळावर एक उलट्या पकाची कोंबडी , पिवळा भात हळद कुंकू आणि स्वखुशीने द्यायचे असतील तर ११११ रुपये दे वाह म्हणून …
आता आक्काला पगार एवढासा त्यातून हा खर्च म्हणजे १५००-१६००० रुपये जाणार ती म्हणली बघू करते म्हणून. त्यानंतर ती देवरुषीण बी सारखा फोन करून विचारू लागली कि कधी करायचा कधी करायचा , आणि इकडे माझा छोटा भाऊ जास्तच चळवळीत जात होता म्हणून आक्काला वाटत होते कि खरच कुणीतरी करणी केली आहे. मला यातला काहीच माहित नव्हता . आक्का मला दरमहिना १००० रुपये पाठवायची जानेवारीच्या महिन्यात आक्का मला म्हणाली तुला या महिन्यात पैशे नाही पाठवले तर चालतील का ?
मला काहीच समजेना कारण मला जॉबची मुलाखतीसाठी कपडे घ्यायचे होते म्हणून मि थोडे पैशे साठवून ठेवले होते आणि ड्रेससाठी कमीत कमी हजार रुपये तरी जाणार होते, त्यात कॉलेज संपत आलेले जर पैशाची गरज होती
मला वाटला काहीतरी अडचण असेल म्हणून आक्का नाही म्हणत असेल मी पण म्हनलो चालेल आणि सहजच विचारले कि काय अडचण आहे आणि आक्काने मला सगळी स्टोरी सांगितली , माझ्या कपाळातून झिणझीण्या बाहेर आल्या, आणि डोक्यात विचार आला
आयला ब्रान्डेड ड्रेस घेणार आहे मी एकदाच, आणि त्यात हि देवी आणि तिची करणी मधी आली
माझा डोकच सटकला होता एकदम ,मग मी पण एक आयडिया केली सांगितला कि ह्या आमची मुलखात एप्रिल मधे आहे , तू आता दे मला पैशे आणि
मार्च मध्ये कर तू तुला जे करायचे ते , आक्काने थोड्या नाखुशीने पाठवले मला पैसे . मी घेतले इकडे एक मस्त पैंट शर्ट. झाला फेब्रुवारीच्या २ तारखेला माझा इंटरविव झाला .
मला नोकरी लागणारच याची खात्री होती संध्याकाळी घरी फोन करून सांगितला कि नोकरी लागली म्हणून आक्काला एकदम आनंद झाला , मला जितका आनंद झाला नव्हता तितका आनंद तिला झाला . कष्टाचे चीज झाल्यासारखा वाटले. झाले दोन तीन दिवसात मी पूर्ण माहिती काढली त्या देवरुषीण बाईची, ती पण बिचारी पोट भरायला आलेली पण तिला समजला होता कि लोक फसतात ते देवाच्या नावावर म्हणून तिने हे सुरु केले होते . आणि त्या दुसर्या बाईने या देवरुषीण बाईला आमच्या आक्काबद्दल सागितलं होता आधी , म्हणून तिने अंगात आल्यावर सगळा बरोबर सांगितला.
मी रात्री आक्काला फोन करून सगळा खरा खरा सांगितला कि मी खोट बोललो तुझ्याबर , आणि त्या देवरुषीण बद्दल पण सांगितला आणि आक्काला बोलाव आग हे सगळे आपल्याला देवाच्या नावावर लुबाडतात , आता तू मला पैशे नसते दिले तर मी कुठून कपडे घेतले असते आणि कशी मला नोकरी लागली असती ? आक्काच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला .
उन्हाळ्यात जेव्हा घरी आलो तर आमच्या देवार्ह्यात एकपण देव नव्हता
Chan Milind.
ReplyDelete